शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी घेतली सदिच्छा भेट.
शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांची सातारा जिल्ह्यातील शिवसैनिक यांनी घेतली सदिच्छा भेट.
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.
राज्यावर केंद्राचे संकटआल्याने शिवसेना पक्ष प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी त्याचबरोबर शिवसेना पक्ष नव्याने उभारण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मातोश्री येथे उपस्थित राहून घेतली सदिच्छा भेट भेटीदरम्यान सदैव आपल्या पाठीशी असणार अशी ग्वाही सातारा जिल्हा शिवसेनाप्रमुख मा. प्रतापराव जाधव यांनी दिली. यावेळी शिवसेना पक्षाचे उपनेते मा. नितीन बानगुडे पाटील सर. नवनियुक्त सातारा जिल्हा प्रमुख प्रतापराव जाधव. उपजिल्हाप्रमुख दत्ता नलवडे. भानुदास कोरडे सर. तालुकाप्रमुख रमेश बोराटे. महाराष्ट्र रंग कामगार सेनेचे महाराष्ट्र उपाध्यक्ष संजय घोरपडे. खटाव तालुका प्रमुख दिनेश देवकर. असलम भाई शिकलगार यांच्यासह शेकडो शिवसैनिक मातोश्री येथे उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांनी वर्धनगड गावचे सुपुत्र असलमभाई शिकलगार यांची विचारपूस केली असता जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव यांनी असलम भाई हे किल्ले वर्धनगड गावचे रहिवासी असून ते आपल्या शिवसेना पक्षाचे वर्धनगड शिवसेनाशाखा प्रमुख म्हणून कार्यरत असल्याचे सांगितल्याने ठाकरे साहेबांनी भरभरून कौतुक करत त्यांचे अभिनंदन केले.
Comments
Post a Comment