सातारा जिल्ह्यामधील लहान मुले पळविणारी टोळी सक्रिय असण्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका:जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल.
जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी सक्रिय असण्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत या कारणामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता सातारा जिल्ह्यात लहान मुलांना पळवणारी टोळी सक्रिय आहे. अशी अफवा पसरवतात सातारा पोलीस दलामार्फत शहानिशा केली असता ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी सांगितले आहे. सातारा जिल्ह्यामध्ये लहान मुलांना पळविणारी टोळी असल्याबाबत जर कोणी जाणीवपूर्वक सदरची अफवा पसरवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे आढळून आले असते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे सातारा जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत या करिता सातारा जिल्हा पोलीस दल सज्ज असून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न जिल्हा पोलीस दलामार्फत केले जात आहेत व सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी पालकांनी अशा तथ्यहीन अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच आपण राहात असलेल्या परिसरामध्ये कोणतीही अनोळखी व्यक्ती संशयित इसम आढळून आल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्यास ,स्थानिक गुन्हेगार शाखा सातारा, नियंत्रण कक्ष सातारा तसेच डायल क्रमांक 112 वर संपर्क साधावा ,कोणीही स्वतः कायदा हातात घेऊ नये किंवा संबंधी पोलीस स्टेशन अधिकाऱ्यांना कळवावे असे श्री अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा यांनी आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment