Posts

Showing posts from February, 2023

येस ग्रुपची करार शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग - माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक.

Image
येस ग्रुपची  करार शेती शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग -  माजी जि.प. अध्यक्ष शिवाजीराव महाडिक.    पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचे आहे त्यासाठी येस ग्रुप च्या करार शेतीतून शेतकऱ्यांना हमीभावाबरोबरच अधिकचा नफा मिळत असल्यामुळे शेतकरी करारशेतीकडे वळत असून याचा लाभ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन माजी जि.प.  अध्यक्ष शिवाजीराव महाडिक यांनी केले  जाखणगाव ता. खटाव येथील येस ग्रुपच्या गोडाऊन व प्रोजेक्ट ला भेटीवेळी श्री महाडिक सर बोलत होते यावेळी  येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत तानाजीराव मदने ,अनिल शिर्के, ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.  शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होणे गरजेचे असून शेतकऱ्यांना कष्ट करण्यातची सवय लागली आहे मात्र त्याच्यातून  पिकणाऱ्या मालाला हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नफा होत नाही मात्र तो हक्काचा नफा मिळवून देण्याची योजना म्हणजे करार शेती असून या करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुपने शेतकऱ्यांना हमखास नफा देण्याची खात्री दिल्याने सातारा जिल्ह्यातील शे...

पुसेगाव येथे रक्तदान शिबिर उत्साहात; ७५ जणांचा सहभाग.

Image
पुसेगाव येथे रक्तदान शिबिर उत्साहात; ७५ जणांचा सहभाग. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  पुसेगाव ता .खटाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघाच्या वतीने आज येथील शंकर पार्वती मंगल कार्यालयात आयोजित रक्तदान शिबिरात ७५ जणांनी सहभाग घेत आपली सामाजिक बांधिलकी जपली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विजय मसणे, विश्वस्त संतोष वाघ, उपसरपंच पृथ्वीराज जाधव, माजी चेअरमन शिवाजीराव जाधव, प्रा. जगन्नाथ जाधव, सह्याद्री मंडळ व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.रुग्णांना रक्ताची अडचण भासू नये यासाठी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने सह्याद्री मंडळ आणि पुसेगाव पत्रकार संघ यांच्या सहकार्याने हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. दरम्यान, मान्यवरांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून त्यामुळे आपण देशाची एक प्रकारे सेवा करत असल्याचे उद्घाटनप्रसंगी नमूद केले.

कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात.

Image
कैलासवासी खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिर मोठ्या उत्साहात. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. कोरेगाव तालुक्यातील वाटर स्टेशन येथे आशीर्वाद क्लिनिक आणि समर्थ मेडिकल यांच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या कैलास वासी खासदार लक्ष्मण तात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले त्यावेळी विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर व फलटण मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण व जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील Apmc मार्केट कमिटीचे माजी चेअरमन बाळासाहेब सोळसकर व कृषी व पशुसंवर्धन झेडपी माझी अध्यक्ष मंगेश धुमाळ व नागेश शेठ जाधव या प्रसंगी हजर होते कार्यक्रमाची सुरुवात आमदार दीपक चव्हाण यांनी फिट कापून केली यावेळी रक्तदानासाठी रक्तदाते मोठ्या संख्येने हजर होते

सौ. वैशाली रसाळ- शिंदेंची कक्ष अधिकारीपदी पदोन्नती.

Image
सौ. वैशाली रसाळ- शिंदेंची कक्ष अधिकारीपदी पदोन्नती. कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.  कोरेगाव, ता. २५ : मंत्रालयीन संवर्ग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयातील सहायक कक्ष अधिकारी तसेच विधि आणि न्याय विभागातील सहायक कक्ष अधिकाऱ्यांच्या (विधि) कक्ष अधिकारी पदावरील पदोन्नतीसाठी झालेल्या विभागीय परीक्षा - २०२२ मध्ये येथील सौ. वैशाली बाळासाहेब रसाळ - शिंदे या १६५ व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यामुळे त्यांना कक्ष अधिकारीपदी पदोन्नती मिळाली आहे. सिडनहॅम वाणिज्य आणि अर्थशास्त्र महाविद्यालय, बी रोड, चर्चगेट, मुंबई येथे २७ जून ते एक जुलै २०२२ या कालावधीत या परीक्षा झाल्या होत्या. सौ. वैशाली या सद्या मंत्रालयामध्ये वित्त विभागात अधिकारीपदी कार्यरत होत्या. इंदापूर (जि. पुणे येथील) मूळ रहिवाशी आणि आसाममध्ये "सीआरपीएफ"मध्ये कार्यरत रोहित शिंदे यांच्या सौ. वैशाली या पत्नी, तर येथील प्रेस फोटोग्राफर शेखर रसाळ यांच्या त्या भगिनी आहेत. सौ. वैशाली यांनी कक्ष अधिकारी परीक्षेमध्ये उज्वल यश मिळवल्याबद्दल त्यांचे इंदापूर व कोरेगाव शहर, परिसरात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

पुसेगाव येथे सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघ रक्तदान शिबिराचे आयोजन.

Image
पुसेगाव येथे सह्याद्री मंडळ व पुसेगाव पत्रकार संघ रक्तदान शिबिराचे आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून येथील सह्याद्री मंडळ आणि पुसेगाव पत्रकार संघाने रविवारी (ता. २६) रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. येथील शंकर-पार्वती मंगल कार्यालयात सकाळी ९ ते ३ पर्यंत हे शिबिर पार पडणार आहे. रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपले कर्तव्य बजावावे, असे आवाहन सह्याद्री मंडळ व पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.दरम्यान, संयोजकांकडून सामाजिक बांधिलकीतून प्रत्येक रक्तदात्यास हेल्मेट किंवा वॉटर जार भेट देण्यात येणार आहे. तर ब्लड बँकेकडून प्रमाणपत्र व रक्त संबंधी सुविधा दिल्या जाणार आहेत.

सतत हसतमुख हरिभक्त पारायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे यांचे अल्पशा आजाराने निधन.

Image
सतत हसतमुख हरिभक्त पारायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे यांचे अल्पशा आजाराने निधन.  पुसेगाव प्रतिनिधी., पंकज कदम.  वर्धनगड- सातारा 24 तास न्यूज, उपसंपादक, एस न्यूज मराठी प्रतिनिधी. मा. नितीन घोरपडे सर यांचे वडील आणी वारकरी भूषण वर्धनी माता ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष सर्व वर्धनगड पंचक्रोशीत सर्जेराव बुवा या नावाने सुप्रसिद्ध असलेले सर्वांच्या हाकेला धावून जाणारे ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या माध्यमातून वर्धनगड पंचक्रोशी समाजकार्याचा डोंगर उभा करणारे सतत हसतमुख हरिभक्त परायण सर्जेराव दत्तात्रय घोरपडे उर्फ बुवा यांचे दिनांक 21/2/2023 रोजी अल्पशा आजाराने निधन झालेने वर्धनगड पंचक्रोशीतून हळहळ वेक्त होत आहे. त्याचा सावडण्याचा विधी दिनांक 23/2/2023 रोजी ठीक सकाळी 8.00 वा. किल्ले वर्धनगड येथे होणार आहे तरी सर्वानी उपस्थित राहावे.  ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो हीच परमेश्वरचरणी प्रार्थना.

केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने चंद्रशेखर केंगार सन्मानित.

Image
केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने चंद्रशेखर केंगार  सन्मानित.  कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. मुंबई येथील केंद्रीय लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने कासार शिरसी जिल्हा लातूर येथील या संघटनेचे महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख श्री चंद्रशेखर केंगारे यांना त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबाबत सन्मानित करण्यात आले याबाबत कासार शिरसी भागात त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे कासार सिरसी जिल्हा लातूर येथील तरुण पत्रकार व युवा महाराष्ट्र सेनेचे सोशल मीडिया प्रमुख चंद्रशेखर मधुकर केंगा यांना बुधवार तारीख 15 रोजी नेवासा जिल्हा अहमदनगर येथे सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त श्री रवींद्र पवार यांच्या हस्ते या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना गौरवण्यात आले. याप्रसंगी या समारंभास सर्वश्री माजी सैनिक साहेबरावजी घाडगे अभियंता चेचर साहेब केंद्रीय लोकशाही पत्रकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सचिन जी मोरे यांचे सह अनेक मान्यवर हजर होते त्यांना मिळालेल्य...

तळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.

Image
तळेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.   खातगुण तालुका खटाव येथील गावाच्या पश्चिम भागातील रामेश्वर डोंगराच्या पायथ्याला असलेले पुरातन महादेवाचे तळेश्वर  मंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.  शनिवार दिनांक 18 2 2023 रोजी महाशिवरात्री निमित्त तळेश्वर मंदिरामध्ये सकाळी सहा ते नऊ या वेळेत भक्तांचे अभिषेक होणार असून त्यानंतर दिवसभर हरिभक्त हरीभजनाच्या गजरात भक्तांना दर्शनाकरता खुले राहील तर सकाळी 11 ते सायंकाळी  4 पर्यंत भजनी मंडळाचे भजन होईल यामध्ये खातगुण , विसापूर, जाखनगाव ,भांडेवाडी तसेच इतर भजनी मंडळ यांची भजन होणार आहेत. येणाऱ्या सर्व भाविकांना दानशूर व्यक्तीकडून  दूध, चहा, खिचडी व उपवासाचे पदार्थ प्रसाद म्हणून वाटप करण्यात येणार आहे व भक्तांनी या महाशिवरात्रीचा लाभ घ्यावा असे तळेश्वर मंदिरांच्या संयोजकांनी सांगितले आहे.

विसापूर येथे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रस्त्याचे भूमिपूजन.

Image
विसापूर  येथे आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते शनिवारी रस्त्याचे भूमिपूजन.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  विसापूर तालुका खटाव येथे दिनांक 18. 2. 2023 शनिवार सकाळी साडेआठ वाजता विसापूर काटकरवाडी रस्त्याचे भूमिपूजन आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते होणार असून विसापूर एसटी स्टँड चौकात सर्व विसापूर, रेवरकरवाडी, आवारवाडी, बुधावलेवाडी, बोबडेवाडी, चाणखणवाडी, पांढरवाडी गाववाडी व इतर परिसरातील ग्रामस्थांनी हजर राहावे असे आवाहन विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी केले आहे.

पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा करा खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेची निवेदनाद्वारे मागणी.

Image
पत्रकार वारिशे यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा करा खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेची निवेदनाद्वारे मागणी.   सातारा 24 तास न्यूज. उपसंपादक. प्रतिनिधी.  नितीन घोरपडे.  राजापूर ( जि. रत्नागिरी ) येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येप्रकरणी दोषींवर त्वरित कारवाई करुन कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेकडून  तहसिलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे  करण्यात आली. यावेळी पत्रकारांनी घोषणा देवून समाजातील अपप्रवृत्तींचा निषेध केला.खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेने तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे कि ,प्रामाणिकपणे समाजहिताचे काम करुन लोकशाहीतील चौथ्या स्तभांचे कर्तव्य पालन करणाऱ्या राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची समाजातील विकृत प्रवृत्तींनी हत्या केली आहे. समाजात अपप्रवृत्तींविरोधात भूमिका घेऊन काम करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राज्यसरकारने पत्रकार संरक्षण कायदा संमत केला आहे. त्या अनुषंगाने पत्रकारांना संरक्षण देणे अभिप्रेत आहे, मात्र राजापूर येथील घटनेसारख्या घट...

सोसायटीचे चेअरमन विजय लावंड यांची श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसादिनी अनोखी भेट.

Image
सोसायटीचे चेअरमन विजय लावंड यांची श्रीनिवास पाटील यांना वाढदिवसादिनी अनोखी भेट.   सातारा 24 तास न्यूज. संपादक. प्रतिनिधी  अकबर भालदार. सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय श्री श्रीनिवास पाटील यांचे 82 व्या वाढदिवसानिमित्त खातगुण तालुका खटाव  सोसायटीचे चेअरमन श्री विजय लावंड यांच्यावतीने खासदार श्रीनिवास पाटील यांना अनोखी भेट देण्यात आली खासदार श्रीनिवास पाटील यांचा वाढदिवस कराड येथे नुकताच साजरा करण्यात आला, वाढदिवस प्रसंगी खातगुण सोसायटीचे चेअरमन विजय लावंड,संचालक हरिश्चंद्र लावंड, अंकुश जाधव राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष सुबोध जाधव व बिपिन माने यांनी खासदार श्रीनिवास पाटील यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त  82 वह्या व 82 पेन साहेबांना भेट दिली या अनोख्या भेटीने खासदार भारावून गेले. यावेळी बोलताना खासदार म्हणाले फुल गुच्छ देण्यापेक्षा अशा भेटवस्तू निश्चितच समाजासाठी उपयुक्त ठरतील, व या वस्तूचा दैनंदिन जीवनामध्ये समाज भिमुख कार्यासाठी निश्चित फलदायी ठरेल! अशाच प्रकारच्या भेटवस्तू प्रत्येकाने दिल्यास  योग्य ठिकाणी कारणी लागतील,असे गौरव उदगार  विजय ला...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार महिला कार्याध्यक्ष सौ. मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम.

Image
 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार महिला कार्याध्यक्ष सौ. मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम.  सातारा 24 तास न्यूज संपादक. प्रतिनिधी.  अकबर भालदार. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खटाव तालुक्याच्या झुंजार  महिला कार्याध्यक्ष सौ.मुमताज मुलाणी यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम केला असून,तशा आशयाचे पत्र  राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांना पाठविले असल्याचे  सौ. मुमताज मुलाणी यांनी निवेदनात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या लेटर पॅड वर दिलेल्या निवेदनामध्ये मुमताज मुलाणी यांनी म्हटले आहे की,  गेल्या पाच वर्षापासून महिला तालुका कार्याध्यक्ष या पदावर कार्यरत असून, पक्ष वाढीसाठी सर्व प्रकारे प्रयत्न करून,तसेच विविध बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्रित करणे,त्यांना व्यावसायिक मार्गदर्शन करणे, अशी कार्य करून लोकप्रियता मिळवली आहे. गेली पाच वर्षे निपक्षपाती पणे निस्वार्थ पक्षवाढीसाठी प्रयत्न केले. पक्षाच्या विविध निवडणुकांमध्ये पक्षाच्या आदेशानुसार सक्रिय होऊन पक्ष देईल...

सातारा-पंढरपूर रस्त्याच्या काँक्रिटला भेगा पडल्या रमेश उबाळे यांचा आरोप.रस्त्याच्या भरावाला काळी माती वापरली, कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन.

Image
सातारा-पंढरपूर रस्त्याच्या काँक्रिटला भेगा पडल्या रमेश उबाळे यांचा आरोप.रस्त्याच्या भरावाला काळी माती वापरली, कामामध्ये मोठा भ्रष्टाचार, पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवेदन.  कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.    सातारा- लातूर या राष्ट्रीय महामार्गाच्या काम करताना कॉंक्रिट टाकण्यापूर्वी रस्ता मजबुतीसाठी दर्जेदार मुरूम, खडी वापरण्याची गरज असते परंतु संबंधीत ठेकेदाराने असे न करता चक्क मोठे दगड तसेच काळी माती वापरल्याने काही ठिकाणी रस्ता खचला असून समेंट काँक्रिटला भेगा पडल्या असल्याने या रस्त्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असून संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी थेटा दिल्ली दरबारी असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी निवेदन वजा  पत्र लिहून केला आहे एकीकडे काँक्रिट रस्ता ४०-  ५० वर्षे टिकत असल्याच्या मंत्री,नेत्यांकडून सांगण्यात   येत  असताना दोन-तीन  वर्षामधेच रस्त्याला भेगा पडत असल्याचे रमेश उबाळे यांनी  जनतेच्या निदर्शनास आणल्याने  मोठी खळबळ उडाली...

खटावचे माजी तहसीलदार विलासराव गडांकुश यांचे निधन.

Image
खटावचे माजी तहसीलदार विलासराव गडांकुश यांचे निधन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. वडूज दि: चिंचणेर (निम)ता. सातारा येथील मूळ रहिवाशी व खटावचे माजी तहसीलदार विलासराव खाशाबा गडांकुश वय-७३ यांचे अल्पशा आजाराने वडूज ता खटाव येथील राहत्या घरी निधन झाले. महसूल विभागात गोदाम रक्षक म्हणून त्यांनी सेवेला सुरुवात केली होती. वाई, पुणे, कोरेगाव, सातारा,वडूज याठिकाणी त्यांनी कामकाज केले. गेली अनेक वर्षांपासून वडूज येथे ते नोकरी निमित्त स्थाहिक झाले होते.  खटाव तहसीलदार पदावरून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित मुलगा कुणाल, कन्या, सुना, नातवंड, जावई, सून असा मोठा परिवार होता. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कुणाल गडांकुश यांचे ते वडिल होते.

खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम.उपाध्यक्षपदी सचिन सुकटे, इम्रान जमादार तर सचिवपदी नितीन राऊत.

Image
खटाव तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश कदम.उपाध्यक्षपदी सचिन सुकटे, इम्रान जमादार तर सचिवपदी नितीन राऊत. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. जेष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके आणि पांडुरंग तारळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वानुमते निवडण्यात आलेली  खटाव तालुका मराठी पत्रकारपरिषद संघाची कार्यकारिणी शनिवारी  जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी अविनाश कदम यांची तर उपाध्यक्षपदी औंध प्रतिनिधी सचिन सुकटे ( सर ) आणि इम्रान जमादार यांची निवड करण्यात आली. सचिवपदी जेष्ठ पत्रकार नितीन राऊत, सहसचिवपदी विशाल सुर्यवंशी, कोषाध्यक्ष विठ्ठल नलवडे, दिपक नामदे, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार विनायक भिसे, अजित जगताप तर प्रसिद्धी प्रमुख पदी ऋषिकेश पवार यांचीसर्वानुमते  निवड करण्यात आली.वडूज येथील समर्थ करियर ॲकॅडमी येथे शनिवारी झालेल्या बैठकीत पत्रकार  फिरोज मुलाणी ( सर ), विलासराव आपटे,  पद्मनील कणसे, रशिद शेख, सर्फराज बागवान, केदार जोशी, निसारभाई शिकलगार, दिपक नामदे, सतीश डोंगरे, सौरभ चव्हाण, विठ्ठल नलवडे, खलील मुलाणी, दत्ता कोळी...

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम मेहबूब खान यांचे निधन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार.

Image
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक इब्राहिम मेहबूब खान यांचे निधन; शासकीय इतमामात झाले अंत्यसंस्कार. कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.  गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यातील ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व कोरेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष इब्राहिम मेहबूब खान वय९१, यांचे शुक्रवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निसार खान व व्यावसायिक मुस्ताक खान यांचे ते वडील होत. शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.इब्राहिम मेहबूब खान यांनी प्रतिकूल परिस्थितीतून वाटचाल केली. त्यांनी गोवा मुक्ती स्वातंत्र्य लढ्यात हिरहिरीने भाग घेतला. त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना उच्च विद्या विभूषित केले. कोरेगाव मुस्लिम समाजाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगले काम केले.  समाजामध्ये एकोपा वाढीस लागावा यासाठी वेगवेगळे निर्णय घेतले. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अमोल कदम, निवासी नायब तहसीलदार सुयोग बेंद्रे, मंडल अधिकारी शिवाजीराव पिसाळ, तलाठी किरण पवार यांनी प्रशासनाच्यावतीने त्यांना श्र...

कोरेगाव शहरावर लादण्यात आलेल्या अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी कोरेगाव बचाव संघर्ष समितीचा कोरेगाव शहरातून मोर्चा.

Image
कोरेगाव शहरावर लादण्यात आल्या अन्यायकारक विकास आराखडा रद्द करण्याच्या मागणीसाठी कोरेगाव बचाव संघर्ष समितीचा कोरेगाव शहरातून मोर्चा. कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.  कोरेगाव. 6 फेब्रुवारी कोरेगाव  शहरावर शासनाच्या वतीने लादण्यात आलेला अन्यायकारक शहर विकास आराखडा हा कोरेगावातील मूळ शेतकऱ्यांना भूमिहीन करणारा असून कोरेगाव शहरातील नागरिकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे..त्यांच्या जमिनी आरक्षित केल्यास त्यांच्यावर अन्याय होणार आहे.. आधीच जमिनी कमी असताना आरक्षण झाल्यास आम्ही भूमिहीन होत आहोत.. उर्वरित जमिनीवर कोणतीही बँक कर्ज, गहाण, तारण देणार नाही.. येणाऱ्या पिढीस कोणत्याही प्रकारच्या जमिनी शिल्लक राहणार नाही..कोरेगावकरांना कधीही शंभर फूट, पन्नास फूट रस्त्याची आवश्यकता नव्हती आणि पुढील वीस वर्षात लागणार नाही.. तरीही आमच्या जमिनीत रस्त्यात घालून आम्हाला भूमिहीन करण्याचा शासनाचा डाव आहे.. याच्या विरोधात कोरेगाव बचाव संघर्ष समितीच्या वतीने कोरेगाव शहरातून मोर्चा काढण्यात आला.. यामध्ये जमिनी आरक्षित करून आम्हास भूमिहीन करू नये आणि कोरेगावकरांवर लादण्यात आलेला अन्यायकारक वि...

आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे वेटणे व रणसिंगवाडी गावांना आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर.

Image
आमदार महेश शिंदे यांच्या प्रयत्नामुळे वेटणे व रणसिंगवाडी गावांना आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. रणसिंगवाडी व वेटणे या डोंगर भागातील गावांना शेतीसाठी पाणी मिळण्यासाठी आंधळी बोगद्यातून उपसा जलसिंचन योजना मंजूर करून दोन्ही गावाचे नंदनवन करणाऱ्या महाराष्ट्रातील लोकप्रिय व खटाव व कोरेगाव मतदार संघाचे दमदार आमदार महेशदादा शिंदे यांचा वेटणे व रणसिंगवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच अविनाश रणसिंग, ग्रामपंचायत सदस्य हनुमान जाधव ,जगन्नाथ रणसिंग, सूर्यकांत फडतरे ,राहुल फडतरे ,सोमनाथ रणसिंग, रविकांत जाधव ,सोमनाथ फडतरे ,सुनील पाटील, अशोक निंबाळकर ,भीमराव फडतरे ,रावसाहेब फडतरे, जालिंदर रणसिंग, अंकुश शिंदे, बबन पोतेकर ,ज्योतीराम घाडगे, राजेंद्र जाधव, कानिफनाथ रणसिंग ,प्रसाद रणसिंग, आदी दोन्ही गावचे ग्रामस्थ, ज्येष्ठ नागरिक, विविध मंडळाचे पदाधिकारी, यांची उपस्थिती होती.

हम तो राधे शाम कहेंगे हम तो सीताराम कहेंगे.." माननीय श्री इंद्रजीत देशमुख.

Image
हम तो राधे शाम कहेंगे हम तो  सीताराम कहेंगे.."  माननीय श्री इंद्रजीत देशमुख. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला. सरस्वती विद्यालय कोरेगाव वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ व कृतज्ञता पंधरवडा समारोप कार्यक्रमात शिवम प्रतिष्ठान संस्थापक माननीय श्री इंद्रजीत देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.त्यांनी सुरुवातीलाच उपस्थित विद्यार्थांना *"हम तो राधे शाम कहेंगे हम तो  सीताराम कहेंगे.." जयजय करीत प्रोत्साहित केले. यावेळी मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री किशोर बाचल मुख्याध्यापक एस व्ही भातखंडे उपमुख्याध्यापक आर बी बर्गे पर्यवेक्षक वाय एस जाधव यासह शालेय समितीचे चेअरमन डॉक्टर श्री सच्चिदानंद गोसावी माननीय श्री हितेश खेडा माननीय श्री अनंत भूषण शहा माननीय श्री सागर भुंजे आदी मान्यवर उपस्थित होते.सरस्वती विद्यालयात शनिवार दिनांक 4 फेब्रुवारी सकाळी डॉक्टर श्री सच्चिदानंद गोसावी यांच्या हस्ते ध्वजारोहण व उद्घाटन करण्यात आले.चित्रकला प्रदर्शनाचे उद्घाटन श्री अनंत भूषण शहा, रंगावली प्रदर्शन चे उद्घाटन श्री रजनीकांत भंडारी मास्टरिंग इंग्लिश दालन उद्घाटन श्री प्रेमजी ...

राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप.

Image
राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर येथे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप. कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.  राजे उमाजी नाईक यांच्या पुण्यतिथी निमित्त कोरेगाव येथील प्राथमिक शाळा लक्ष्मी नगर येथे दिनांक 3/2/2023 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून साजरी करण्यात आली त्यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थी व  शिक्षक व उमाजी नाईक सरकार ग्रुप कोरेगाव व रामोशी समाज मित्रपरिवार यांच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. 

प्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : रामचंद्र (राम ) जाधव.

Image
प्रविण गोसावी यांच्यावर कारवाई करा अन्यथा आंदोलन करणार : रामचंद्र (राम ) जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव येथील भवानीनगर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे पगारी शिक्षक प्रविण गोसावी यांनी आपल्या जागी कायद्याची पायमल्ली करून अध्यापनासाठी डमी शिक्षक नेमला आहे. तसेच मुख्याध्यापक पदाच्या कालावधीत कोणतेही काम न करता हजारो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. तरी संबंधित शिक्षकावर तात्काळ चौकशी करून निलंबित करावे, अन्यथा ८ दिवसात मुख्य कार्यकारी अधिकारी ऑफिससामोर उपोषण करणार असल्याचा इशारा पुसेगाव राष्ट्रवादी शहराध्यक्ष राम जाधव यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. राम जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, प्रविण गोसावी हे पुसेगाव येथील भवानीनगर शाळेत गेली पावणे पाच वर्षापासून कार्यरत आहेत. दोन वर्षे प्रभारी त्यांनी मुख्याध्यापक पदाचा कार्यभार  सांभाळला. या कालावधीत शासनाकडून शाळेच्या खर्चासाठी ५० हजार अनुदान आले होते. श्री गोसावी यांनी मेडिकल, स्टेशनरी आणि फर्निचर इत्यादींची बिले सादर करून दुकानदारांच्या नावावर चेक काढले. मात्र काही दुकानदारांकडून वस्तू खरेदी करण्याऐवजी रोख रक...

कोरेगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील बोतलजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त; महसूल विभागातर्फे शानदार कार्यक्रमात निरोप, कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती.

Image
कोरेगाव तहसील कार्यालयातील अव्वल कारकून सुनील बोतलजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त; महसूल विभागातर्फे शानदार कार्यक्रमात निरोप, कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती. कोरेगाव प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.  कोरेगाव तहसील कार्यालयातील एकात्मिक नागरिक सुविधा केंद्र अर्थात सेतू कार्यालयातील अहवाल कारकून सुनील वसंतराव बोतलजी हे प्रदीर्घ शासकीय सेवेतून मंगळवारी निवृत्त झाले. कोरेगाव महसूल उपविभागातर्फे प्रांताधिकारी कार्यालयातील सभागृहात एका शानदार कार्यक्रमात त्यांना सहकुटुंब निरोप देण्यात आला. यावेळी कोरेगावकर नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.अंशकालीन कर्मचारी म्हणून आपल्या शासकीय सेवेची सुरुवात करणारे सुनील बोतलजी हे सर्वसामान्य जनतेचे एक आशास्थान आहे. त्यांनी नोकरीच्या प्रत्येक टप्प्यात सर्वसामान्यांच्या हितासाठीच काम केले. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा विभाग, जावली तालुका, भूसंपादन विभाग आदी ठिकाणी त्यांनी महसूल सहाय्यक व अव्वल कारकून म्हणून सेवा बजावली. कोरेगावात बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या गावाच्या हिताची अनेक कामे केली. त्यांच्याकडे सर्वसामान्यांशी निगडित असलेल्या पु...