Posts

Showing posts from November, 2023

सातारा जिल्ह्यातील युवकांसाठी उंच भरारी योजना प्रेरणास्थान.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख.

Image
सातारा जिल्ह्यातील युवकांसाठी उंच भरारी योजना  प्रेरणास्थान.जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. सातारा जिल्ह्यातील सुशिक्षित व बेरोजगार युवकांना योग्य मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून त्यांच्या कल्याणासाठी तसेच विकासासाठी समुपदेशन ,मनसोपचार, शिक्षण, कौशल्य विकास, खेळ ,रोजगार अशा तरतुदी करण्यासाठी उंच भरारी योजना सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येत आहे त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील 18 ते 30 या वयोगटातील युवक युवती व त्यांचे पालक यांच्याशी संवाद साधून त्यांना त्यांच्या आवडीनुसार नोकरी किंवा रोजगार उपलब्ध करून देणे तसेच त्यांना स्वतःच्या व्यवसायिक कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येत आहे आज रोजी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन यांच्या माध्यमातून 45 दिवसांचे प्रशिक्षणाकरिता सातारा जिल्ह्यातून  हॉटेल मॅनेजमेंट,  दुचाकी मेकॅनिकल,  चार चाकी मेकॅनिकल, प्लंबिंग , वेल्डिंग , अशीस्टंट इलेक्ट्रिशियन या कोर्सचे प्रशिक्षणाकरिता एकूण 58 युवकांना सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री समीर शेख व  अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती आचल दलाल यांनी  मा...

सौ शशिकला भगत महिला अष्टपैलू व्यक्तिमत्व होते - माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत.

Image
सौ शशिकला भगत महिला अष्टपैलू व्यक्तिमत्व होते - माजी कृषी मंत्री सदाभाऊ खोत.            पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. काही ठराविक महिला राजकीय, सामाजिक  क्षेत्रात ठसा उमटवतात असेच एक धडाडीचे वादळी व्यक्तिमत्व म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ शशिकाला भगत या होत्या त्यांच्या  जाण्याने समाजात कधीही भरून न येणारी  पोकळी निर्माण झाली आहे अशी भावपूर्ण श्रद्धांजली माजी  कृषिमंत्री सदाभाऊ खोत  यांनी जाखणगाव येथे अर्पण केली जाखणगाव ता खटाव येथील शेतकरी नेते तसेच येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत व सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भगत यांच्या मातोश्री सौ शशिकला बाबासाहेब भगत यांचा जाखनगाव ता. खटाव जि. सातारा येथे वयाच्या 76 व्या  वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले यांच्या तिसऱ्याच्या विधी वेळी माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत  हे श्रद्धांजली अर्पण करत होते यावेळी जेष्ठ नेते बाळासाहेब इंगळे, श्रीकांत लावंड, राजेंद्र कचरे ,ज्योतीनाना सावंत,  ऍड .अनिल गोडसे आरपीआयचे गणेश भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.जाखणगावच्या शिंदे घराण्यातील माहेरवाशींनी अ...

कोरेगाव पंचायत समितीत,संविधान दिन उत्साहात.

Image
कोरेगाव पंचायत समितीत, संविधान दिन उत्साहात.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  कोरेगाव, दिनांक 27: येथील पंचायत समिती कार्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी श्री .किशोर माने, सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेचे म्हणजेच प्रस्तावनेचे सामूहिक वाचन करण्यात आले. गटविकास अधिकारी श्री. माने यांनी उद्देशिकेचे महत्त्व सर्वांसमोर विशद केले .यावेळी श्री माने म्हणाले," घटनेची प्रस्तावना म्हणजेच घटनेची गुरुकिल्ली आहे. तिलाच उद्देशिका अथवा घटनेचा सरनामा देखील म्हणतात .या उद्देशिकेमध्ये सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य भारत घडवण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करण्यात आला आहे .तसेच  समानता,स्वातंत्र्य ,न्याय या मूल्यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे .व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रत्येक नागरिकामध्ये प्रवर्धित करण्याचा संकल्प उद्देशिकेमध्ये करण्यात आला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समानता, व्यक्ती प्रतिष्ठा, बंधुता या मू...

हिवरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करताना आमदार महेश शिंदे, माजी सरपंच अजित खताळ, सरपंच सुरेखा खताळ, उपसरपंच समाधान शिंदे व मान्यवर.

Image
 हिवरे येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्यानंतर त्यांचे स्वागत करताना :-आमदार महेश शिंदे, माजी सरपंच अजित खताळ, सरपंच सुरेखा खताळ, उपसरपंच समाधान शिंदे व मान्यवर.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. खटाव पाठोपाठ कोरेगाव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधून कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे गटात जोरदार इनकमिंग; भाडळे खोऱ्यात आमदार महेश शिंदे गट झाला आणखी मजबूत; हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश आमदार महेश शिंदे यांचे दूरगामी नियोजन, जलदगतीने विकास कामे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे या त्रिसुत्रीला अनुसरून खटाव तालुक्यापाठोपाठ कोरेगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आमदार महेश शिंदे गटात जोरदार इन्कमिंग सुरू झाले आहे. दरूज पाठोपाठ हिवरे येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. हिवरे ग्रामपंचायतीमध्ये आमदार महेश शिंदे यांचे नेतृत्वाखाली सत्ता आहे. माजी सरपंच प्रकाश आगम, माजी उपसरपंच सुभ...

सौ शशिकला भगत यांचं निधन.

Image
सौ शशिकला भगत यांचं निधन. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. जाखणगाव ता. खटाव येथील सौ शशिकला बाबासाहेब भगत यांचे वयाच्या 76 व्या वर्षी वृद्धापकाळाने शुक्रवार 24 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता दवाखान्यात उपचारादरम्यान निधन झाले या शेतकरी नेते तसेच येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत व राजेंद्र भगत यांच्या आई होत.सौ शशिकला भगत या  राजकीय क्षेत्रात धडाडीने काम करणाऱ्या महिला होत्या. राजकीय, सामाजिक, लग्न जमवणे,  बिघडणारे प्रपंच बसवणे अशा सर्व स्तरात त्यांनी उल्लेखनीय काम केले. गोरगरिबांना मदत करणे, अडीअडचणी सोडवणे तसेच गाव पातळीवरील सामाजिक कामात हिरीरीने पुढाकार घेऊन काम करणाऱ्या धाडसी महिला म्हणून त्यांची परिसरात ओळख होती जाखणगावच्याच शिंदे घराण्यातील माहेरवाशींनी असल्यामुळे  गाव पातळीवरील राजकारणात त्यांचा प्रभाव कायम राहिला यामुळे जाखनगाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे   त्यांच्या पश्चात पती बाबासाहेब तसेच राजेंद्र भगत व संजय भगत अशी दोन मुले आणि सुना नातवंडे  असा परिवार आहे सावडण्याचा विधी रविवारी सकाळी जाखणगाव येथे सकाळी नऊ वाजता आहे.

मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ३ डिसेंबर ला संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांची संपूर्ण आरोग्य तपासणी.

Image
मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापनदिनानिमित्त ३ डिसेंबर ला संपूर्ण जिल्ह्यात पत्रकारांची  संपूर्ण आरोग्य तपासणी.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. सातारा मराठी पत्रकार परिषदेच्या ८५ व्या वर्धापनदिनानिमित्त  सातारा जिल्हा पत्रकार संघ ,डिजिटल मीडिया परिषद आणि क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण जिल्ह्यात पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये सर्व पत्रकारांसाठी विविध प्रकारच्या तपासण्या आणि रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रविवार, दि. ३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते १ या वेळेत या तपासण्या होणार आहेत. पत्रकारांना दैनंदिन जीवनात अनेक ताण तणावांना सामोरे जावे लागते. या परिस्थितीत स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. त्यामुळे मराठी पत्रकार परिषदेचा वर्धापनदिन हा पत्रकार आरोग्य तपासणी दिन साजरा करण्याचा निर्णय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी घेतला आहे. यानिमित्ताने राज्यभरात सुमारे १० हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकारांच...

विकसित भारत संकल्प यात्रेचा एकंबे येथे उत्साहात प्रारंभ.

Image
विकसित भारत संकल्प यात्रेचा एकंबे येथे उत्साहात प्रारंभ.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव, दिनांक २४: केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेतील सर्व घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी 'आपला संकल्प विकसित भारत' या ध्येयास अनुसरून 'विकसित भारत संकल्प यात्रेचा शुभारंभ तालुक्यातील एकंबे येथे उत्साहात झाला. यावेळी गटविकास अधिकारी किशोर माने, तहसीलदार डॉ. संगमेश कोडे, शासनाच्या विविध विभागांचे विस्तार अधिकारी , कर्मचारी, तसेच ग्रामसेवक सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते. यावेळी विविध योजनांची माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या योजना रथाचे पूजन करण्यात आले.* *घरकुल योजना ,उज्ज्वला योजना आयुष्मान भारत इत्यादी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचावी म्हणून या यात्रेचे नियोजन करण्यात आले आहे. यावेळी विविध लाभार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या.*  *त्यांना विविध योजनांचा लाभ कसा मिळाला ,याबाबत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या .गटविकास अधिकारी किशोर माने म्हणाले," विविध योजनांचा समाजातील विविध घटकांनी लाभ घ्यावा. ग्रामसेवक, तलाठी इत्यादी अधिकाऱ...

कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासाठीपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे.

Image
कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे. कोरेगाव, सातारा व खटाव तालुक्यात मूलभूत सोईसुविधा उपलब्ध होणार कोरेगाव : कोरेगाव विधानसभा मतदारसंघ संपूर्ण राज्यात आदर्शवत बनविण्याचे शिवधनुष्य हाती उचललेल्या आमदार महेश शिंदे यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी पुढाकार घेतला आहे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या आग्रहास्तव त्यांनी विकासकामे मंजूर केली आहेत. ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्यावतीने मतदारसंघातील मूलभूत सोईसुविधांसह विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. मतदारसंघातील प्रमुख शहरे आणि गावांमध्ये विकासाभिमूख कायापालट झालेला आहे, ग्रामीण भागात देखील रस्ते, गटर्स, सुशोभिकरणाची कामे सुरु आहेत. दलितवस्ती सुधार योजना, डोंगरी विकास योजनांसह राज्य सरकारच्या अनेकविध योजनांमधून मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकासनिधी मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी उपलब्ध करुन दिला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी देखील कोरेगाव मत...

पुसेगाव सुवर्णनगरीच्या विकासासाठी तीन कोटीचा निधी:-आमदार महेश शिंदे.

Image
पुसेगाव सुवर्णनगरीच्या विकासासाठी तीन कोटीचा निधी:-आमदार महेश शिंदे. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम. महाराष्ट्र राज्याबरोबरच कर्नाटकातील असंख्य भाविक भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या सुवर्णनगरी पुसेगावचा सर्वांगीण विकास करण्याचा निर्धार आमदार महेश शिंदे यांनी केला आहे. सद्गुरु परमपूज्य सेवागिरी महाराज रथ मार्गाचे ट्रीमिक्स काँक्रिटीकरण केले जाणार असून बंदिस्त गटारांची कामे देखील आता मार्गी लागले आहे. आमदार महेश शिंदे यांनी तीन कोटी रुपयांचा निधी त्यासाठी मंजूर केला आहे. सोमवारी सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रणधीर जाधव यांच्यासह विश्वस्त मंडळ व स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत आमदार महेश शिंदे यांनी विकासकामांच्या अनुषंगाने संपूर्ण रथ मार्गाची पाहणी केली.२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुसेगावच्या ग्रामस्थांनी विकास कामांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय घेत आमदार महेश शिंदे यांना विक्रमी मताधिक्य दिले होते. पुसेगावचा सर्वांगीण विकास करण्याचा शब्द देखील आमदार महेश शिंदे यांनी दिला होता. सद्गुरु परमपूज्य सेवागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या नगरीचा चौफेर विकास व्हावा, या...

कोरेगाव शहराचा आगामी पन्नास वर्षांचा पाणी प्रश्‍न निकाली.केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी, ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे.

Image
कोरेगाव शहराचा आगामी पन्नास वर्षांचा पाणी प्रश्‍न निकाली.केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजनेस मंजुरी, ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर : आमदार महेश शिंदे. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहराचा विकासात्मक कायापालट करत असताना आमदार महेश शिंदे यांनी आगामी पन्नास वर्षांचा पाणी प्रश्‍न निकाली काढला आहे. केंद्र सरकार पुरस्कृत अमृत २ अभियानामध्ये वाढीव पाणी पुरवठा योजनेस तांत्रिक मंजुरी देण्यात आली असून, ६६ कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. कृष्णा नदीमध्ये गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर योजनेच्या बंधार्‍याजवळ नवीन योजना कार्यान्वित केली जाणार आहे. ७० हजार लोकसंख्येसाठी प्रतिदिन साडेतीन लाख लीटर क्षमता असलेली ही पाणी योजना असून, एकूणच शहरवासियांना दिलेला शब्द पूर्ण केला असून, कोरेगावला सर्वाधिक मूलभूत सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत, अशी माहिती आमदार महेश शिंदे यांनी दिली. २०१९ मध्ये कोरेगावकर नागरिकांनी विक्रमी मताधिक्य देत विधानसभेत जाण्याची मोठी संधी उपलब्ध करुन दिली...

आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेल्या खेड नांदगिरीचे उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना आमदार महेश शिंदे, शेजारी संजय कदम, मदन कदम, अमरसिंह कदम, शरद कदम व धनवान कदम.

Image
आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केलेल्या खेड नांदगिरीचे उपसरपंच राजेंद्र कुमार कदम, प्रमोद उर्फ संजय कुमार कदम, ग्रामपंचायत सदस्य, विकास सोसायटीचे संचालक व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना  आमदार महेश शिंदे, शेजारी संजय कदम, मदन कदम, अमरसिंह कदम, शरद कदम व धनवान कदम.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कठापूर, तडवळे संमत कोरेगाव पाठोपाठ आता खेड नांदगिरी गावाचा होणार विकासाभिमुख कायापालट; आमदार महेश शिंदे यांनी मंजूर केला कोट्यवधी रुपयांचा विकास निधी, विद्यमान उपसरपंचांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश संपूर्ण राज्यात कोरेगाव विधानसभा मतदारसंघ आदर्शवत बनविण्याचे शिवधनुष्य उचललेल्या आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून खेड नांदगिरी येथील उपसरपंच राजेंद्र कुमार कदम यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी रविवारी आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. कठापूर, तडवळे संमत कोरेगाव या गावांपाठोपाठ आता खेड नांदगिरीचा विकासकामांद्वारे कायापालट करण्याचा ...

सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी केले रक्तदान; क्षेत्र माहुली येथे स्वर्गीय राजेंद्र इंगळे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात भावूक झाले आमदार, विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा केला निर्धार.

Image
सच्चा आणि निष्ठावंत कार्यकर्त्यासाठी आमदार महेश शिंदे यांनी केले रक्तदान; क्षेत्र माहुली येथे स्वर्गीय राजेंद्र इंगळे यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमात भावूक  झाले आमदार, विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा केला निर्धार.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांचे निष्ठावंत, कट्टर समर्थक आणि सच्चा पाठीराखा असलेले भारतीय जनता पक्षाचे सातारा तालुका अध्यक्ष राजेंद्र दगडू इंगळे यांचा स्मृतिदिन बुधवारी क्षेत्र माहुली येथे साजरा करण्यात आला. स्मृतिदिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये स्वत: रक्तदान करत आमदार महेश शिंदे यांनी मित्रत्वाचे नाते जपत मैत्री धर्म निभावला. त्यांनी इंगळे यांच्या विचारांचा वारसा पुढे चालविण्याचा निर्धार कार्यकर्त्यांसमोर केला. यावेळी ते भावूक झाले होते. यावेळी काडसिद्ध कोविड टास्क फोर्सच्या प्रमुख डॉ. सौ अरुणाताई बर्गे, सदस्य डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे उपस्थित होत्या.राजेंद्र इंगळे हे अत्यंत कार्यक्षम व हुशार कार्यकर्ते होते. भारतीय जनता पक्षाच्या सातारा तालुकाध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांनी पक्षाची अत्यंत चांगल्या पध...

रविवारी विटा येथे सर्व धर्मीय वधु-वर परिचय महामेळावा.

Image
रविवारी विटा येथे सर्व धर्मीय वधु-वर परिचय महामेळावा. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. सात जन्माच्या गाठी विवाह संस्था तासगाव-कवठेमहंकाळ यांच्या वतीने रविवार दिनांक १९ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत कृष्णलीला मंगल कार्यालय कराड रोड विटा (ता खानापूर) येथे सर्वधर्मीय वधु-वर परीचय महा मेळाव्याचे आयोजन केले असल्याची माहिती सागर पाटील (वायफळेकर) यांनी दिली असून,गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी बोलताना सागर पाटील पुढे म्हणाले की सकाळी दहा वाजता शिवदर्शन सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष उत्तम (नाना) जाधव यांच्या हस्ते व प्रसिद्ध वक्ते जनार्दन पाटील यांच्या प्रमुख   उपस्थितीत या महामेळाव्याचे उदघाटन होणार आहे.तरी गरजूंनी सदर मेळाव्यास अगदी वेळेत उपस्थित रहाण्याचे आवाहन केले असुन,इच्छुकांनी येताना सोबत बायोडाटा व फोटो आणण्यासही सांगितले आहे.तसेच अधिक माहितीसाठी ९५११६२७१६० या भ्रमणध्वनीवर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोरेगांव एस. टी. आगाराला दर्पण कॉम्प्युटर्सची दिवाळी भेट व दोनशे गाड्यांना दिले नवीन मार्गफलक.

Image
कोरेगांव एस. टी. आगाराला दर्पण कॉम्प्युटर्सची दिवाळी भेट व दोनशे गाड्यांना दिले नवीन मार्गफलक.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.   कोरेगांव : सातारा परिवहन विभागातील कोरेगांव एस. टी. आगारातील सर्व गाड्यांना येथील दर्पण कॉम्प्युटर्स एज्युकेशन सोसायटीच्या वतीने २०० मार्गफलक आज कोरेगांव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्या हस्ते व दर्पण एज्युकेशनचे अध्यक्ष संतोष नलावडे (सर), सोनेरी ग्रुपचे अध्यक्ष संतोष नलावडे यांच्या उपस्थितीत कोरेगांव आगार व्यवस्थापक अमित मलवडकर, वाहतूक निरीक्षक धीरज भुजबळ यांच्याकडे सुफुर्त करण्यात आले.यावेळी बोलताना राजाभाऊ बर्गे म्हणाले, दर्जेदार संगणक शिक्षणा बरोबरच सामजिक उपक्रमांमध्ये दर्पण कॉम्प्युटर्सचा नेहमीच खारीचा वाटा असतो. कोरेगांव तालुक्यात या संस्थेने आपलं वेगळेपण सिद्ध केले असून कोरेगांव आगाराला दिलेली मार्ग फलकांची भेट निश्चितच उपयुक्त असल्याचेही ते म्हणाले.प्रारंभी आगार व्यवस्थापक अमित मलवडकर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. दर्पण कॉम्प्युटर्सच्या वतीने देण्यात आलेल्या या अनोख्या दिवाळी भेटीचे कोरेगांव आगाराने स्वागत केले....

बोबडेवाडीचा बिनविरोध निवडणूक परंपरेचा आदर्श प्रेरणादायी: क्षीरसागर.

Image
बोबडेवाडीचा बिनविरोध निवडणूक परंपरेचा आदर्श प्रेरणादायी: क्षीरसागर. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. कोरेगाव, दिनांक 8: तालुक्यातील बोबडेवाडी ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया सरपंच आणि सात सदस्यांसाठी पार पडली. ही निवडणूक पूर्णतः बिनविरोध झाली. 1998 पासून या ग्रामपंचायतीची बिनविरोधची परंपरा आहे .ही परंपरा इतरांना आदर्श घेण्यासारखी आहे ,असे प्रतिपादन पंचायत समितीचे सांख्यिकी विस्ताराधिकारी तथा बोबडेवाडीचे निवडणूक निर्णय अधिकारी यशेंद्र क्षीरसागर यांनी केले. बिनविरोध निवडून आलेल्या सरपंच आणि सर्व सदस्यांना श्री.क्षीरसागर यांच्या हस्ते सन्मानपूर्वक राज्य निवडणूक आयोगाची प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली .त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नूतन सरपंच अरुणा संदीप बोबडे आणि सर्व नूतन सदस्य उपस्थित होते. श्री. क्षीरसागर म्हणाले," मतभेद आणि हेवेदावे या पलीकडे जाऊन विकासाचा विचार ग्राम पातळीवर रुजवणे गरजेचे आहे. हा विकासाचा विचार रुजवण्यासाठी गावात ऐक्य असणे गरजेचे आहे. नव्या युगातील समस्यांना सामोरे जाण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन गावाचा सर्वांगीण विकास करणे राज्यघटनेत अपेक्षित आहे. त्याद...

मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा की दरेगाव दौरा ? प्रशासनाने खुलासा करावा.अजित जगताप.

Image
मुख्यमंत्री शिंदे यांचा सातारा जिल्हा की दरेगाव दौरा ? प्रशासनाने खुलासा करावा.अजित जगताप.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. सातारा दि: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सातारा जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरे  ता. महाबळेश्वर जिल्हा सातारा आहे. आपल्या व्यस्त कार्यक्रमातून सवड काढून ते आपल्या जन्मभूमीत येतात. हे अभिमानास्पद बाब आहे. ते राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे शासकीय पातळीवर प्रोटोकॉल राबवण्यात येतो. पण त्यांचा हा नियोजित दौरा सातारा जिल्हा की दरेगाव ? एवढा मर्यादित आहे. याचा खुलासा जिल्हा पोलीस यंत्रणा व प्रशासनाने करावा अशी रास्त मागणी सातारा वासियांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सामाजिक न्याय विभागाचे सातारा जिल्हाध्यक्ष रमेश अनिल उबाळे यांनी केली आहे.गेल्या दीड वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यांमध्ये सत्तांतर घडल्यानंतर शिवसेनेचे लढाऊ नेते व राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौफेर यशस्वी कामगिरी केली आहे. सामान्य माणसाची नाळ असणाऱ्या नेता म्हणून त्यांचा गौरव आहे. ठाणे जिल्ह्यात त्यांनी केलेल्या कार्याची आजही लोक दखल घेत आहेत. परंतु, दी...

पुसेगाव पोलीस स्टेशनला 29 गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यात यश.

Image
पुसेगाव पोलीस स्टेशनला 29 गुन्ह्यातील फरारी आरोपीला पकडण्यात यश. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. वर्धनगड तालुका खटाव येथे अभय जाकीर काळे, मूळ राहणार मोळ, ता. खटाव जि .सातारा हा वर्धनगड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती सदरची गोपनीय माहिती मिळालेल्या पुसेगाव पोलीस ठाण्याकडील एक तपास पथक तयार करून मौजे वर्धनगड येथे आरोपीचा शोध घेत असताना एका घराच्या आडोशाला दबा धरून बसलेला अभय काळे याला पोलिसांनी सर्व बाजूंनी घेराव टाकला असताना आपल्याकडे पोलीस येत आहेत याची चाहूल लागताच आरोपी अभय काळे हा पळू लागला परंतु त्याचा पाठलाग करून पुसेगाव पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी व  कर्मचाऱ्यांनी धाडसाने  व शिताफिने त्याला पकडण्यात यश आले . त्याच्यावर सातारा जिल्ह्यातील पुसेगाव पोलीस ठाणे 18 गुन्हे ,कोरेगाव पोलीस ठाणे1 गुन्हा ,औंध पोलीस ठाणे 2 गुन्हा ,वडूज पोलीस ठाणे 1 गुन्हा ,दहिवडी पोलीस ठाणे 1 गुन्हा , म्हसवड पोलीस ठाणे 1 गुन्हा, उंब्रज पोलीस ठाणे 1 गुन्हा, फलटण शहर पोलीस ठाणे 1 गुन्हा ,सातारा शहर पोलीस ठाणे 2 गुन्हे ,कराड शहर पोलीस ठाणे 1 गुन्हा असे दाखल मालमत्तेच्या गंभीर गुन्ह्...

उंब्रज पोलिसांना काॅपर वायर चोरणारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश 15 लाख 4O हजाराचा मुद्देमाल हस्तगत.

Image
उंब्रज पोलिसांना काॅपर वायर चोरणारी टोळीच्या मुसक्या आवळण्यात यश 15 लाख 4O हजाराचा मुद्देमाल हस्तगत. पुसेगाव प्रतिनिधी, पंकज कदम.   पवनचक्कीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेणाऱ्या टोळीच्या उंब्रज पोलिसांनी मुसक्या आवळल्या.त्यांच्याकडून काॅपर वायरचे तुकडे, कुऱ्हाड, लाकडी दांडके, वायर कटर, टेम्पो ट्रँव्हलर असा सुमारे १५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.अनिल लक्ष्मण पवार (वय ४६) सुरेश बंडू निकम (वय ४०, (दोघेही रा. म्हारवंड, ता. पाटण), दादासो बळीराम सपकाळ (वय ५४, रा. बागलेवाडी, ता. पाटण), प्रकाश गुलाबराव जाधव (वय ५०, रा. कळंबे, ता. पाटण) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, सडावाघापूर-जांभेकरवाडी येथील सुझलाॅन कंपनीच्या साईटवर कंपनीचे कर्मचारी ३० ऑक्टोबर रोजी रात्री तीन वाजता गस्त घालत होते. त्यावेळी वरील संशयितांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना कुऱ्हाडीचा धाक दाखवून काॅपर वायर चोरून नेली. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी हा प्रकार तातडीने उंब्रज पोलिस आणि डायल ११२ला काॅल करून माहिती दिली. उंब्रज पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निर...

खटाव मध्ये 'मराठ्यांचा' एल्गार...सकल मराठी समाजाचा महिलांचे लाक्षणिक उपोषण.

Image
खटाव मध्ये 'मराठ्यांचा' एल्गार...सकल मराठी समाजाचा महिलांचे लाक्षणिक उपोषण. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. मराठा आरक्षण मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटत आहेत. सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. खटाव मध्ये उपोषणकर्ते मनोज जरांगे-पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज एकवटला आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज महिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करत निवेदन दिले. दरम्यान खटाव मधील सर्व संघटनांनी मराठा आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यावेळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाजातील महिलांनी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. यावेळी उपोषणकर्त्या महिलांनी तलाठी राज कदम यांना निवेदन दिले. यावेळी खटाव मधील सर्व संघटनांनी मराठा आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दिला.

कोरेगावच्या महिलेचा बेळगावात गौरवआदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्काराने उर्मिला सांळुखे सन्मानित.

Image
कोरेगावच्या महिलेचा बेळगावात गौरवआदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्काराने उर्मिला सांळुखे सन्मानित. पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. नॅशनल रुरल डेव्हलपमेंट फाऊंडेशन व इंटिग्रेटेड सोशल वेलफेअर सोसायटी बेळगावी यांच्यावतीने राष्ट्रीय आदर्श सरकारी नोकर गौरव पुरस्कार हा देशातील दिल्ली, गुजरात, गोवा, कर्नाटक व महाराष्ट्र या पाच राज्यातील निवडक व्यक्तींना देण्यात आला. यामध्ये महाराष्ट्र राज्यातून सातारा जिल्हयातील कोरेगाव पंचायत समितीच्या एकात्मिका बालविकास सेवा योजनेच्या अंगणवाडी सुपरवायझर श्रीमती उर्मिला रमेश साळुंखे यांना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय कायदा मंत्री विराप्पा मोईली यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, माजी खासदार बॅरिस्टर अमरसिंह पाटील, जिल्हा पोलीस प्रमुख महेश मेघण्णावर, जिल्हा कमांडंट अरविंद घट्टी, कोल्हापुर महानगरपालिकेचे महापौर राजु शिंगाडेसाहेब, सुरेश बसाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.श्रीमती उर्मिला साळुंखे यांनी आपल्या सामाजिक, शैक्षणिक, शासकिय व निमशासकिय क्षेत्रात उल्लेखनिय व अतुलनिय निस्वार्थ...