शुक्रवारी जाखणगाव येथे येस ग्रुपच्या सोयाबीन खरेदी केंद्र व गोदामाचा उद्घाटन समारंभ.

शुक्रवारी जाखणगाव येथे येस ग्रुपच्या सोयाबीन खरेदी केंद्र व  गोदामाचा  उद्घाटन समारंभ. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

                 जाखणगाव .ता. खटाव येथील येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी संचलित सोयाबीन खरेदी केंद्र क्रमांक -1 व गोदाम क्रमांक-1 चा उद्घाटन समारंभ शुक्रवार दिनांक 30 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र सहकार बोर्डाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद आकरे यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार असल्याची माहिती येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. उद्घाटन समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून येस बँकेचे महाव्यवस्थापक हरतेज सिंग, राज्य प्रकल्प व्यवस्थापक ज्योति शंखपाल,  इनपुट डिव्हिजनचे हेड पांडुरंग जाधव ,ऍग्रो बाजारचे रवींद्र साखरे, कृषी बाजारचे राज्यव्यवस्थापक कुशाग्र मुंगी , जिल्हा कृषीअधीक्षक विजयकुमार राऊत, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे ,तालुका कृषी अधिकारी राहुल जीतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न होईल यावेळी सर्व सभासद शेतकरी प्रगतशील शेतकरी सातारा जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष, सचिव शेतकरी गट व बचत गटांचे अध्यक्ष सचिव यांनी उपस्थित राहावे असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.