Posts

Showing posts from March, 2023

आर्यन सावंत यांचा सैनिक स्कूलमध्ये महाराष्ट्रात तिसरा क्रमांक.

Image
आर्यन सावंत यांचा सैनिक स्कूलमध्ये महाराष्ट्रात तिसरा क्रमांक. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. विसापूर तालुका खटाव येथील माजी सैनिक सुभेदार मेजर प्रल्हाद किसन सावंत व आजी सौ. पुष्पा सावंत यांचा नातू तर माजी सैनिक सतीश प्रल्हाद सावंत व सौ. ज्योती सावंत यांचा चिरंजीव आर्यन सतीश सावंत यांनी सैनिक स्कूलमध्ये 3OO  पैकी 268 गुण मिळवून महाराष्ट्र राज्यामध्ये तिसरा क्रमांक प्राप्त झाला व घवघवीत यश संपादन करण्यात आले या यशाबद्दल विसापूरचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत , युवा नेते पैे. बाळासाहेब सावंत, युवा नेते सागरभाऊ साळुंखे ,सरपंच जगताप मॅडम , उपसरपंच विठ्ठल साळुंखे, माजी उपसरपंच मुरलीधर साळुंखे, कैलास साळुंखे, शहाजी साळुंखे, निलेश कदम, नागेश कदम ,प्रदीप सावंत ,अविराज सावंत, अजित सावंत ,किशोर कदम ,योगेश साळुंखे, राहुल सावंत ,प्रवीण कुलकर्णी, गणेश सावंत (फौजी) आत्या मामा मामी. नात्यातील सर्व लोक व आजी-माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी ,विविध मंडळाचे अध्यक्ष ,विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी ,राजकीय, सामाजिक ,पत्रकार ,डॉक्टर, वकील, शिक्षक , महिलावर्ग यांनी आर्यन सावंत यांचे अभिनंदन क...

सोमंथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम जन्म सोहळा उत्साहात संपन्न.

Image
सोमंथळी येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम जन्म सोहळा उत्साहात संपन्न. फलटण प्रतिनिधी, अमोल मदने. ग्रामदैवत सोमंथळी फलटण येथील दक्षिण मुखी स्वयंभू श्री हनुमान मंदिर हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते .या मारुतीला नवश्या मारुती म्हणूनही संबोधले जाते आज दि.३० या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह नाम यज्ञ सोहळा संपन्न होत असताना सद्गुरु गोंदवलेकर महाराज जप संकुलन यांच्याकडून अखंड २५तास रामनाम जप २९- ३ -२०२३सकाळी ११ वाजेपासून ३० -३- २०२३ दुपारी बारापर्यंत अखंड २५ तास रामनाम संपन्न विना  पहारा सुरू करून रामनवमीचा राम जन्म सोहळा हजारोंच्या उपस्थितीत संपन्न हनुमान जयंती पर्यंत अनेक संत महात्मे यांचे प्रवचन कीर्तन त्याचबरोबर उत्सव साजरा होत आहे .या दक्षिणमुखी मारुतीचा जन्म पौर्णिमेला झाला असल्याने दरवर्षी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती उत्सव साजरा करण्याची परंपरा चालत आली आहे .ती ग्रामस्थांनी तशीच परंपरागत चालू ठेवली आहे ६- ४ -२०२३ पहाटे चार ते सहा या वेळेत संगीत व भजन सहा वाजून २५ मिनिटांनी गुलाल पुष्पांच्या उधळणीत हनुमान जन्मोत्सव सकाळी आठ ते नऊ या वेळेत गाव प्रदक्षिणा दुपारी तीन ...

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक छोटीशी सेवा या मावळ्यांकडून अर्पण.

Image
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एक छोटीशी सेवा या मावळ्यांकडून अर्पण.  पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम.  गडकिल्ल्यांवर होणा-या अपघातामुळे जखमी व्यक्तीला सुरक्षितपणे गडावरुन खाली आणता यावे , यासाठी अत्याधुनिक फोल्डेबल स्ट्रेचरची मागणी श्रीमंत घोरपडे सरकार प्रतिष्ठाणकडून रोटरी क्लब , सिंहगड रोड, पुणे यांच्याकडे केली होती.  ती मंजुर करण्यात आली, आणि  सदर फोल्डेबल स्ट्रेचर्सचा लोकार्पण सोहळा शनिवार दिनांक 18/3/2023 रोजी सायंकाळी 4.30 वाजता माती गणपती चौक , नारायण पेठ, पुणे येथील डॅा. मनोज देशपांडे सर यांच्या क्लिनिकवर करण्यात आला. याअगोदरही  पाच  स्ट्रेचर्स रोटरी क्लब, सिंहगड रोड, पुणे यांच्याकडून देण्यात आली होती , ती रायरेश्वर,केंजळगड,राजगड, तोरणा,शिवनेरी या महत्त्वाच्या गडांवर वितरित करण्यात आली होती.  परंतु  लवकरच आमच्या लक्षात आले , की हॅास्पिटलमध्ये पेशंटला स्ट्रेचर घेऊन जाणे वेगळे; व गडावरुन खाली घेऊन येणे वेगळे. त्याचबरोबर स्ट्रेचरची लांबी व वजन या महत्त्वाच्या समस्या होत्या. याबद्दल आमचे मित्र , पेशाने डॉक्टर व गडप्रेमी डॅा. मनोजरा...

कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी रशीद शेख यांची बिनविरोध निवड; गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव.

Image
कोरेगावात स्वीकृत नगरसेवकपदी रशीद शेख यांची बिनविरोध निवड; गुलालाची उधळण करत कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी मुस्लिम समाजातील कार्यकर्ते व आमदार महेश शिंदे यांचे कट्टर समर्थक रशीद शेख यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. निवडीनंतर नगरपंचायत कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करत गुलालाची उधळण करण्यात आली. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. स्वीकृत नगरसेवक ॲड. शशिकांत क्षीरसागर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने नगरसेवकपद रिक्त झाले होते. जिल्हाधिकारी रुचेस जयवंशी यांनी स्वीकृत नगरसेवक निवडीचा कार्यक्रम जाहीर केला होता. सोमवारी अध्यासी अधिकारी तथा प्रांताधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया राबविण्यात आली. रशीद शेख यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.  नगरपंचायत कार्यालयात झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी स्वीकृत नगरसेवक पदी रशीद शेख यांची निवड झाली असल्याचे जाहीर केले. यावेळी त्यांनी पुष्पहार घालून त्यांच...

रयत राज सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था मार्फत विविध समाजसेविका महिलांचा सन्मान.

Image
रयत राज सेवा संघ महाराष्ट्र व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था मार्फत विविध समाजसेविका महिलांचा सन्मान. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. सन्मान नारीशक्तीचा पुरस्कार सोहळा2023 वेदभवन मंगल कार्यालय येथे संपन्न झाला यावेळी रयतराज सेवा संघ महाराष्ट्र राज्य संस्थेच्या जिल्हाध्यक्ष वनिताताई जाधव व आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष सौ वनिताताई भंडारे व अश्वदीप सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष अरुणाताई लोखंडे यांच्या वतीने सन्मान नारीशक्तीचा गौरव पुरस्कार सोहळा वेदभवन सातारा येथे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख उपस्थिती सातारा जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे,जीवन बोराटे सोशल वर्क, जिल्हा परिषद सदस्या सौ मधुताई कांबळे ,व सचिव दत्तात्रय शिंदे, मारुती बोबडे, जनहित फाउंडेशन उपजिल्हाध्यक्ष काजल गायकवाड, नीलिमा भिंताडे, दक्षफाउंडेश अध्यक्ष कमल माळी नगरपालिके संघाच्या अध्यक्ष व उषा कुडाळकर सचिव विद्या जाधव योगा टीचर नयन कांबळे ,समाजसेविकाव सर्व इतर पदाधिकारी सूत्रसंचालन अरुणा लोखंडे यांनी केले तर वनिता जाधव यांनी आभार मानले. या कार्यक्रमास सातारा जिल्ह्यातून विविध संघटनेच्या महिला...

गुंडेवाडी येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शानदार शुभारंभ.

Image
गुंडेवाडी येथे दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शानदार शुभारंभ.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  गेली पन्नास वर्षे ग्रामपंचायत बिनविरोध करणाऱ्या गुंडेवाडी मराठा नगर तालुका खटाव येथील मायणीच्या सनगर वस्ती जवळून जाणाऱ्या काळ ओढ्यावर दोन सिमेंट बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ येथील सरपंच प्रतिनिधी शरद निकम यांच्या हस्ते झाला यावेळी खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीप येळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी राजाराम कचरे डॉक्टर सुशांत देशमुख मधुकर कचरे राजू झगडे एडवोकेट सुरज पाटील विकास अधिकारी एम एन जाधव यांची प्रमुख यांची उपस्थिती होती यावेळी शरद निकम म्हणाले की गुंडेवाडी हे गाव येरळा नदीच्या काठी असले तरी पूर्व भागात उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होते ही गरज लक्षात घेऊन   डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी या ओढ्यावर 22 लाख व दुसरा बंधारा 15 लाख या कामांना शासकीय मंजुरी मिळवली त्या कामाचा आज प्रत्यक्ष शुभारंभ होत आहे याचा आम्हाला अभिमान आहे यावेळी आपल्या भाषणात डॉक्टर दिलीपराव येळगावकर म्हणाले की टेंभूचे पाणी खटाव मानला मिळणे शक्य नाही कारण पाण्याचे वाटप झाले होते...

करारशेतीचे नवीन करार चैत्र पाडव्याच्या मुहूर्तापासून - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

Image
करारशेतीचे नवीन करार चैत्र पाडव्याच्या मुहूर्तापासून  - येस ग्रुप संस्थापक  संजय भगत.       पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.     जाखणगाव तालुका खटाव येथे चैत्र पाडव्यापासून सोयाबीन, घेवडा पिकाच्या करार शेतीचे करार करण्याची प्रक्रिया सुरू होणार असून करार शेतीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा झाला असून यावर्षी शेतकऱ्यांना  मुदतपूर्व बँक खात्यावरती रकमा जमा झाल्यानंतर शेतकऱ्यांनी एकमेकाला पेढे भरून आनंद व्यक्त केला हीच येस ग्रुपच्या करारशेतीची यशाची पोहोच असल्याचे मत येस ग्रुपचे संस्थापक  संजय भगत यांनी  व्यक्त केले.येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी तसेच मदर अर्थ हेल्प फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने येस ग्रुपच्या माध्यमातून करार शेती योजना राबवली जात असून या योजनेतील शेतकऱ्यांचे सोयाबीन व घेवडा या शेतमालाची पुर्नखरेदी वेळेत करून शेतकऱ्यांच्या खात्यावर रकमा जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी एकमेकांना पेढे भरून आनंद व्यक्त केला याप्रसंगी श्री. संजय भगत बोलत होते यावेळी कंपनी सचिव अरविंद विधाते, उपाध्यक्ष सौ. सारिकाताई शिंदे, संचालक श्...

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) यांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी सो यांना दिले निवेदन.

Image
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) यांच्यावतीने मा. जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले.  कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (A) महाराष्ट्र राज्य उपअध्यक्ष तथा जिल्हा अध्यक्ष, तसेच जिल्हा युवक अध्यक्ष सोमनाथ धोत्रे, कोरेगाव तालुका अध्यक्ष नितीन बोतालजी, व अल्पसंख्याक कोरेगाव ता. अध्यक्ष शौकत कुरेशी यांच्या वतीने मा.जिल्हाधिकारी सो यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे नमूद करण्यात आले, सुशिक्षित बेरोजगारांसाठी महा-ई-सेवा केंद्र त्वरित द्या गेल्या आठ ते दहा वर्षांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांची संख्या खूप वाढलेली आहे. त्यामुळे स्वयंरोजगार करण्यासाठी अनेक तरुण उत्सुक असतात. त्यांनी व्यावसायिक कोर्स केलेले असलेल्या पात्र उमेदवारांनी आपल्या कार्यालय मद्ये अनेक वेळा महा-ई-सेवा केंद्रासाठी अर्ज केलेले आहेत. परंतु या कार्यालयाने महा ई सेवा केंद्र जागा प्रत्येक तालुक्यामध्ये उपलब्ध असताना सुद्धा त्यांना ते मिळत नाहीत, तरी जिल्ह्यामध्ये असणाऱ्या अनेक बेरोजगारात तरुणांसाठी विभागावर महा-ई-सेवा केंद्रा वर पूर्तता आहे परंतु तालुक्याच्या स्तरात सुद्धा महा-ई...

मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार - माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर.

Image
मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार - माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. मायणीला तीर्थक्षेत्राचा ब वर्ग दर्जा प्राप्त करून देणार असे उद्गार संत सद्गुरु मातोश्री सरु ताई माऊली ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार डॉ.दिलीपरावजी येळगावकर यांनी सद्गुरु सरुताई यांच्या प्रकट दिनानिमित्त बोलताना काढले. यावेळी ट्रस्टचे सचिव रविंद्रशेठ बाबर,डॉ.एस.एन पवार,जालिंदर माळी,अंकुश रजपूत,पांडुरंग लोहार आदिंची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी वडूज येथील माळी बंधू यांनी २किलो १००ग्रॅम वजनाच्या सरूताईंच्या पादुका त्रस्टला अर्पण केल्या.त्याबद्दल माळी बंधू यांचा डॉ.येळगावकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.दिनांक १३ रोजी सकाळी सरुताई लिलामृत ग्रंथाचे वाचन करण्यात आले.रात्री९वाजता चींचनेर येथील प्रसिद्ध भारुडी भजनाचा कार्यक्रम झाला.सकाळी आरती नंतर अशोक महाराज मांडवे यांचे   सुश्राव्य कीर्तन झाले.दुपारी ठीक १२वाजता मा. आ.डॉ .येळगावकर यांच्या हस्ते महा आरती करण्यात आली.याप्रसंगी डॉ.येळगावकर म्हणाले,यापूर्वी मायणी ला देवस्थानचा क वर्ग दर्जा आम्ही मिळवू...

महिला दिनानिमित्त काशीळ येथे महिला मेळावा घेऊन घर दोघांचे जाणीव जनजागृती कार्यक्रम उत्सहात संपन्न.

Image
महिला दिनानिमित्त काशीळ येथे महिला मेळावा घेऊन घर दोघांचे जाणीव जनजागृती कार्यक्रम उत्सहात संपन्न.  सातारा 24 तास प्रतिनिधी, पंकज कदम.  महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा संचलित प्रगती लोक संचलित साधन केंद्र सातारा अंतर्गत काशीळ येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला मेळावा तसेच घर दोघांचे जाणीव जागृती अभियान कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला मा.विजय डोके सर जिल्हा समन्वय अधिकारी माविम , डॉ पल्लवी साठे, मा. फरांदे, मा. तरडे Dcc बँक, मा. भरत माने. काशीळ ग्रामपंचायत सरपंच.सदस्य.उपस्थित होते  या कार्यक्रम प्रसंगी गावातून रॅली काढण्यात आली. तसेच डॉ. पल्लवी साठे यांनी महिलांना आरोग्य तसेच आहार विषयी व महिलांच्या आरोग्याची काळजी हीच महिला दिनाच्या शुभेच्छा असे सांगत मार्गदर्शन केले. तर मा.DCO सर यांनी महिला दिन का साजरा केला जातो तसेच संयुक्त मालकी हक्क का महत्वाचे तसेच माविमच्या माध्यमातून राबवल्या जाणार्‍या योजना, स्मार्ट प्रकल्प तसेच तसेच महिलांना माल विक्री साठी पॅकिंग लेबलिंगचे प्रशिक्षण दिले जाईल. महिलांचा उत्पादन केलेला माल लवकरच विक्री सेंटर ला ठेऊ. आज महिल...

महिलांच्या आरोग्याची काळजी हीच महिला दिनाची शुभेच्छा : वैशालीताई शिंदे.

Image
महिलांच्या आरोग्याची काळजी हीच महिला दिनाची शुभेच्छा : वैशालीताई शिंदे. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जू मुल्ला.  कोरेगाव - दि. ८ : नगरपंचायती मध्ये सामान्य लोकांचे प्रतिनिधित्व करत अनेक विधायक उपक्रम प्रभावीपणे राबविणाऱ्या संजीवनी बर्गे यांनी महिलांच्या संपूर्ण आरोग्याची काळजी घेत आयोजित केलेले आरोग्य शिबीर हीच आजच्या महिला दिनाची एक सुंदर भेट असल्याचे प्रतिपादन सार्थक महिला बचत गट फेडरेशनच्या अध्यक्षा वैशालीताई शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.कोरेगाव नगरपंचायतीच्या विरोधीपक्ष नेत्या संजीवनी सचिन बर्गे व मा.नगरसेवक सचिन भैय्या बर्गे यांचे सौजन्याने कोरेगाव शहर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सहकार्याने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी सौ. शिंदे बोलत होत्या.कार्यक्रमास राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष संजनाताई जगदाळे, तालुका अध्यक्ष प्रतिभाताई बर्गे, माजी उपनगराध्यक्षा मंदाताई बर्गे, संगीताताई बर्गे, नगरसेविका मोनिका धनावडे आदी उपस्थित होत्या.प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक विरोधीपक्ष नेत्या संजीवनी बर्गे यांनी क...

फलटण येथे ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीने मीटिंग उत्साहात संपन्न.

Image
फलटण येथे ह्यूमन राईट फाउंडेशनऑफ इंडियाच्या    वतीने मीटिंग उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी, प्रवीण अहिवळे,   फलटण येथील शासकीय विश्रामगृह येथे मासिक मीटिंग ह्युमन राईट फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा अध्यक्ष श्री बबनराव मदनेउर्फ नाना साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग आयोजित करण्यात आली. या मीटिंग मधील प्रमुख पाहुणे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीर भोसले साहेब तसेच कथाकथन कार प्राध्यापक रवींद्र कोकरे सर उपस्थितीत होते. या वेळी बारामती तालुका ह्युमन राइट्स.फाउंडेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रेय दिनकर काळे .यांची खादी ग्राम उद्योग महामंडळ उपाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल. जिल्हा कमिटीचे सदस्य बाबुराव शिरतोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडियाचे सातारा जिल्हा कमिटीचे जनरल सेक्रेटरी श्री राजेंद्र मदने साहेब यांनी सन22/23 या वर्षातील उत्कृष्ट केलेल्या.कामगीरी.बद्धल प्रमुख पाहुणे कथा कथनकार प्रा.रवीद्र कोकरेसर यांच्याहास्ते.सत्कार करण्यात आला. तसेच या.कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा कमिटीचे जिल्हाध्यक्ष श्री बबनरा...

वर्धनगड घाटातील दाब हरण कुंड ( आउटलेट ) बंद करण्याचा जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकारी यांचा प्रयत्न ग्रामस्थांसह महिलांनी हाणून पाडला.

Image
वर्धनगड घाटातील दाब हरण कुंड  ( आउटलेट ) बंद करण्याचा जिहे कटापूर उपसा सिंचन अधिकारी यांचा प्रयत्न ग्रामस्थांसह महिलांनी हाणून पाडला ; सातारा 24 तास न्यूज. पुसेगाव प्रतिनिधी.पंकज कदम.  वर्धनगड घाटातील जिहे कटापूर योजनेच्या आऊटलेट वॉल्व( दाब हरण कुंड ) मधून वेस्टेज जाणारे पाणी रामोशीवाडी ता. कोरेगाव तलावात जाऊन तो तलाव भरल्या कारणाने तलावाच्या पाण्याचे परक्यूलेषणमूळे  तलावाच्या खालील असणाऱ्या विहिरीला पाणी राहून तसेच खाली असणाऱ्या नाला बिल्डिंग  या भरून राहिल्या कारणाने रामोशी वाडी  भाटमवाडी सह चिमणगाव पर्यंतच्या विहिरींना पाणी राहण्यासाठी मदत होत होती या पाण्याच्या माध्यमातून विहिरीला पाणी राहून पिण्याच्या पाण्याची सोय व जनावरांच्या पाण्याची सोय उपलब्ध होत होती,परंतु जिहे कटापूर योजनेच्या अधिकाऱ्यांनी आउटलेट जाणारे पाणी बंद करण्यासाठी आज वर्धनगड घाटातील वॉल्व वेल्डिंग करून पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला होता व हे वॉल्व बंद करण्यासाठी पोलीस प्रोटेक्शन घेतले होते. या वाल्व बंद निर्णया विरोधात आज रामोशी वाडी भाटमवाडी तसेच चिमणगाव येथील ग्रामस्थासह महिला...

राजवंश आठवडा बाजार संघटनेने दिली आठवडा बाजार करणाऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपयाची मदत.

Image
राजवंश आठवडा बाजार संघटनेने दिली आठवडा बाजार करणाऱ्या मृत व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपयाची मदत. कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.  पाचवड - गेले कित्येक वर्षे राजवंश आठवडा बाजार संघटना ही आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या हितासाठी स्थापन करण्यात आलेली संघटना असून काही दिवसांपूर्वी मंगळवार पाचवड आठवडे बाजारात खोलवडी येथील असणारे व तरकारी विकणारे चंदू माने यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला होता यामध्ये मोठ्या प्रमाणात हालाखीचे जीवन जगत असताना चंदू माने यांचे कुटुंबीय वेगवेगळ्या अडचणींना तोंड देत आहे याच अडचणींना काहीशा प्रमाणात मदत व्हावी म्हणून राजवंश आठवडा बाजार संघटनेने कोरेगाव तालुक्यातील विविध आठवडे बाजारामध्ये पैसे गोळा करून तब्बल ५० हजार रुपये इतकी मोठी वर्गणी गोळा केली.ही वर्गणी गोळा करण्यामध्ये संभाजी पिसाळ, विनोद पवार, जालिंदर शिंदे, संदीप यादव, सुनील निदान, दिलीप चव्हाण, शत्रुघ्न यादव, मंगेश गार्डी, मंगेश जाधव यांचा सिंहाचा वाटा मानला जातो.  चंदू माने या गरीब तरकारी विक्रेत्याची कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने राजवंश आठवडा ब...