Posts

Showing posts from August, 2026

धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न!

Image
धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न! फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, म्हसवड महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा आज, ३० ऑगस्ट २०२६ रोजी राधिका मंगल कार्यालय, सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले (सर) होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर (सर) यांच्या हस्ते झाले. वधू-वर परिचय मेळाव्यादरम्यान पालक व वधू-वरांना व्याख्याते रविंद्र कोकरे (सर), प्राथमिक शिक्षक बँकेचे मा. व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर (सर), संस्थेचे अध्यक्ष राहुल मासाळ साहेब तसेच राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अरविंद सुळ, युवा नेते बाबासो वाघमोडे, पत्रकार सचिन टेळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भिसे, युवा नेते भानुदास शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते विकास कचरे, सामाजिक कार्यकर्ते अमेय कुंडलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आय...

धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न!

Image
धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा उत्साहात संपन्न! फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने आदिशक्ती बहुउद्देशीय संस्था, म्हसवड महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित धनगर वधू-वर सूचक पालक मेळावा आज, ३० ऑगस्ट २०२६ रोजी राधिका मंगल कार्यालय, सोमंथळी, ता. फलटण, जि. सातारा येथे उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले (सर) होते, तर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव सोनवलकर (सर) यांच्या हस्ते झाले. वधू-वर परिचय मेळाव्यादरम्यान पालक व वधू-वरांना व्याख्याते रविंद्र कोकरे (सर), प्राथमिक शिक्षक बँकेचे मा. व्हाईस चेअरमन शशिकांत सोनवलकर (सर), संस्थेचे अध्यक्ष राहुल मासाळ साहेब तसेच राष्ट्रीय मानव अधिकार महिला व बाल संरक्षण परिषद, सातारा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सुळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कार्यक्रमास ज्येष्ठ नेते अरविंद सुळ, युवा नेते बाबासो वाघमोडे, पत्रकार सचिन टेळे साहेब, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ भिसे, युवा नेते भानुदास शेंडगे, सामाजिक कार्यकर्ते विकास कचरे, सामाजिक कार्यकर्ते अमेय कुंडलकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आय...

जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका सिद्धाली शहा यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते सन्मान.

Image
जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका सिद्धाली शहा यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते सन्मान. ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद; पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीसाठी दिल्या शुभेच्छा फलटण प्रतिनिधी : जुबेर कोतवाल. जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून ‘इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद झाल्याबद्दल फलटण नगरपरिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी नुकताच सन्मान करून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. कु. सिद्धाली शहा यांनी अत्यंत कमी वयात नगरपरिषद निवडणुकीच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश करून नगरसेविका म्हणून जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आल्याने फलटणच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या जागतिक विक्रमामुळे फलटणसह सातारा जिल्ह्याच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातही कौतुक व्यक्त होत आहे. या कामगिरीचे कौतुक करताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी समाधान व्यक्त केले. ते म्हणाले, “फलटणसारख्या निमशहरी भागातून मुली राजकारणात पाऊल टाकत आहेत आणि नेतृ...

जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांच्याकडून अनोखे रक्षाबंधन.

Image
जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली शहा यांच्याकडून अनोखे रक्षाबंधन. फलटण शहर पोलीस ठाण्यात पोलीस बांधवांसह महिला पोलिसांना बांधल्या राख्या  फलटण प्रतिनिधी:जुबेरभाई कोतवाल.  रक्षाबंधन हा केवळ सण नसून तो भाऊ बहिणीच्या अनमोल नात्याचा उत्सव आहे ज्यामध्ये बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या सुख, समृद्धी व दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात  माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून नगरसेविका कु.सिद्धाली शहा यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात पुरुष व महिला पोलिसांना राखी बांधून रक्षाबंधनाचा पवित्र सण साजरा केला. राखी पौर्णिमेचे औचित्य साधून  जगातील सर्वात तरुण नगरसेविका कु. सिद्धाली अनुप शहा यांनी माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून फलटण शहर पोलीस स्टेशन मध्ये पोलीस अधिकारी व अंमलदारांसोबत अत्यंत अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे केले. यावेळी कु.सिद्धाली शहा यांनी पोलीस स्टेशनमधील सर्व पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले. तसेच या उपक्रमाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यांनाही राखी बांधून एक आगळावेगळा आदर्श प्रस्था...

खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' सिद्धाली शहा यांचा विशेष सत्कार.

Image
खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' सिद्धाली शहा यांचा विशेष सत्कार. जलमंदिर पॅलेसवर महाराजांकडून कौतुकाचा वर्षाव; 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'मधील जागतिक कामगिरीबद्दल दिल्या शुभेच्छा. फलटण प्रतिनिधी:जुबेरभाई कोतवाल  फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका सिद्धाली अनुप शहा यांची 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'च्या वतीने 'जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका' म्हणून अधिकृत नोंद झाल्याबद्दल सातारा येथील जलमंदिर पॅलेस येथे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी त्यांचा विशेष सत्कार करून अभिनंदन केले. सिद्धाली शहा यांनी २१ डिसेंबर २०२५ रोजी अवघ्या २१ वर्षे, १० महिने आणि ५ दिवस वयात नगरसेवक पदाची धुरा सांभाळत हा जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे. या अद्वितीय कामगिरीचे कौतुक करताना, "आपल्या कर्तृत्वाचा हा गौरव असाच वाढत राहो आणि आपल्या हातून समाजसेवेचे उत्तम कार्य घडो," अशा शब्दांत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी सिद्धाली शहा यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. 'इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड्स'चे प्रमाणपत्र...

वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तत्काल पंचनामे व वन्यजीवन संघर्ष कमी करण्याच्या हाच मुख्य उद्देश - वनपाल राजाराम काशीद.

Image
वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तत्काल पंचनामे व वन्यजीवन संघर्ष कमी करण्याच्या हाच मुख्य उद्देश - वनपाल राजाराम काशीद   पुसेगाव प्रतिनिधी,पंकज कदम. खटाव तालुख्यातील पुसेगाव परिमंडळ मध्ये वनपाल व वनरक्षक वन्यजीव संवर्धनासाठी व वन्यप्राणी रक्षणासाठी भरपूर प्रयत्न करत आहेत एखादे ठिकाणी वन्यप्राणी जखमी झाला किंवा त्या गावात वन्य प्राणी आल्याचे समजल्यास तात्काळ वनपाल वनरक्षक वनसेवक तात्काळ जागेवर जात आहेत वन्य प्राण्यांकडून पशुहानी झाल्यास तात्काळ जागेवर जाऊन पंचनामा  करून वरिष्ठ कार्यालयास कागद पत्र तालुका ऑफिसला तात्काळ सादर केली जात आहेत वन्य जीवाचे प्राण वाचवण्यासाठी पुसेगाव परिमंडळातील वनपाल वनरक्षक आटोकाट प्रयत्न करत आहेत पुसेगाव परिमंडळात वन्यप्राणी यांच्या विषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जात आहे ग्रामस्थांना अन्नसाखळी विषयी जनजागृती केली जात आहे त्यामुळे एखाद्या गावात वन्य प्राणी दिसल्यास तात्काळ गावकरी वनपाल यांना संपर्क करत आहेत मानव वन्यजीव संघर्ष कमी होताना दिसत आहे ज्या भागात बिबट्यांचा वावर जास्त  आहे त्या ठिकाणी रात्रगस्त केली जात असून ल...

गायत्री देशमुखचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश.

Image
गायत्री देशमुखचे MPSC परीक्षेत दैदिप्यमान यश SEBC प्रवर्गातून मुलींमध्ये राज्यात द्वितीय क्रमांक; क्लास-१ अधिकारी होण्याचे ध्येय  पुसेगाव प्रतिनिधी, अकबर भालदार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेत फडतरवाडी बुध (ता. खटाव) येथील सुकन्या गायत्री अशोक देशमुख हिने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. मुद्रांक निरीक्षक/उपनिबंधक (श्रेणी-१) तसेच राज्यकर निरीक्षक (STI), वर्ग-२ या पदांसाठी झालेल्या निवड प्रक्रियेत तिची निवड झाली असून, SEBC प्रवर्गातून महाराष्ट्रातील मुलींमध्ये तिने द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तिच्या या यशामुळे फडतरवाडी बुधसह सातारा जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गायत्री देशमुख हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सैनिक स्कूल, सातारा येथे झाले. त्यानंतर तिने विद्या प्रतिष्ठान, बारामती येथून B.Sc. Agri Biotechnology ही पदवी पूर्ण केली. शिक्षणाबरोबरच स्पर्धा परीक्षेची तयारी करत तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले. गायत्रीचे वडील सैनिक स्कूल, सातारा येथे नोकरीस असून आई गृहिणी आहे. चार बहिणी व भाऊ अ...

बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलिसांचा दणका: ६७ केसेससह ५४ हजारांचा दंड वसूल.

Image
बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलिसांचा दणका: ६७ केसेससह ५४ हजारांचा दंड वसूल पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार. सातारा जिल्हयातील बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळले जावेत, या उद्देशाने पुसेगाव पोलीस ठाण्याने २१ ऑगस्ट २०२६ रोजी एक विशेष नाकाबंदी मोहीम राबवली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ६७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५४,००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.   पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुसेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनि नागनाथ खुणे आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. विसापूर फाटा व शिवाजी चौक परिसरात ही विशेष नाकाबंदी करण्यात आली होती.   या कारवाईदरम्यान केवळ दंडात्मक कारवाईच केली गेली नाही, तर शाळा, कॉलेज आणि एसटी स्टँड परिसरात हुल्लडबाजी करणाऱ्या 'रोडरोमिओ'वरही कडक कारवाई करण्यात आली. यामध्ये ६ वाहनांचे कर्कश आवाजाचे सायलन्सर आणि ७ प्रेशर हॉर्न जप्त करण्यात आले आहेत.   सपोनि नागनाथ खु...

कोरेगाव बायपाससाठी डीपीआर तयार करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश.

Image
कोरेगाव बायपाससाठी डीपीआर तयार करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश खासदार नितीनकाका पाटील यांच्या पाठपुराव्याला यश : सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांची माहिती  पुसेगाव/प्रतिनिधी, अकबर भालदार. कोरेगाव शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय करण्यासाठी प्रस्तावित बाह्यवळण मार्गाच्या मागणीला केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कोरेगाव बायपास उभारण्याबाबत निवेदन दिले. त्यानंतर गडकरी यांनी संबंधित विभागाला बायपासचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे निर्देश दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत रावसाहेब बर्गे यांनी दिली. कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात बुधवारी सायंकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत बर्गे यांनी ही माहिती दिली. यावेळी अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष आरिफभाई शेख आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष महेश बर्गे उपस्थित होते. कोरेगावमध...

मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण.

Image
मुधोजी हायस्कूलमध्ये विद्यार्थिनींना मोफत एस.टी. पासचे वितरण. फलटण प्रतिनिधी:जुबेर कोतवाल.  फलटण आगाराच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजनेअंतर्गत देण्यात येणारे मोफत बस पास मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील इयत्ता ५ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना शाळेतच वेळेत व शिस्तबद्ध पद्धतीने वितरित करण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थिनींच्या शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या दिलासादायक झाला आहे. या योजनेमुळे विद्यार्थिनींना शाळा व महाविद्यालयात ये-जा करण्यासाठी होणारा प्रवास खर्च मोठ्या प्रमाणात कमी झाला असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना उच्च शिक्षण घेण्यासाठीही या योजनेचा मोठा फायदा होत आहे. मोफत बस पास वेळेत उपलब्ध झाल्याने विद्यार्थिनींची आर्थिक बचत होण्याबरोबरच वेळही वाचत आहे. तसेच नियमित बससेवेचा लाभ मिळाल्यामुळे विद्यार्थिनींचा प्रवास अधिक सुरक्षित व सुखकर झाला आहे. मुधोजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थिनींना मोफत पास शाळेच्या ठिकाणीच उपलब्ध करून देण्यासाठी फलटण आगारातील वाहतूक नियंत्रक गोपी जाधव व प्रवीण अहिवळे...

साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल!

Image
साताऱ्याचे जिल्हाधिकारी श्री.संतोष पाटील यांना निवेदन; घरकुल पडताळणी करणाऱ्या भ्रष्ट अधिकारी/कर्मचाऱ्यांची होणार चौकशी!जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रकरणाची गंभीर दखल! फलटण प्रतिनिधी: जुबेर कोतवाल  फलटण तालुक्यामध्ये 131 ग्रामपंचायती असून प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना 2.0 मध्ये एकूण 8,900 लोकांना घरकुले मंजूर झालेली आहेत. पैकी यातील खरे लाभार्थी शोधले असता 2 हजार सुध्दा आकडा गाठता येणार नाही. तरी यातील अनेक लोकांना प्रत्यक्ष पाहणी केली असता पक्की घरे असल्याचे दिसून येत आहेत.  या शासनाच्या योजनेमध्ये गावठग्यांकडून गावचे धनधांडगे  लोक यांना घरकुलांची खिरापत वाटलेली दिसून येत आहे. गावगाड्यातील सत्ताधारी लोकांना हाताशी धरून आपली नावे बसवली  असल्याचे चित्र तालुक्यात दिसून येत आहे.यांना आता रोखले नाही तर हे घरकुले लुटणारे गावटगे यांची टोळी वाढतच जाईल. तर दुसरीकडे गावगाड्यातील बेघर लोक, दुसऱ्यांच्या घरात भाड्याने राहणारे लोक,पक्की घरी नसलेले लोक आजही या योजनेपासून वंचितच असल्याचे दिसून येत आहे. ज्यावेळी घरकुलांच्या नोंदणी झाल्यानंतर प्रत्यक्ष पडताळणी वेळी फलटण पंचायत ...

एक गाव एक ताईच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार व फलटण तालुका अध्यक्षपदी सौ. रझिया शेख यांची नियुक्ती.

Image
एक गाव एक ताईच्या वर्धापन दिनानिमित्त सत्कार व फलटण तालुका अध्यक्षपदी सौ. रझिया शेख यांची नियुक्ती. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण, दि. १६ ऑगस्ट २०२६ : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने ‘एक गाव एक ताई’ या संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध पदाधिकारी व प्रतिनिधींचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. रझिया शेख व सचिव श्री. मारुती टकले यांच्या उपस्थितीत ‘एक गाव एक ताई’ संस्थेचे संचालक श्री. विश्वाजीत भगवान मुनेश्वर, श्री. योगेश शेलार, श्री. अनिल देसाई, श्री. अमित बोडके, श्री. नंदकुमार खिरे तसेच सौ. वर्षा सपकाळ – सातारा जिल्हा प्रतिनिधी, सौ. मीनल खिरे – विभाग प्रतिनिधी, सौ. चित्रा झिरपे – सातारा तालुका प्रतिनिधी, सौ. वैशाली गुजर – खटाव तालुका प्रतिनिधी, सौ. मुक्ता चव्हाण – सातारा तालुका प्रतिनिधी, सौ. मृणाली जगदाळे – कोरेगाव तालुका प्रतिनिधी, सौ. अश्विनी कांबळे – कराड तालुका प्रतिनिधी, सौ. सुषमा चव्हाण – सातारा लीडर तालुका तसेच ‘एक गाव एक प्रतिनिधी’चे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते. य...

महात्मा एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

Image
महात्मा एज्युकेशन सोसायटीत स्वातंत्र्याचा ७९वा वर्धापन दिन उत्साहात साजरा. फलटण प्रतिनिधी : जुबेरभाई कोतवाल. भारतीय स्वातंत्र्याच्या ७९व्या वर्धापन दिनानिमित्त महात्मा एज्युकेशन सोसायटी, फलटणच्या वतीने चतुराबाई शिंदे बालक मंदिर, श्रीराम विद्यामंदिर प्राथमिक शाळा आणि आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकीहाळ होते. भारतीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा. विकास शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी महात्मा एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष शांताराम आवटे, माध्यमिक शालेय समितीच्या अध्यक्षा अलका बेडकीहाळ, प्राथमिक शालेय समितीचे अध्यक्ष रवींद्र ...

सांगवी तालुका फलटण येथील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.

Image
सांगवी तालुका फलटण येथील प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळेमध्ये 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न.  फलटण प्रतिनिधी,राजेंद्र मदने. 15 ऑगस्ट 2026 रोजी 80 वा भारतीय स्वातंत्र्य दिन ज्ञान प्रसार शिक्षण संस्था सातारा संचालित प्राथमिक माध्यमिक आश्रम शाळा सांगवी तालुका फलटण येथे मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी तसेच तालुका कमिटी चे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते या शाळेच्या ध्वजारणाचा श्रीफळ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री रणधीरजी भोसले साहेब यांच्या हस्ते वाढवण्यात आला ध्वजारोहण जिल्हा अध्यक्ष श्री बबनराव मदने साहेब यांच्या हस्ते करण्यात आला त्यानंतर राष्ट्रगीत म्हणण्यात आले व सलामी देण्यात आली मुलांना खाऊ वाटप करण्यात आले यावेळी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर व माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री नाळे जी एन सर तसेच हाके सर, सौ शेख मॅडम, सौ शिंदे मॅडम, श्रीमती गोडे मॅडम, येवले सर, गडकरी सर, पानसरे सर व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्ये...

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.

Image
श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन. कोरेगाव प्रतिनिधी, अज्जु मुल्ला. अतुल कबीर भोसले मु.पो.शिरंबे ता.कोरेगाव  जि.सातारा येथील रहिवाशी त्यांचा हसरा चेहरा,होतकरू,कष्टाळू,मनमिळाऊ, प्रगतशील शेतकरी होते श्री.अतुल कबीर भोसले वय ४४ यांच गुरुवार दिनांक १३/०८/२०२६ रोजी  रात्री ०२:३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले.त्यांच्या जाण्याने शिरंबे गावावर व  पंचक्रोशीतील शोककळा पसरली आहे. त्यांच्या पाश्र्चात्य आई,वडील,बहीण, पत्नी,मुलगा एक,मुली दोन असा परिवार आहे. त्यांच्यावर शिरंबे स्मशानभुमीत दुपारी ०१ नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. सावडणे व दशक्रिया विधी शुक्रवार दि. १४/०८/२०२६रोजी सकाळी ०८/३०शिरंबे स्मशानभूमीत होणार आहेत.

"कोर्टकेस नुसार संगणकाची रक्कम परत देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे शिक्षण संचालकाना आदेश"

Image
"कोर्टकेस नुसार संगणकाची रक्कम परत देण्याचे ग्रामविकास मंत्री यांचे शिक्षण संचालकाना आदेश" सोनवडी प्रतिनिधी,नासिर शेख. आज दि.8/8/2026रोजी शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बोराटवाडी ता.माण जि. सातारा येथे त्यांच्या निवासस्थानी सातारा जिल्ह्यातील सेवानिवृत संघटनेचे पदाधिकारी यानी भेट घेवून निवेदन दिले व चर्चा केली.तसेच मंत्री जयकुमार गोरे यानी शिक्षण संचालक शरद गोसावी याना संगणक रक्कम परत देण्याचा लेखी आदेश देवून व फोनवरुन चर्चा केली.सदरची रक्कम देण्याचे संचालक यानी मान्य केले.हे या संघटनेचे फार मोठे यश आहे. आजच्या निर्णयामुळे राज्यातील अनेक शिक्षकांच्या 5 हजार ते 6 लाख रु.पर्यंतच्या संगणक रकमा कोर्ट निर्णयानुसार लवकरच परत मिळतील. यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.ए. खाडे यांचे बंधू व भाजप कोअर कमिटीचे सदस्य सदाशिव खाडे व राज्य अध्यक्ष  मधुकर जंगम यानी मंत्री याना सविस्तर माहिती दिली.या चर्चेत जिल्हाअध्यक्ष मा.ए. खाडे,राज्य उपाध्यक्ष गजानन डाके,विभागीय संघटक कल्पना यादव,तालुकाअध्यक्ष आनंद ओंबासे,तालुकाअध्यक्ष अरुण गोसावी,कडेगाव तालुकाअध्यक्ष लक्ष्मण महापूरे, सरचि...

चायनिज मांज्या विकणाऱ्यांना मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा कडक इशारा;

Image
चायनिज मांज्या विकणाऱ्यांना मुख्याधिकारी निखिल जाधव यांचा कडक इशारा; फलटण प्रतिनिधी, जुबेर कोतवाल. नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर फलटण नगरपालिकेने चायनीज (नायलॉन) मांज्याच्या विक्रीविरोधात कठोर भूमिका घेतली असून, यापुढे फक्त दुकानदारांवरच नव्हे तर घरातून चायनीज (नायलॉन) मांजा विक्री करणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांसह पशू-पक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या या मांज्याच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पालिकेने कडक इशारा दिला आहे. नगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सोमवार, दि. १७ ऑगस्ट २०२६ रोजी नागपंचमीचा सण असल्याने विशेषतः तरुण वर्गाकडून शहरात मोठ्या प्रमाणावर पतंग उडविले जातात,यावेळी सर्रास चायनीज (नायलॉन) मांज्याचा वापर केला जातो. या मांज्यामुळे दुचाकीस्वार, पादचारी, लहान मुले तसेच पक्षी आणि इतर प्राण्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होतो. दरवर्षी अशा मांज्यामुळे अपघात आणि जखमी होण्याच्या घटना घडत असतात या पार्श्वभूमीवर फलटण नगर पालिकेने यंदा कठोर कारवाईचा निर्णय घेतला आहे. फलटण शहरातील दुकानदार, गाळेधारक तसेच घरातून पतंग व मांजा विक्री करणाऱ्या ...

कोरेगाव येथील पीडित कुटुंबास पुणे जमात शिकलगार संघाकडून ५१ हजार रुपयांची मदत.

Image
कोरेगाव येथील पीडित कुटुंबास पुणे जमात शिकलगार संघाकडून ५१ हजार रुपयांची मदत. पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम. विटा जवळील भाळवणी येथे येरळा नदीच्या पात्रात पाण्याच्या प्रवाहात अपघाती मृत्यू झालेल्या कोरेगाव तालुका कोरेगाव येथील उच्चशिक्षित युवती फिरदोस शिकलगार हिच्या दुःखात होरपळणाऱ्या कुटुंबाला पुणे जमात शिकलगार संघाच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली. हा कार्यक्रम कोरेगाव येथे त्यांच्या राहत्या घरी घेण्यात आला. संकटसमयी समाजाच्या माध्यमातून एक मायेचा हात देऊन कुटुंबाला सावरण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. हातचा घास गेल्याने कुटुंबावर मोठा आघात’झाला आहे मदतीचे वाटप करताना पुणे शिकलगार संघटनेचे अध्यक्ष सलीम शिकलगार म्हणाले, "हातातोंडाशी आलेली आणि उच्च शिक्षण घेणारी तरुण मुलगी अचानक सोडून गेल्याने शिकलगार कुटुंबावर आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या मोठा डोंगर कोसळला आहे. 'फूल ना फुलाची पाकळी' म्हणून पुणे जिल्हा शिकलगार संघटनेच्या वतीने ही मदत देण्यात येत आहे. पुढे बोलताना त्यांनी अपेक्षा व्यक्त केली की, *"कुटुंबातील उरलेली दोन लहान मुले भविष्यात...

'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे : स्नेहल जाधव.

Image
'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी किमान एक झाड लावून त्याचे संगोपन करावे :  स्नेहल जाधव.  पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम, सध्या पर्यावरण हे धोक्यात आले असून, पर्यावरणाचा परिणाम दैनंदिन जीवनावर लोकांच्या आरोग्यावर पडत असून, निरोगी आरोग्यासाठी व पर्यावरणातील ऑक्सिजन वाढीसाठी प्रत्येक विद्यार्थ्याने एक झाड लावणे आवश्यक आहे असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य स्नेहल जाधव यांनी केले.  जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भवानीनगर, पुसेगाव ता. खटाव जि. सातारा येथे 'माझा ऑक्सिजन, माझी जबाबदारी' या पर्यावरण जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थ्यांना वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या पर्यावरण संतुलनसाठी, वृक्ष लागवडीची गरज असून, केवळ वृक्ष लागवड न करता त्याची जोपासना व उत्तम प्रकारे जतन करणे ही आजच्या विद्यार्थ्यांच्यासह सर्वांची जबाबदारी असल्याचे  मार्गदर्शन करत वृक्षांचे पर्यावरणातील महत्त्व विशद केले. प्रत्येक व्यक...

निढळमध्येउसळला गुरुभक्तीचा महासागरहजारो भाविकांनी स्वीकारले स्वामींचे गुरुपद.

Image
निढळमध्येउसळला गुरुभक्तीचा महासागर हजारो भाविकांनी स्वीकारले स्वामींचे गुरुपद. पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम. गुरुचरणी श्रद्धा अर्पण करण्यासाठी हजारो भाविकांनी एकवटत श्री स्वामी समर्थ  श्रीपाद चॅरिटेबल ट्रस्ट ,प्रधान सेवा केंद्र, निढळ दरबार येथे गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला. दिवसभर स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. 'श्री स्वामी समर्थ'च्या जयघोषाने परिसर भक्तिमय झाला होता. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून दिवसभरात  भाविक व सेवेकऱ्यांनी विधिवत स्वामींचे गुरुपद स्वीकारून गुरुचरणी आपली श्रद्धा अर्पण केली. पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची लगबग सुरू होती. विविध भागांतून आलेल्या स्वामीभक्तांनी शिस्तबद्धपणे दर्शन घेत गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक आनंद अनुभवला. उत्सवाला बांधिलकीची जोड देत दरबारात आयोजित रक्तदान शिबीरासही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल ३५ भाविक व सेवेकऱ्यांनी रक्तदान करून सामाजिक सेवेचा आदर्श निर्माण केला. धार्मिक श्रद्धेसोबतच समाजोपयोगी उपक्रम राबविण्याची परंपरा या माध्यमातून अधोरेखित झाली. दिवसभर श्री स्...

राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विश्वंभर रणवरे सर्वगुण संपन्न नेतृत्व-रामचंद्र जाधवसर.

Image
राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील विश्वंभर रणवरे सर्वगुण संपन्न नेतृत्व-रामचंद्र जाधवसर. पुसेगाव/प्रतिनिधी, पंकज कदम. राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील श्री विश्वंभर रणवरे हे सर्व गुण संपन्न नेतृत्व आज आपल्या सेवेनंतर त्यांचा सेवेचा कार्यकाल संपला त्यांचा सेवापुर्ती कार्यक्रम करण्यात आला. आता सेवा संपली नसून आता  खऱ्या अर्थाने सुरू झाल्याचे भटक्या विमुक्त संघटनेचे राज्य सरचिटणीस रामचंद्र जाधव सर यांनी आपले मत व्यक्त केले. वडूज ता. खटाव येथे स्वयंवर मंगल कार्यालय येथे श्री विश्वंभर रणवरे यांच्या सेवापूर्ती समारंभ घेण्यात आला. यावेळी सामाजिक राजकीय व शैक्षणिक परिवारातील त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रामचंद्र जाधव सर  पत्रकारांशी बोलताना म्हणाले रणवरे सर हे एक शैक्षणिक क्षेत्रातील महागुरु होते तसेच त्यांनी सातारा जिल्हा शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा चे व्हाईस चेअरमन, जिल्हा परिषद केंद्रशाला सिद्धेश्वर कुरौली मुख्यध्यापक पदावर कार्यरत होते. त्यांचा सर्व कार्यकाल हा विद्यार्थ्यांच्या पालकांच्या तसेच शिक्षकांच्या...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रणरागिणी संस्थेच्या वतीने अभिवादन.

Image
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त रणरागिणी संस्थेच्या वतीने अभिवादन. फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. फलटण, दि. १ ऑगस्ट : रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था, फलटण यांच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्ष सौ. रझिया शेख, उपाध्यक्ष सौ. अनिसा सय्यद, प्राचार्य शेख शाहीन शेख, श्री. अतुल शहा, श्री. इमरान सय्यद, सौ. हिना सय्यद, सौ. प्रीती शहा, सौ. सना शेख, श्री. आप्पा कापसे व श्री. सतीश देसाई श्री मारुती टकले  यांच्यासह संस्थेचे सभासद, संचालक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी वक्त्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सामाजिक, साहित्यिक व परिवर्तनवादी कार्याचा गौरवपूर्ण आढावा घेतला. त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचा तसेच समाजातील वंचित घटकांच्या उन्नतीसाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे आयोजन रणरागिणी बहुउद्देशीय सामाजिक विकास संस्था...

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करावेत: अनिलकुमार

Image
शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करावेत: अनिलकुमार कदम.  फलटण प्रतिनिधी, राजेंद्र मदने. महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२६-२७ ही योजना राबविण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र राज्य एकता क्रांती दल शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मुक्त पत्रकार, लेखक, कवी,साहित्यिक आणि सेवानिवृत्त केंद्रप्रमुख अनिलकुमार कदम यांनी दिली आहे. अधिक माहिती देताना अनिलकुमार कदम म्हणाले की,"शेतक-यांनी ...