नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

नियमांचे पालन न करणाऱ्या बेशिस्त गणेश मंडळांच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील येणाऱ्या गाव व वाड्या वस्तीवरील सार्वजनिक गणेश मंडळांनी विद्युत रोषणाई व भक्तिभावात गणेश मूर्ती स्थापन केल्या परंतु काही सार्वजनिक गणेश मंडळे याचा गैरफायदा घेत असल्याचे दिसत असून शासन दरबारी व पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांसमोर गणेश मंडळाचे अध्यक्ष, सदस्य यांची गावागावात मीटिंग घेण्यात आली होती यामध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करावेच लागेल अशा अटीवर सार्वजनिक गणेश मंडळांना परवाने दिले होते परंतु बऱ्याच मंडळाच्या अध्यक्षांनी कायदेच्या कोणत्याही नियमाचे पालन न करता मोठ्या आवाजात  वाजणारे साऊड स्पीकर व डॉल्बीनच्या बॉक्सचा वापर करून मोठ्या आवाजात वाढीवस्तीवरील लोकांना व शाळेतील मुलांची व आजारी लोकांची डोकेदुखी वाढवली असून यांना आवर कोण घालणार असा प्रश्न वाडी वस्तीवरील लोक व ग्रामस्थ करीत आहेत संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी  अशा बेशिस्त  गणेश मंडळाच्या अध्यक्षांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे पोलीस पाटील गावागावात असतानाही त्यांच्या माध्यमातून निरोप दिला तरी मंडळाचे कार्यकर्ते ऐकत नसल्याचे दिसत आहे.त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला तर याला जबाबदार कोण असाही प्रश्न उद्भवत आहे अशा बेफिकीर गणेश मंडळाचे सदस्यत्व किंवा गणेश मंडळांवर बंदी घालावी अशी मागणी विविध गावातून व वाढीवस्तीवरून महिलावर्ग ,शाळेतील विद्यार्थी,  करीत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.