बोरगाव पोलिसांची दमदार कामगिरी तीन चोर व टेंपोसह५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
टेंपोसह५.९५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.
खोडद (ता.सातारा) येथे असलेलता संत निरंकारी मंडळाच्या कंपाउंडचे गेट उघडून तेथील पत्र्याचे शेड उचकटून सुमारे ३६ हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरून नेणाऱ्या तीन चोरट्याना केवळ २४ तासांत जेरबंद करण्यात बोरगाव पोलिसांना यश आले.निकेत वसंत पाटणकर (वय.२९),अनिकेत वसंत पाटणकर (वय.३०,दोघे रा.नवीन एम.आय.डी. सी,चंदननगर,कोडोली,सातारा) व गणेश धनंजय ननावरे (वय.२४,नांदगिरी, ता.कोरेगाव) अशी पकडलेल्या संशयितांची नावे आहेत.बोरगाव पोलिसांच्या या दमदार कामगिरीचे परिसरारून कौतुक होत आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खोडद गावच्या हद्दीत सातारा-कराड मार्गावर महामार्गानजीक संत निरंकारी मंडळाची जागा आहे.त्या जागेभोवती कंपाउंड केले असून तेथे पत्र्याचे शेड बांधले आहे.महेश माने हे या ठिकाणी देखभाल करत असतात.
या ठिकाणावरून अज्ञात चोरट्यांनी शेडच्या पत्र्याची पाने उचकटून पीव्हीसी पाईपा,लोखंडी पाईपा,प्लास्टिक टेबल,लोखंडी सळ्या,प्लास्टिक खुर्च्या,पत्र्याची पाने असा सुमारे ३६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यानी चोरून नेला.ही घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर देखभाल करणारे महेश सर्जेराव माने(वय.३२,रा.काशीळ,ता.सातारा) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली होती.
या चोरीचा तपास सपोनि चेतन मछले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रवीण शिंदे,राजू शिखरे,विजय साळुंखे,विशाल जाधव,दादा स्वामी,प्रशांत मोरे,राहुल भोये व धनंजय जाधव ही टीम करत असतानाच गोपनीय बातमीदाराकडुन एक पांढऱ्या रंगाचा टेम्पो चोरीचा माल घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.यावेळी पोलिसांनी सापळा रचून टाटा कंपनीचा टेंपो साहित्यासह पकडला.या टेम्पोसोबत असलेल्या निकेत पाटणकर,अनिकेत पाटणकर व गणेश ननावरे यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी खोडद येथील चोरीची कबुली दिली.पोलिसांनी खोडद चोरीतील २१ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल,तीन मोबाईल व टाटा टेंपो असा ५.९५ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Comments
Post a Comment