Posts

Showing posts from December, 2022

बागल दांपत्य समाजापुढे एक आदर्श ठरेल डॉ .अंबादास कदम.

Image
बागल दांपत्य समाजापुढे एक आदर्श ठरेल  डॉ .अंबादास कदम. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.  प्राध्यापक  लतिका बागल यांच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाच्या कार्यक्रमात बोलताना डॉक्टर अंबादास कदम म्हणाले  बागल दाम्पत्य हे समाजापुढे एक आदर्श ठरेल त्यांनी  छत्तीस वर्ष रयत शिक्षण संस्थेमध्ये सेवा करून आज त्या निवृत्त झाल्या .श्री व सौ बागल दांपत्य यांनी समाजाला फार मोठे आदर्श घालून दिलेले आहेत  35 वर्षांपूर्वी आपल्या समाजाची मानसिकता वेगळ्या पद्धतीची असतानाही फक्त एकाच मुलीवर कुटुंब पूर्ण करून त्याच मुली चे यथोचित संगोपन करून आज एमबीबीएस एमडी पथोलॉजी असे उच्च शिक्षण दिलेले आहे. अशा या बागल दांपत्यांचे यश कीर्ती चॅरिटेबल ट्रस्ट पुसेगाव व संजीवनी हॉस्पिटल पुसेगाव यांच्यातर्फे मी अंबादास कदम व संजीवनी कदम आम्ही दोघे त्यांचे स्वागत करतो व त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. 

बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर.

Image
बुध गावचे अंकुश जगदाळे यांना पोलीस महासंचालकांचे विशेष सेवा पदक जाहीर. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. बुध ता.खटाव येथील राज्य राखीव पोलीस दलामधून हल्लीच सेवानिवृत्त झालेले बुध गावचे रहिवासी श्री. अंकुश ज्ञानदेव जगदाळे यांना यावर्षीचे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांचेवतीने नक्षलग्रस्त विभागामध्ये प्रभावी कामगिरीसाठीचे विशेष सेवा पदक नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली आणि गोंदिया हा नक्षलग्रस्त भाग म्हणून जाहीर आहे. या जिल्ह्यांमध्ये आपल्या प्राणाची बाजी लावून सेवा बजावणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी यांना राजयचे पोलीस महासंचालक श्री. रजनीश सेठ यांनी एका आदेशाद्वारे  विशेष सेवा पदके जाहीर केलेली आहेत. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री. अंकुश जगदाळे यांनी सेवकाळात अत्यंत काटेकोरपणे व दक्षपणे सेवा केल्याबद्दल त्यांनाही या पदकाने सन्मानित करण्यात आले आहे. श्री जगदाळे यांनी भारतीय सैन्य दल व राखीव पोलीस दल यामध्ये एकूण तब्बल ३५ वर्षे सेवा बजावलेली आहे.राखीव पोलीस दलामध्ये काम करीत असताना अठरा वर्षांच्या सेवेत त्यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक कर्तव्य कठोर,अभ्या...

भक्तांचा पाठीराखा पुस्तकातून सेवागिरी महाराजांच्या विचारांचा प्रसार - मठाधिपती सुंदरगिरी महाराज.

Image
भक्तांचा पाठीराखा पुस्तकातून सेवागिरी महाराजांच्या विचारांचा प्रसार - मठाधिपती सुंदरगिरी महाराज. पुसेगाव: प्रतिनिधी पंकज कदम.       सद्गुरु श्री सेवागिरी महाराज अनेकांचे प्रेरणास्थान आहे. अनेक भक्तांच्या सुखदुःखामध्ये सेवागिरी महाराज आपले आशीर्वाद देत असतात. अशा भक्तांच्या अनुभवाची आपल्या शब्दातून बांधणी करत श्री सेवागिरी महाराजांचे विचार भक्तांचा पाठीराखा या पुस्तकात विशाल सुर्यवंशी यांनी अत्यंत सोप्या भाषेत लिहिले आहे. भक्तांचा पाठीराखा हे पुस्तक समस्त भक्तांसाठी सेवागिरी महाराजांचा प्रसाद आहे असे मत श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे मताधिपती सुंदरगिरी महाराज यांनी व्यक्त केले. लेखक विशाल सुर्यवंशी लिखित "भक्तांचा पाठीराखा" या पुस्तकाची पहिली प्रत श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधीला अर्पण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी लेखक विशाल सूर्यवंशी, चेअरमन बाळासाहेब जाधव, वेद अभ्यासक शंकर निकम सर, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीरशेठ जाधव, गौरव जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित हो यावेळी मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले महाराजांच्या साक्ष...

महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण.

Image
महाराष्ट्राच्या कुलदैवत ज्योतिर्लिंग देवास जोतिबावाडी येथील गुरव समाजाकडून 56 भोगाचे ज्योतिर्लिंग देवाला अर्पण. पुसेगाव  विशेषप्रतिनिधी पंकज कदम. जोतिबावाडी,रत्नागिरी ता. पन्हाळा. जि. कोल्हापूर येथे श्री ज्योतिर्लिंग अर्थात देव केदारनाथ ब्रह्म ,विष्णू ,महेश या तीनही देवांसह जमदग्नीचा रवांश आणि 12 सूर्याचा तेज यांचा एकत्रित अवतार आहे. अशा स्वरूपामध्ये भगवान विष्णूंचाही समावेश आहे त्यामुळे भगवान नारायणाचा अवतार असलेल्या भगवान श्रीकृष्णाचा प्रिय असणारी 56 भोगाची सेवा मार्गशीष गुरुवारच्या निमित्ताने श्री केदारनाथ यांना अर्पण करण्यात आले आहे .नाद केदार हे जगाचे पोषक आहेत जगाचे स्वामी आहेत. त्यामुळे विश्वाचा सांभाळ करणाऱ्या या जगन्नाथाप्रति कृतज्ञता म्हणून ही सेवा अर्पण करण्यात येते परमेश्वराला अर्पण करू ते सहस्त्रपटीत भक्तांना परत मिळते,  व नाथ केदारनाथाच्या भक्तांना अखंड अन्नधान्य सुख संपदा प्राप्त व्हावी व याकरता नाथांना ही 56 भोग अर्पण करण्यात येत आहेत, केवळ पोट भरण्यासाठी चे साधन म्हणजे अन्न नव्हे तर कडू ,गोड ,आंबट ,तुरट ,खारट, अशाच नवीन सह भक्ष्य  म्हणजे तोडून...

अॕड सुश्मिता धुमाळ यांची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड.

Image
अॕड सुश्मिता धुमाळ यांची आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेसाठी निवड. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला  करंजखोप तालुका कोरेगाव येथील ॲड सुश्मिता भालेराव धुमाळ या युवतीने फोरेवर मिस मिसेज टीन 2022 या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होऊन राष्ट्रीय स्तरावर  बाजी मारली. १७,१८ व १९ डिसेंबर  रोजी जयपुर,राजस्थान येथे झालेल्या राष्ट्रीय सौंदर्य स्पर्धेमध्ये या  युवतीने विजेती होऊन "Forever Miss India 2022" हा किताब स्वतःच्या नावे केला. ग्रामीण भागातून आलेल्या सुंदरीने Forever Miss India या स्पर्धेत आपले नावलौकिक मिळवल्याने त्यांचे देशभरातून कौतुक होत आहे .जयपुर राजस्थान येथे या संदर्भात देशात सर्वात मोठी असलेली इंटर नॅशनल लेवल ब्युटी पॕजेंट फॉरएवर मिस इंडिया सीजन 2 चे  आयोजन करण्यात आले होते यामध्ये देशभरातून अनेक सुंदर युवतीसह महाराष्ट्रातूनही अनेक युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता या वेळी ॲड.सुश्मिता धुमाळ यांनी आकर्षक कपडे परिधान करून  रँप वॉकद्वारे व आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर प्रश्नोत्तरांच्या फेरीमध्ये देखील त्या अव्वल स्थानी ठरल्या. सुरूवातीला सातारा जिल्ह्या...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण संस्था कटिबद्ध - डॉ. सुरेशराव जाधव.

Image
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शिक्षण संस्था कटिबद्ध - डॉ. सुरेशराव जाधव.        पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.                  शाळेच्या संरक्षण भूमीचे भिंतीचे भूमिपूजन डॉक्टर सुरेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलताना म्हणाले सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावच्या माध्यमातून रणसिंगवाडी ता . खटाव येथील श्री भैरवनाथ हायस्कूलमध्ये शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आमचे प्रयत्न सुरू असून ,भविष्यात देखील नेहमीच या विद्यार्थ्यांच्या व हायस्कूलच्या  प्रगतीसाठी संस्था कटिबद्ध राहील असे विचार श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ सुरेशराव जाधव यांनी व्यक्त केले .श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव संचलित ,श्री भैरवनाथ हायस्कूल रणसिंगवाडी येथे रणसिंगवाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री अजित रणसिंग यांच्या प्रयत्नातून ,फ्लाय हाय चॅरिटेबल ट्रस्ट पुणे यांच्या सीएसआर फंडातून शाळेच्या संरक्षण भिंतीचे काम सुरू करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते .यावेळी अजित रणसिंग यांनी द...

हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार.

Image
हनुमानगिरी ज्युनियर कॉलेजमध्ये 17 वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सर्व शिक्षकांचा केला सत्कार. पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री हनुमानगिरी ज्युनिअर कॉलेज च्या एच एस सी  विज्ञान 2004-05 च्या  बॅच चा  माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेह मेळावा दिनांक 25 डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला . यावेळी  17 वर्षा नन्तर पुन्हा एकदा 12 वी  वर्ग भरवण्यात आला , मराठी  केमिस्ट्री फिजिक्स भूगोल इ.  विषया वर लेक्चर्स घेण्यात आली.   इतक्या वर्षा नन्तर उपस्थित सर्व विद्यार्थी विदयार्थीनी  पुन्हा एकदा मन लावून शिकताना दिसत होते.   त्यांनतर काही फनी गेम्स घेण्यात आल्या.  स्नेहमेळाव्यासाठी आलेल्या बुधावले सर भांभुरे सर  पवार सर निर्मळे मॅडम यांचा आकर्षक भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला , विद्यार्थी अमोल मदने सुशांत जाधव महेश पांडेकर आणि विद्यार्थ्यांनी सुप्रिया जाधव , शारदा जाधव , शिल्पा गोडसे , अमृता चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले , सर्व शिक्षकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच...

कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास द्याल तर याद राखा : अध्यक्ष जयवंत पवार.

Image
कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांना त्रास द्याल तर याद राखा : अध्यक्ष जयवंत पवार. कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.  कोरेगाव येथील शिंदे मंगल कार्यालयात राजवंश आठवडा बाजार संघटनेची मासिक मीटिंग आयोजित करण्यात आली होती या निमित्ताने कोरेगाव तालुक्यातील आठवडा बाजार करणारे छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांची या मिटींगला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती गेले कित्येक वर्ष झाले आठवडा बाजार करणारे नागरिक संघटित होत नसल्याने अध्यक्ष जयवंत पवार व काही व्यापारी बांधवांनी या संघटनेची कोरेगाव तालुक्यात बांधणी केली दस्तूर खुद्द श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजवंश आठवडा बाजार संघटनेची स्थापना करण्यात आली गेले तीन वर्ष ही संघटना मोठ्या प्रमाणावर गोरगरीब दिन दलित, कष्टकरी, आठवडा बाजार करणारे व्यापाऱ्यांसाठी काम करीत असून सोमवारी दुपारी १ वाजता कोरेगाव येथील शिंदे मंगल कार्यालय येथे राजवंश बाजार संघटनेची मासिक बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी संघटनेचे अध्यक्ष व कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक जयवंत पवार यांनी आपल्या व्यापारी बांधवांना गावोगावी आठवडा बाजा...

येस ग्रुपच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. प्रियाताई शिंदे.

Image
येस ग्रुपच्या विविध योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- डॉ. प्रियाताई शिंदे.       पुसेगांव प्रतिनिधी  पंकज कदम.   येस ग्रुप शेतकऱ्यांना करार शेतीच्या माध्यमातून शाश्वत शेतीकडे घेऊन जात असून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीचा मोठा आधार  येस ग्रुपच्या माध्यमातून मिळाला आहे असे मत डॉ. प्रियाताई महेश शिंदे यांनी व्यक्त केले श्री सेवागिरी महाराज यात्रेनिमित्त पुसेगाव ता. खटाव येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात  येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी व  येस ग्रुप च्या कृषी स्टॉलला भेट दिली यावेळी डॉ . प्रियाताई शिंदे यांनी मत व्यक्त केले यावेळी येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत, व्यवस्थापक रंजीत भोसले, चंद्रकांत जाधव सर उपस्थित होते येस ग्रुपचे अभिनव उपक्रम हे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहेत  कंपनीच्या माध्यमातून विविध योजना ज्या चालवल्या जातात त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, करार शेतीच्या माध्यमातून शेतमाला दराचे टेन्शन घालवण्याचे  मोठे काम येस ग्रुपच्या माध्यमातून केले जात आहे असेही मत डॉ. प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केले व त्यापुढे म्हणाल्या शेतक...

कृषी प्रदर्शनात येस ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ - संस्थापक संजय भगत.

Image
कृषी प्रदर्शनात येस ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ - संस्थापक संजय भगत. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.    सेवागिरी महाराज  राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात येस  ग्रुप ऑफ कंपनीज जाखणगाव यांच्या करार शेती पॅटर्नचा  मोठा बोलबाला असून हमीभावाची शेतकऱ्यांना भुरळ पडली आहे असे येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी सांगितले जाखणगाव येथील येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनीच्या करार शेती पॅटर्न बरोबरच येस ग्रुपच्या बियाण्याला शेतकऱ्यांची पसंती मिळत आहे. सेंद्रिय उत्पादने गहू, ज्वारी , कडधान्यांना विशेषतः शहरी भागातील लोकांची पसंती मिळत आहे कमी केमिकल विषमुक्त  अन्नधान्य पिकवण्यास येस ग्रुपचे प्राधान्य असून भविष्यात शेतकऱ्यांना चांगला आर्थिक प्राप्तीचा मार्ग मिळेल व पौष्टिक,कमी केमिकल युक्त अन्नधान्य लोकांना पुरवण्याचा मानस येस ग्रुपचा असल्याचे संजय भगत यांनी मत व्यक्त केलेतर कंपनी स्टॉलला माजी जिल्हा परिषद सदस्य बंडा गोडसे सर ,प्राध्यापक सुधाकर फडतरे ,प्राध्यापक दौंड सर ,अभिजीत विधाते बागायतदार व शेतकरी यांनी भेट दिली आहे. रास्त पेक्षा ज...

कोरेगाव तालुका ॲड. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड.

Image
कोरेगाव तालुका ॲड. बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. पांडुरंग भोसले यांची बिनविरोध निवड. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला. कोरेगाव तालुका बार असोसिएशन वार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली या झालेल्या बार असोसिएशनच्या निवडणुकीत सर्वानुमते  सर्व उमेदवार बिनविरोध निवडून दिले. ॲड. पांडुरंग चंद्रकांत भोसले यांची एकमताने अध्यक्षपदी निवड  करण्यात आली, तर उपाध्यक्षपदी  अॅड. अमोल दिलीप भुतकर यांची निवड करण्यात आली.ॲड. धैर्यशील  दिलीपकुमार घर्गे सचिव,ॲड. आकाश दत्तात्रय निकम सहसचिव , ॲड. मंगेश बाळकृष्ण वळे खजिनदार, अँड प्रतीक मधुकर फाळके सदस्य, ॲड. प्रियांका चंद्रसेन मतकर, ॲड.शितल शिवाजी साळुंखे, ॲड. अक्षदा ओंकार देशमाने महिला प्रतिनिधी, यांची निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ॲड. श्रीनिवास साखरे, ॲड रणजीत भोसले, ॲड  रवींद्र विटकर यांनी काम पाहिले. विजयी उमेदवारांचे ऍड जयवंत केंजळे, ॲड. तानाजीराव पवार , ॲड., पुरुषोत्तम बारसावडे, ॲड सिरसागर, ॲड. शब्बीर इनामदार, निलेश झांजुर्णे, संदीप चव्हाण, दिलीप भोसले, अधिराज माने, संदीप पवार, रफिक शेख, किशोर खराडे, भै...

सातारा जिल्हा ओबीसी संघटना यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न.

Image
सातारा जिल्हा ओबीसी संघटना यांचा मेळावा व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला कोरेगाव येथे आज दिनांक 24 डिसेंबर २०२२ रोजी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता व गुणवंत विद्यार्थ्यांचा जिल्हा ओबीसी संघटनेमार्फत प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यावेळी उपस्थित भरत लोकरे सातारा जिल्हा ओबीसी संघटना अध्यक्ष रामचंद्र बनवडे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद शिरसागर महासचिव राजेंद्र कुंभार कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रल्हाद मोरे खेड अध्यक्ष महेंद्र काशीद सचिव किशोर महामाने सदस्य मधुकर गुरव किशोर काशीद मधुकर जगताप रमेश पवार सौ हजारे मॅडम तडवळे गावचे माजी सरपंच वाघ रशीद बागवान किशोर लोहार सुनीता लोहार प्रमोद शिरसागर भानुदास वास्के संजय पोद्दार असे अनेक मान्यवर उपस्थित होते. 

माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात.

Image
माण खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला भीषण अपघात.  फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने. फलटण भा.ज.पा चे जिल्हा अध्यक्ष व माण-खटाव चे आ. जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात झाला असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.पहाटे ३:१५ च्या दरम्यान, पुणे - पंढरपूर रोड वरील फलटण शहर स्मशानभूमी जवळील बाणगंगा नदीच्या पुलाचा कठडा तोडून टोयोटा कंपनीची काळया रंगाची फॉर्च्यूनर गाडी अंदाजे ५० फूट खोल नदी पात्रता कोसळली. सदर गाडीत आमदार जयकुमार गोरे, वाहन चालक -कैलास दडस , अंगरक्षक पोलीस कॉन्स्टेबल जनार्दन बनसोडे, स्वीय सहाय्यक रुपेश साळुंखे हे पुण्याहून दहिवडी करिता प्रवास करत होते.  प्रवासादरम्यान गाडीचा अपघात झाला सदर अपघातात वाहन चालक दडस व स्वीय सहाय्यक साळुंखे यांना गंभीर दुखापत झाली असून बारामती येथील गिरीराज हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता पाठवण्यात आलेले आहे.  अंगरक्षक  बनसोडे यांच्यावर फलटण येथील निकोप हॉस्पिटल या ठिकाणी उपचार सुरू आहेत. तसेच आमदार जयकुमार गोरे यांना पुणे येथील खाजगी रुग्णालय रुबी हॉल क्लिनिक या ठिकाणी नेहेण्यात आलेले असून त्यांच्यावर उपचार सुरू...

खटाव, माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटेकरी करण्याचे पाप कोरेगावच्या आमदारांनी करू नये - युवा नेते राम जाधव.

Image
खटाव, माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटेकरी करण्याचे पाप कोरेगावच्या आमदारांनी करू नये - युवा नेते राम जाधव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. कोरेगाव  तालुका हा बागायती आहे.अगोदरचं तेथे कॕनाॕल पोहचलेला आहे.त्यात फाटे फोडू नका भाडळे खोऱ्याला जिहेकटापूर मधुन पाणी देणेसाठी ,आमदार महेश शिंदे वल्गना करीत आहेत, जिहेकटापूर ही योजना फक्त खटाव-माण या कायम दुष्काळी तालुक्यासाठी आहे. माजी मुख्यमंत्री  मनोहर जोशी यांनी खास प्रयत्न करुन दुष्काळी तालुक्यांचा बॕकलाॕग भरुण काढला आहे. या खटाव माण दुष्काळी तालुक्यासाठी उरमोडी धरण बांधतांना सातारा तालुक्यातील कृष्णाकाटाच्या त्या वेळच्या पुढाऱ्यांनी  खुप विरोध केला होता.पण मनोहर  जोशी साहेबांसारखे  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला भेटले म्हणून या दुष्काळी तालुक्यातील तहानलेली जनता तहान भागली,आणि भुमि हिरवा शालू नेसू शकली, तरी खटाव -माण तालुक्याच्या हक्काच्या पाण्यात दुसरे वाटकरी करण्याचे पाप आमदार महेश शिंदेनी करु नये !चार मते कोरेगाव तालुक्यातील स्वतःला मिळवणेसाठी कोरेगाव तालुक्यातील ह्या गावाला पाणी देतोआणि त्या ...

कोरेगाव जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध; जैन समाजाचा बंदला शंभर टक्के प्रतिसाद.

Image
कोरेगाव जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध; जैन समाजाचा बंदला शंभर टक्के प्रतिसाद. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला. कोरेगाव जैन समाजातर्फे झारखंड सरकारचा निषेध; प्रांताधिकारी व तहसीलदारांना निवेदन सादर, कोरेगावात जैन समाजाच्या बंदला शंभर टक्के प्रतिसाद जैन धर्मियांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या झारखंड राज्यातील तीर्थक्षेत्र श्री. सम्मेद शिखरजी या क्षेत्राला राज्य सरकारने पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. पर्यटनाच्या नावाखाली या तीर्थक्षेत्रातील पावित्र्य भंग होणार असून त्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण भारतातील जैन समाज बांधवांनी बुधवारी देशव्यापी बंद पुकारला आहे. या बंदला कोरेगाव शहरात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. त्यावेळी कोरेगाव नगरपंचायतीचे नगरसेवक नितीन उर्फ बच्चु शेट ओसवाल व श्री.  आशिष शेटीया अध्यक्ष. श्री. छगनलाल ओसवाल उपाध्यक्ष. श्री. अशोक टेडीया श्री .विश्वस्त डॉक्टर सागर भंडारी, प्रवीण ओसवाल प्रसन्न भंडारी राजेंद्र शहा राजेंद्र रमणलाल गांधी, अशोक देधीया, निलेश देवीचंद ओसवाल, नथमल जैन राजेंद्र ओसवाल, कोरेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रीतमशेठ शहा, यांच्...

प्रिती फडतरे हिचा निबंध स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ग्रामस्थांकडून अभिनंदनचा वर्षाव.

Image
प्रिती फडतरे हिचा निबंध स्पर्धेत सातारा जिल्ह्यात प्रथम क्रमांक ग्रामस्थांकडून अभिनंदनचा वर्षाव.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. रणसिंगवाडी ता .खटाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेमधील विद्यार्थिनी प्रिती चंद्रकांत फडतरे . इयत्ता सातवी हिने सातारा जिल्हा निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला  त्यांची आई तुळसा चंद्रकांत फडतरे ,वडील चंद्रकांत फडतरे व ग्रामस्थ यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे तर या यशाबद्दल मार्गदर्शक म्हणून शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे सर ,अजित गायकवाड सर, संजीवनी देशमुख मॅडम, शोभा शिरतोडे मॅडम, रीना मंडले मॅडम यांनी मोलाचे मार्गदर्शन केले असल्याचे प्रीती फडतरे यांनी सातारा 24 तास न्यूजची बोलताना सांगितले. मुख्याध्यापक विठ्ठल फडतरे यांनी प्रिती फडतरे हिचा प्रथमथा सत्कार केल्यानंतर   शाळेच्या वतीने ढोल ताशे वाजवत प्रिती फडतरे हिची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या यशाबद्दल गावामधून सरपंच, चेअरमन, वकील ,डॉक्टर, पत्रकार, विविध मंडळाचे अध्यक्ष ,विविध पक्षांचे अध्यक्ष ,पदाधिकारी , शिक्षक, उद्योजक, महिला व शेतकरी वर्ग, युवा मंच उमाजी नाईक मंडळ यांनी अभिनंदन व ...

दि.२२ पासून आमरण उपोषण करणार, रमेश उबाळेंचा इशारा,पोलिस अधिक्षकाना निवेदन.

Image
 दि.२२ पासून आमरण उपोषण करणार, रमेश उबाळेंचा इशारा,पोलिस अधिक्षकाना निवेदन.  कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.  शासकीय मेडिकल कॉलेजच्या शासकीय   मालमत्तेवर  दिवसाढवळ्या दरोडा टाकणारे  लोकप्रतिनिधीचे बगलबच्चे , अधिकारी व भंगारवाल्याना जबाबदार धरून त्यांचेवर  गुन्हा न दाखल केल्यास  दि.२२ पासून संगमनगर येथील नियोजित मेडीकल कॉलेज च्या इमारतीसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी पोलीस अधीक्षकाना निवेदनाद्वारे दिला असूल्याने आता पोलीस काय भूमिका घेणार याकडे राजकिय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले  आहे, नुकतीच मेडिकल कॉलेजचे काम सुरू झाले आहे काम सुरू झाले असले तरी सफसफाईच्या नावाखाली  मेडिकल कॉलेजच्या जागेत असणाऱ्या  २०० मोठ्या इमारती पडण्याचे काम सुरू आहे.हे काम कसलीही निविदा न काढता सुरू आहे.सदर जागेवरील लोखंड,विटा, रॅबीट,मुरूम,  लाकडे, प्लॅष्टीक चोरीला गेले आहे. यामध्ये सातारा शहरातील भंगारवाल्यानी काही लोकप्रतिनिधीच्या बागलबचंच...

अल्पसंख्यांक दिवस दिनांक 18 रोजी विविध कार्यक्रमाने गावागावांमध्ये संपन्न करण्यात यावा - शफिकभाई शेख.

Image
अल्पसंख्यांक दिवस दिनांक 18 रोजी विविध कार्यक्रमाने गावागावांमध्ये संपन्न करण्यात यावा - शफिकभाई शेख.   कोरेगाव -अज्जू मुल्ला.  अल्पसंख्यांक दिवस दिनांक 18 रोजी सर्व जिल्ह्यातील गावागावांमध्ये आयोजित करून विविध कार्यक्रम करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष शफिक भाई शेख यांनी केले आहे.    उद्या दिनांक 18 रोजी अल्पसंख्यांक दिन असून प्रत्येक गावातील सामाजिक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन हा दिवस शाळा, कॉलेजेस,सरकारी कार्यालय,  या ठिकाणी साजरा करण्याच्या सूचना अल्पसंख्यांक समाजाच्या वतीने देण्यात याव्यात असे  शफिक भाई शेख यांनी सुचित  केले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाचे अधिकार व त्यांचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक क्षेत्रासाठी  शासकीय असणारे धोरण या योजना राबवून त्याची माहिती समाजापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. या संदर्भांमध्ये चर्चा भाषण व्यवस्था हेही अंमलात आणण्याची गरज आहे तसेच शाळा कॉलेजेस विद्यार्थ्यांची अल्पसंख्यांक समाजासाठी गावातून रॅली काढण्याचे नियोजन करण्यात यावे, तसेच गावा...

पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस जप्त मोटर सायकलचा जाहीर लिलाव.

Image
पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस जप्त मोटर सायकलचा जाहीर  लिलाव. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव ता.खटाव येथील पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये बेवारस असणारे वाहनांचा दिनांक 15 .12. 2022 रोजी लिलाव करण्यात येणार आहे तत्पूर्वी वाहनाचे लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून  लिलाव घेणाऱ्या व्यक्तींनी 14. 12. 2022 रोजी पर्यंत दुचाकी वाहन करतात पाच हजार रुपये याप्रमाणे डिपॉझिट रक्कम पोलीस ठाण्यात जमा करावी लागेल, व कोणाचे वाहन चोरीस गेले असल्यास त्यांनी वाहनांचे कागदपत्रे पुराव्यासह पोलीस स्टेशनला हजर राहून आपले वाहन त्या वाहनांमध्ये आहे. का याबाबत पाहणी करावी व ओळख पटवून आपले वाहन घेऊन जावे नंतर येणाऱ्या तक्रारीचा विचार केला जाणार नाही लिलावाबाबत प्रक्रियेत लिलाव करण्यात येणारी बेवारस 33  मोटरसायकली असून सदर वाहनांचे लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून त्या व्यक्तींनी वाहने लिलावाचे तारखेपर्यंत सकाळी दहा वा. ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये येऊन पाहणी करता येईल व वाहनांची यादी पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डावर लावली आहे  तरी लिलाव प्रक्रियेसाठी हजर राहून त्या व्यक्त...

दैनिक तरुण भारत सातारा प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांचे निधन.

Image
. दैनिक तरुण भारत सातारा प्रतिनिधी संभाजी चव्हाण यांचे निधन. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. दै तरुण भारत"चे नागठाणे प्रतिनिधी व भरतगावचे माजी उपसरपंच संभाजी चव्हाण वय 47 यांचे सोमवरी जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले.  संभाजी चव्हाण हे हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांचे शिक्षण नवी मुंबई येथे झाले. त्याने मुंबईत अनेक छोटे मोठे व्यवसाय केले पण त्यांचे मन रमले ते पत्रकारितेत. उत्तम शेती हा सुद्धा त्यांचा आवडता छंद होता. पत्रकारितेसोबत त्यांनी राजकारण, समाजकारण यांतही आपला ठसा उमटवला. चार डिसेंबर रोजी त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारासाठी वैद्यकीय यंत्रणेने प्रयत्नांची शिकस्त केली. सिव्हिल सर्जन डॉ. चव्हाण, डॉ. भोसले, डॉ. ससाणे, प्रतिभा हॉस्पिटलचे डॉ. संजय साठे यांनी अद्यावत उपचार करण्याचे प्रयत्न केले.त्यांचावरील उपचाराची दैनंदिन माहिती पत्रकारांचे जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे, सरचिटणीस दीपक प्रभावळकर, राज्य उपाध्यक्ष शरद काटकर यांच्याकडून घेतली जात होती. संभाजी  चव्हाण यांचे निकटवर्तीय खासदार संजीव नाईक यांनीही ...

कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी ग्रामपंचायत बिनविरोध निवड.

Image
कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी ग्रामपंचायत बिनविरोध निवड. कोरेगाव प्रतिनिधी. आज्जू मुल्ला.  कोरेगाव तालुक्यातील खेड नांदगिरी येथील ग्रामपंचायत सन 2022 ते 27 या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. खेड या गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी ग्रामस्थांची बैठक झाली. त्यामध्ये भैरवनाथ मंदिराचे जीर्णोद्धार करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या बैठकीत ठराव करण्यात आला त्यानुसार खेड ग्रामपंचायत सरपंच पदी सौ सुनीता सुरेश घनवट यांची निवड करण्यात आली. तसेच उपसरपंच राजेंद्र कुमार कदम  व सदस्यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली सर्व ग्रामस्थांनी निवडणूक बिनविरोध झाल्याबद्दल एकमेकांचे पेढे भरून आनंद उत्सव साजरा करण्यात आला .आज गावामध्ये सरपंच उपसरपंच व सदस्य यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली .तसेच भैरवनाथ  मंदिराच्या कामासाठी सर्व ग्रामस्थ एकवटले. तसेच आज दिनांक 11 डिसेंबर 2022 रोजी कोरेगाव येथील सर्किट हाऊस मध्ये दुपारी एक वाजता आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत सर्व सरपंच उपसरपंच सदस्य यांनी आमदार महेश शिंदे यांचा आशीर्वाद घेतला आमदार महेश शिंदे यांनी त्यांना शुभेच्छा...

सातारा रोड तालुका कोरेगाव येथील वडार वस्ती येथे हनुमान मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न.

Image
सातारा रोड तालुका कोरेगाव येथील वडार वस्ती येथे हनुमान मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजन संपन्न. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला. सातारा रोड तालुका कोरेगाव येथील वडार वस्ती येथे हनुमान मंदिराचे नवीन बांधकामाचे भूमिपूजनाचे कार्यक्रम दिनांक दहा डिसेंबर 2022 रोजी आयोजित करण्यात आले. याप्रसंगी कोरेगावचे लाडके आमदार व माजी पालकमंत्री श्री शशिकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले. यापैकी शिंदे साहेब यांनी मी सदैव वडार बांधवांबरोबर आहे व अडीअडचणीला वडार समाजासोबत कायम उभा राहीन अशी ग्वाही दिली. यावेळी मी वडार महाराष्ट्राचा संघटना जिल्हा उपाध्यक्ष पप्पू घाडगे साहेब व मी वडार महाराष्ट्राचा संघटना कोरेगाव तालुका अध्यक्ष प्रसाद फडतरे यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित जेष्ठ मान्यवर अशोक घाडगे ,राजू गाडगे हनुमंत घाडगे ,लाला घाडगे, हनुमान चव्हाण, अनिल घाडगे, सुभाष घाडगे ,प्रकाश घाडगे ,सचिन घाडगे, तसेच वडार समाजातील धडाडीचे कार्यकर्ते व संघटक तालुका संपर्क प्रमुख दीपक घाडगे अविनाश घाडगे ,संतोष घाडगे, संभाजी घाडगे, नाथा घाडगे ,संद...

कोरेगांवचे रणजित देशमुख यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी पदोन्नती.

Image
कोरेगांवचे रणजित देशमुख यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी पदोन्नती.       कोरेगांव (प्रतिनिधी) आज्जू मुल्ला.  दि. ६ : येथील डी. पी. भोसले कॉलेजचे माजी विद्यार्थी व खडकवासला, पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (एनडीए) कनिष्ठ अभियंता रणजित आनंदराव देशमुख यांची सैन्यदलात लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.       भारतीय सैन्य दलाच्या डेहराडून येथील राष्ट्रीय सैन्य अकादमीतून रणजित यांनी नुकतेच प्री कमिशनींग ट्रेनींग पूर्ण करुन त्यांची लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे. शनिवारी दि. ३ डीसेंबर रोजी डेहराडून येथे त्यांचा शपथग्रहण सोहळा पार पडला. या नियुक्तीनंतर आता ते मणीपूर येथे सहाय्यक गॅरिसन अभियंता या पदावर रुजू होणार आहेत. खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली हे मुळ गाव असलेल्या रणजित देशमुख यांचे आजोबा धनपाल पांडुरंग देशमुख व वडील आनंदराव धनपाल देशमुख यांनीही भारतीय सैन्यदलात सेवा केली आहे, घरातून सैन्य सेवेची परंपरा लाभलेल्या रणजित यांचे प्राथमिक शिक्षण सिध्देश्वर कुरोली येथे, माध्यमिक शिक्षण कोरेगांवच्या दि मॉडर्न हायस्कूल येथे तर महाविद्यालयीन शिक्षण ...

गोळेवाडीच्या नवनिर्वाचित बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार.

Image
गोळेवाडीच्या नवनिर्वाचित बिनविरोध ग्रामपंचायत सदस्यांचा आमदार महेश शिंदे यांच्या हस्ते सत्कार. कोरेगाव प्रतिनिधी.आज्जू मुल्ला.  कोरेगाव येथील महत्वपूर्ण असलेल्या गोळेवाडी  गावातील अनेक पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार महेश शिंदे गटात जाहीर प्रवेश केला होता तदनंतर मागील आठवड्यात आजी-माजी महिला पदाधिकारी असंख्य महिला वर्गाने व युवक वर्गाने आमदार महेश शिंदे गटात प्रवेश केला होता आज नवनिर्वाचित सदस्यांचा सत्कार महेश शिंदे यांच्या हस्ते कोरेगाव शहरातील विश्रामगृहात शाल श्रीफळ देऊन पुष्पहार घालून  करण्यात आला नवनिर्वाचित सदस्य सदानंद किशोर रोमन  रुपेश हनुमंत गोळे सौ विजय शंकर गोळे सौ सविता प्रसाद घोरपडे प्रदीप धनंजय पवार अर्जुन निवृत्ती घोरपडे सौ पूजा वैभव कदम सौ अर्चना विजय गोळे अनिता बाबुराव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी सरपंच सतीश राव गोळे उपसरपंच किरण राव घोरपडे प्रसाद घोरपडे बाळकृष्ण गोळे माझी ग्रामपंचायत सदस्य रोहित शेठ गोळे आधी ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमास कोरेगाव नगरीचे प्रथम नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे जि...

श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव येथे भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन चेअरमन बाळासाहेब जाधव.

Image
श्री सेवागिरी महाराज अमृत महोत्सवानिमित्त पुसेगाव येथे  भजन स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याचे आवाहन   चेअरमन बाळासाहेब जाधव.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ब्रह्मलीन तपोनिधी सिद्धहस्त श्री सेवागिरी महाराज संजीवन समाधीस 75 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त  श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने अमृत महोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक 13 ते 15 भजन स्पर्धेचे आयोजन केले असून या स्पर्धेमध्ये भाग घेण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष जाधव यांनी केले आहे. मंगळवार दिनांक 13 रोजी बालगट दिनांक 14 रोजी पुरुष गट व दिनांक 15 रोजी महिला गट असे स्पर्धेचे आयोजन केले असून बालगट, पुरुष गट, महिला गट प्रत्येक गटास अनुक्रमे बक्षीस प्रथम क्रमांक 17 हजार रुपये , 15 हजार रुपये  11 हजार व चतुर्थ क्रमांक सात हजार रुपये देण्यात येणार आहे. ही बक्षिसे पुसेगाव किराणामाल व्यावसायिक असोसिएशन पुसेगाव यांच्या वतीने देण्यात येणार आहे या स्पर्धेमध्ये प्रत्येक संघात आठ ते दहा जणांचा समावेश असावा, स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये घेण्यात येत...

सेवागिरी यात्रेत हलगर्जीपणा कामात कुचराई केल्यास अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी.

Image
सेवागिरी यात्रेत  हलगर्जीपणा कामात कुचराई  केल्यास अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल   प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. पुसेगाव येथील सेवागिरी यात्रा कालामध्ये आपत्ती व्यवस्थापन आणि हलगर्जीपणा करू नये तसेच सर्वच विभागातील कार्यालयीन अधिकाऱ्यांनी नियोजन करून यात्रा कालावधीत संसर्गजन्य रोगप्रसारासह इतर सर्व सोयीयुक्त बाबीवर लक्ष देऊन दक्ष राहावे यामध्ये कुचराई झाल्यास संबंधित विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यास जबाबदार धरले जाईल यासाठी यात्रा कालावधीमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता न भासता मोठ्या प्रमाणात दक्षता घेऊन सर्वतोपरी सहकार्य करावे अशी सूचना व मार्गदर्शन प्रांत अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केले. महाराष्ट्रासह इतर राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव तालुका खटाव जिल्हा सातारा येथील श्री सेवागिरी महाराजांच्या 75 व्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरण निमित्त आयोजित रथोस्थव व यात्रा नियोजनासाठी येथील नारायणगिरी हॉलमध्ये आयोजित केलेल्या विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.

Image
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन. मलवडी फलटण प्रतिनिधी. शकील सय्यद.  आज दिनांक 06/12/2022 रोजी जि.प. प्राथमिक शाळा मलवडी ता. फलटण या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. या वेळी शाळेतील विद्यार्थी यांनी आपले मनोगत वेक्त  केले.या कार्यक्रमासाठी  शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष शकील सय्यद यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य ,त्याच प्रमाणे संविधान या बद्दल चांगल्याप्रकारे माहिती दिली. शाळेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर यांनी विद्यार्थ्यांना सुंदर मार्गदर्शन केले. तसेच या ठिकाणी मलवडी गावचे सरपंच बाजीराव तरडे आणि ग्रामपंचायत सदस्य आप्पा रुपनवर  कुंडलिक बिचुकले  शाळा व्यवस्थापन समिती चे उपाध्यक्ष शकील सय्यद, स्वामी सर गडकरी सर गाढवे सर श्री बोबडे सर श्री भंडलकर सर मुख्याध्यापक श्री कोळेकर सर श्री माने सर व ग्रामस्थ मलवडी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बोबडे सर यांनी केले व आभार माने सर यांनी मानले .

फेर निवडीबद्दल डि के पवार यांचा सत्कार उत्साहात संपन्न.

Image
फेर निवडीबद्दल डि के पवार यांचा सत्कार उत्साहात संपन्न. फलटण प्रतिनिधी. राजेंद्र मदने.  फलटण.  मा. डी के पवार माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महानंदा डेअरी मुंबई यांची पुन्हा एकदा महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ महाराष्ट्र शासन संचालक पदी फेर निवड झाल्याने मानव अधिकार फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा व फलटण तालुका कमिटी यांच्या वतीने कलारत्न सहकारी मुद्रणालय नाना पाटील चौक फलटण येथे सत्कार करण्यात आला सत्कार प्रसंगी सत्काराला उत्तर प्रसंगी आपण केलेले समाजकार्याची पावती आपल्याला मिळत आहेत परंतु फलटण तालुक्यातील मित्रपरिवारांनी जे प्रेम माझ्यावर केले जी साथ दिली ती शेवटपर्यंत देऊ असे मनोगत डी के पवार यांनी सत्कार्त सर्वांचे आभार व्यक्त केले या सत्कार प्रसंगी मानव अधिकार फाउंडेशन  सातारा जिल्हा व फलटण तालुका कमिटी व कलारत्न सहकारी संस्थेचे पदाधिकारी  प्रियदर्शनी विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. 

प्रभातचे व्यवस्थापक जयंत काटे यांचे निधन.

Image
प्रभातचे व्यवस्थापक जयंत काटे यांचे निधन.   पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. दैनिक प्रभातच्या सातारा आव्रुत्तीचे ब्युरो चीफ व्यवस्थापक व वृत्तपत्र वितरण क्षेत्रात आपल्या कामाचा दबदबा निर्माण करणारे जयंत राजाराम काटे (वय 57) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सुनीता ,मुलगा आदित्य, विवाहित कन्या रमा, जावई, थोरले बंधू अविनाश काटे व धाकटे बंधू श्रीकांत काटे असा परिवार आहे.गोपाळवाडी (ता. दौंड, जि. पुणे) हे मूळ गाव असणारे जयंत काटे यांनी वृत्तपत्र क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा वेगळा दबदबा  निर्माण केला होता. तीस वर्षांपूर्वी सातारच्या दै. ऐक्यमधून त्यांनी वितरण विभागातून आपल्या करिअरला सुरुवात केली. केसरी लोकमत, प्रभात तसेच विविध दैनिकांमध्ये त्यांनी  जबाबदार पदांवर त्यांनी अत्यंत सचोटीने काम केले. पत्रकारितेच्या क्षेत्रातील अनेक दिग्गजांना संधी देऊन पुढे आणण्याचे काम जयंत काटे यांनी हिरीरीने केले. आपला हसतमुख चेहरा आणि मनमिळाऊ स्वभावाने समोरच्याला आपलं करण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. दैनिक प्रभातची सातारा आवृत्ती स्थानिक पातळीवर रुजवण्यात...

सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मानपत्र सोहळ्यात होणार गौरव.

Image
सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती  संघटनेच्या कार्यकर्त्यांचा कृतज्ञता सन्मानपत्र सोहळ्यात होणार गौरव.  पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. भटक्या विमुक्त जमाती संघटनेला व चळवळीला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत या पन्नास वर्षात ज्या ज्या कार्यकर्त्यांनी योगदान दिले. अशा कार्यकर्त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजी राष्ट्रवादी काँग्रेस भवन सातारा येथे दुपारी दोन वाजता विविध मान्यवरांच्या उपस्थितीत" कृतज्ञता सन्मानपत्र " सोहळा संपन्न करण्यात येणार असल्याची माहिती सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटना संयोजन समिती सदस्य, व राज्य सरचिटणीस मा. रामभाऊ जाधव व मा.नारायण जावलीकर यांनी दिली आहे. सातारा जिल्हा भटक्या विमुक्त जमाती संघटनेच्या माध्यमातून या पन्नास वर्षांमध्ये या जमातीच्या विविध मान्यवरांनी तन-मन-धन या उदात्त हेतूने समाजासाठी कार्य केले आज त्याच पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या या कार्याबद्दल त्यांचा सन्मान व सत्कार व्हावा तसेच यथोचित गौरव करून "कृतज्ञता सन्मानपत्र " वितरित करण्यात येणार आहे तरी स्वतः व कुटुंबास...

मा. तहसीलदार साहेब यांच्या आश्वासनानंतर वर्धनगड शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन तात्पुरते मागे.

Image
मा. तहसीलदार साहेब यांच्या आश्वासनानंतर वर्धनगड शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन  तात्पुरते मागे.   पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम. वर्धनगड ता. खटाव येथील शेतकऱ्यांचे आत्मदहन आंदोलन मा.तहसीलदार साहेब खटाव यांच्या आश्वासनानंतर तात्पुरते मागे घेण्यात आले आहे. वर्धनगड तालुका खटाव येथील पाणंद रस्त्याबाबत योग्य न्याय मिळत नसल्याकारणाने आज दिनांक पाच रोजी पानंद रस्त्या अंतर्गत किल्ले वर्धनगड शेतकऱ्यांच्या वतीने आत्मदहन करण्यासाठी तहसीलदार कार्यालय वडूज जाण्यापूर्वीच पुसेगाव पोलीस स्टेशनच्या वतीने मा.तहसीलदार साहेब  खटाव आपल्या मागण्यासाठी चर्चेसाठी तयार असल्याचे सांगून ग्रामस्थांचे आत्मदहन थांबवण्यात आले व खटाव तहसीलदार व ग्रामस्थांमध्ये चर्चा करण्यात आली त्यावेळी बोलताना खटाव तहसीलदार यांनी सांगितले तुमच्या निवेदनानंतर दोन ते चार तहसीलदार या जागी बदलून गेले आहेत मी या ठिकाणी या वर्षांमध्ये आहे तुमची असणारी समस्या स्थळ पाणी करून एक महिन्याचे आत सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून तुमच्या रस्त्या संबंधी येणाऱ्या अडी  अडचणी दूर करण्यासाठी प्रशासकीय बाबी पूर्ण झाल्यानंतर देण...

जागतिक अपंग दिनानिमित्त विविध सामाजिक संस्थाकडून दिव्यांग लोकांना मदतीचा हात.

Image
जागतिक अपंग दिनानिमित्त विविध सामाजिक संस्थाकडून दिव्यांग लोकांना मदतीचा हात. मलवडी फलटण प्रतिनिधी. शकील सययद.  3 डिसेंबर, 2022 स्थळ - दिवा, नवी मुंबई आर पी जी फाउंडेशन, आरपीजी लाइफ सायन्सेस, आरिन फाऊंडेशन, अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था व मलसन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने 100 दिव्यांग लोकांना बॅग वाटप, वैयक्तिक स्वच्छता व विविध सरकारी योजनांचे फॉर्म भरून सरकारी अधिकाऱ्यांकडे जमा करणे या विषयावरती जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रम राबवण्यात आला. जागतिक अपंग दिनानिमित्त आरपीजी फाउंडेशनचे मा. साजिद सय्यद, आरिन फाउंडेशनचे अध्यक्ष मा. रितेश मिसाळ, अपंग संजीवनी नवजीवन कल्याणकारी संस्था याचे अध्यक्ष मा. सुरेश दुधाने, मलसन्स चॅरिटेबल ट्रस्टच्या उपाध्यक्ष मा. प्रिया वाघमारे, आरपीजी लाइफ सायन्सेस कंपनीचे प्रोडक्शन मॅनेजर मंगेश पाटील, संजय लाड व एक्झिक्यूटिव्ह- चंद्रकांत कदम, सूर्यकांत महाडकर, विनोद विठ्ठल, अक्षय जाधव, शुभम शेडगे, ऋतुराज निकम या मान्यवरांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री साजिद सय्यद यांनी दिव्यांग लोकांचा शैक्षणिक, आरोग्य, ...

अनभुलेवाडी गावच्या युवकांना पाठबळ देऊन गावचा सर्व विकास करणार :- आमदार महेश शिंदे.

Image
अनभुलेवाडी गावच्या युवकांना पाठबळ देऊन गावचा सर्व विकास करणार :- आमदार महेश शिंदे. पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. अनभुलेवाडी गावाचा सर्वपरी कामांचा प्रश्न सोडवणार असून विकास हेच धोरण असून या गावाच्या विकासासाठी शक्य होईल तेवढा विकास कामे करणार आहे व येथील युवकांना पाठबळ देणार असे आमदार महेश शिंदे यावेळी बोलताना म्हणाले . यावेळी अनभुलेवाडी ते शेंदुरजणे  व रुई या रस्त्यांचे डांबरीकरण ,जलजीवन अंतर्गत विहीर दुरुस्ती ,नवीन पाण्याची लाईन ,पाण्याची टाकी उंच बांधणे असे विविध विषय घेऊन अनभुलेवाडीतील युवक आमदार महेश शिंदे यांना भेटून त्यांनी या समस्या मांडल्या यावेळी  अर्जुन नलवडे, बाळकृष्ण आवटे, डॉ. गोरखनाथ अनभूले, यांची प्रमुख उपस्थिती होती तर निलेश अनभुले ,गुरुदास अनभुले, एकनाथ नलवडे ,महेश सावंत, दीपक इंगळे ,अक्षय पवार, रमेश इंगळे, सुरज अनभुले, रावसाहेब जाधव ,नामदेव नलवडे ,विशाल अनभुले, निवृत्ती चव्हाण, नामदेव गायकवाड ,दत्तात्रेय अनभुले, ज्ञानेश्वर सावंत ,प्रवीण आवटे, निलेश खुस्पे ,अजित शिंदे, नागेश अनभुले ,हणमंत अनभुले ,धनंजय जाधव, विठ्ठल अनभुले ,विठ्ठल( पिंटू) देविदास अनभु...