डॉ प्रियाताई शिदे यांच्या हस्ते भैरवनाथ राज्यस्तरिय पत्रकार पुरस्कार संदीप जठार यांना प्रदान.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
समाजातील सर्वसामान्य लोकांसाठी काम करणाऱ्या विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करून तडवळे येथील भैरवनाथ कला क्रीडा व ग्रामविकास मंडळाने एक खूप मोठा आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन पिंपरी चिंचवड नगर विकास प्राधिकरण अध्यक्ष श्री सदाशिव खाडे यांनी पुरस्कार वितरण प्रसंगी केले. तडवळे ता खटाव येथे भैरवनाथ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले सर्वप्रथम कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ प्रियाताई शिंदे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मा.अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे,खटावचे युवा नेते राहुल पाटील, माजी जि.प. सदस्य अशोक कुदळे, नाशिकचे पोलीस निरीक्षक जालीदंर पळे, भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी, उपाध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब पवार ,सचिव बाळासाहेब खाडे गुरुजी यांचे हस्ते सरस्वती पूजन आणि दीपप्रज्वलन करून कार्यक्रमला सुरुवात करण्यात आली गेली अठ्ठेचाळीस वर्षा पासून तडवळे येथील भैरवनाथ कला क्रिडा व ग्रामविकास तरुण मंडळ यांचे मार्फत विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना भैरवनाथ राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.यावेळी आमदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी डॉ प्रियाताई शिंदे पुढे म्हणाल्या, समाज परिवर्तन करण्याचे काम गुरुच करू शकतात गुरू आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाचे काम करतात या गावात ऐंशी टक्के शिक्षक आहेत अन त्यांची सर्व काम उल्लेखनीय असतात भैरवनाथ मंडळाचा हा उपक्रम अतीशय स्तुत्य असून यामुळे समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्यांना प्रोत्साहन मिळते.
सदाशिव खाडे म्हणाले,हे तडवळे गाव अतिशय सुशिक्षित आणि आदर्श आहे या गावातील रस्ते करण्यासाठी मी माननीय पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सुमारे तीन कोटी रुपयांचा निधी देऊन रस्ते दुरुस्ती करून घेतली त्याचबरोबर येथील पाणी योजना ही मंजूर करून घेतली होती मात्र सरकार बद्दलल्याने ती पाणी योजना पूर्ण झाली नाही आता शिंदे आणि फडणवीस यांची सरकार आले आहे पुन्हा नव्याने दरजाई पासून या भागात पाणी योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. राज्यस्तरीय भैरवनाथ आर्दश शिक्षक पुरस्कार श्री सुनिल लक्ष्मण शेडगे,व भैरवनाथ राज्यस्तरिय कृषीरत्न पुरस्कार श्री दत्तात्रय दिनकर पाटील, भैरवनाथ राज्यस्तरिय पत्रकारिता पुरस्कार श्री संदिप जठार,क्रीडा क्षेत्रातील भैरवनाथ राज्यस्तरिय क्रीडा रत्न पुरस्कार कु. प्राची देवकर तर समाज कार्य प्रयास सामाजिक विकास संस्था वडूज यांना प्रदान करणेत आला.
हा पुरस्कार वितरण सोहळा कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी डॉ प्रिया शिंदे, पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मा.अध्यक्ष प्रा.सदाशिव खाडे,खटावचे युवा नेते राहुल पाटील, माजी जि.प. सदस्य अशोक कुदळे, नाशिकचे पोलीस निरीक्षक जालीदंर पळे, भैरवनाथ मंडळाचे अध्यक्ष प्रमोद खाडे गुरुजी, उपाध्यक्ष व ग्रा.पं. सदस्य बाळासाहेब पवार ,सचिव बाळासाहेब खाडे गुरुजी ,सरपंच डॉ.प्रकाश पाटोळे, या.सरपंच गणपतराव खाडे,भा.ज.पा. तालुका उपाध्यक्ष अमोल साबळे,नितिन पळे शेठ,काकासो साबळे या.सरपंच,पि.डी.पाटोळे मा.उपसरपंच,हणमंत मदने सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती वडूज,धनंजय नांगरे मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष, शशिकांत साबळे गुरुजी,राजू शेख, ग्रामस्थ इ.मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक शशिकांत साबळे गुरुजी तर आभार अमोल साबळे युवा नेते यांनी केले.
Comments
Post a Comment