येस ग्रुप 1011 एकरा वरती करणार 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग' सोयाबीनला देणार 8100 रुपये दर - येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.
येस ग्रुप 1011 एकरा वरती करणार 'कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग' सोयाबीनला देणार 8100 रुपये दर - येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
माझ्या शेतीमालाला काय दर मिळणार याचे टेन्शन सोडा आणि आमच्याशी नाते जोडा' या येस ग्रुपच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या अभिनव उपक्रमामध्ये शेतकरी ,शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या , गावांनी सहभागी व्हावे असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले
फत्त्यापूर ता. जि. सातारा येथे झालेल्या बागायतदार शेतकरी मेळाव्यात श्री संजय भगत मार्गदर्शन करत होते यावेळी सोसायटी चेअरमन तानाजी घाडगे ,माजी उपसरपंच अधिक घाडगे, येसांकुर कंपनी चे ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून जादा उत्पादन झाले पाहिजे व फिक्स दर मिळवा यासाठी मदर अर्थ हेल्थ फाउंडेशन व येस ग्रुपच्या येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी जाखणगाव ता. खटाव, येसांकुर सीड प्रायव्हेट लिमिटेड, यांच्या संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम 2022-23 हेल्थ कप पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेत लेट रब्बी सोयाबीनला प्रतिक्विंटल 8100 रुपये, गहू पिकास 3300 रुपये फिक्स दर देण्यात येणार आहे व घेवडा, वरून, राजमा यांना बाजारभावापेक्षा पाच टक्के जादा दर देऊन मालाची पूर्णखरेदी केली जाणार आहे स्पर्धेचे पहिले बक्षीस 2 लाख 51 हजार रुपये व हेल्थ कप दुसरे बक्षीस 1 लाख 51 हजार रुपये व प्रमाणपत्र , तिसरी बक्षीस 51 हजार रुपये व इतर बक्षीसे देण्यात येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक लाभ होईल शेतकऱ्यांना सदर पिकाबाबत मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे तसेच कंपनी प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या शेताला मोफत व्हिजिट करणार आहेत याचा पूर्ण खर्च मदरअर्थ हेल्प फौंडेशन करणार आहे औषधे बियाणे खर्चात बचत होणार असल्यामुळे शेतकऱ्यांचा किमान 20 टक्के उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढवण्याचा आमचा मानस आहे शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन येस ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय भगत यांनी केले
कार्यक्रमास उपसरपंच समाधान घाडगे ,ग्रा. प. सदस्य काशिनाथ घाडगे, सदस्य दिलीप शिंदे, संदीप घाडगे ,संजय घाडगे, अमोल घाडगे ,संदीप घाडगे आदी शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते
मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन संजय घाडगे यांनी केले तर धनाजी कातगळे यांनी उपस्थितांचे आभार मानले
Comments
Post a Comment