मलवडी तालुका फलटण येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न.

मलवडी तालुका फलटण  येथे विविध विकास कामांचे उदघाटन व भूमिपूजन संपन्न.

      फलटण मलवडी  प्रतिनिधी: शकील सय्यद. 

मलवडी ता. फलटण येथे विकास कामाचे उदघाटन व भूमिपूजन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर( मा. अध्यक्ष जिल्हा परिषद सातारा) यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रम प्रसंगी त्यानी आपले मनोगत वेक्त करते वेळी ते पुढे म्हणाले की मा. रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे मलवडी व फलटण तालुक्यामध्ये पाणी आले. आणि त्यामुळे दुष्काळ परिस्थिती असलेली गाव आज सुजलाम सुफलाम झाली. अंतिम मुदत फेब्रुवारी महिन्यात संपली आता जवळपास आठ महिने झाले. तरीसुद्धा पंचायत समिती जिल्हा परिषदनगरपालिकामहानगरपाका यांच्या निवडणुका नाहीत. आणि ज्या वेळेला प्रशासक असतो त्यावेळेस काय जिल्हा परिषद मध्ये आत चालले ते कळतच नाही. सी ओ म्हणेल त्या पद्धतीने कारभार चालतो ताबडतोब निवडणुका घ्याव्यात हे सुप्रीम कोर्टाने सांगितले असताना सुद्धा आज आपण पाहतोय आठ महिने होऊन सुद्धा निवडणुका होत नाहीत कधी यांच्या सोयीनुसारच निवडणुका जे काही राजकारण चाललेला आहे ह्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी जर अशाप्रकारे लोकशाहीची गळचेपी होणार असेल तर हे बरोबर नाही. आम्ही कधीही जनतेच्या भावनेला हात घातला नाही विकासाची कामे करूनच लोकांना मत मागितले आज अर्थव्यवस्था ढासळलेली आहे. आज तरुण मंडळींन विचार करावा की आज जे देशांमध्ये वातावरण चाललेला आहे ते काही बरोबर नाही. तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यापेक्षा जय श्रीराम, मारुती स्तोत्र, आणि हनुमान चालीसा आली त्या ठिकाणी विकास झाला असं जर म्हणणार असतील तर ते मात्र साफ चुकीच आहे. आम्ही जन्मताच जय श्रीराम म्हणून आलो राम आमचं दैवतच आहे. त्यामुळे आता काही सिद्ध करायचे गरज नाही की आम्ही हिंदू आहोत जातीला धरून होणारे  राजकारण ही धोक्याची घंटा आहे सर्वांना प्रवाहात बरोबर घेऊन जावे लागेल त्यावेळेला आपणाला सर्वांचा विकास करता येईल. विकासाचं राजकारण करणाऱ्यांच्या पाठी आपण जाव. आम्ही मलवडीच्या विकास कामासाठी कधीही कमी पडणार नाही हा मी आपणास येथे शब्द देतो असी यावेळी त्यानी ग्वाही दिली. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी मा. श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर. मा. श्री धैर्यशील अनपट( सदस्य जिल्हा परिषद सातारा). श्री राम भाऊ ढेकळे( माजी सभापती). विवेकराव शिंदे दादासाहेब बोबडे सरपंच घाडगेवाडी सचिन बोबडे उपसरपंच बीबी दादासाहेब बोबडे सरपंच घाडगेवाडी पत्रकार  लखन नाळे पंचक्रोशीतील नागरिक तसेच मलवडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत मलवडी चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व सदस्य विकास सेवा सोसायटी व मलवडी येथील समस्त ग्रामस्थ हे उपस्थित होते. तंटामुक्तीचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजी पिसाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.