येस ग्रुपच्या "करार शेती " पॅटर्नमुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल - महाव्यवस्थापक संजय सुद्रिक.

येस ग्रुपच्या "करार शेती " पॅटर्नमुळे शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल  - महाव्यवस्थापक संजय सुद्रिक.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

        जाखनगाव येथील येस ग्रुपने सोयाबीन बीजोत्पादन व सोयाबीन खरेदी करार शेती पॅटर्न मुळे शेतकरी कर्जबाजारीपणा कमी होऊन शेतकरी आत्महत्या मध्ये घट होईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकार बोर्डाचे महाव्यवस्थापक संजय सुद्रिक यांनी केले.जाखनगाव ता. खटाव जि. सातारा येथील येस ग्रुपच्या येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनी संचलित सोयाबीन खरेदी केंद्र क्रमांक 1  गोदाम क्रमांक 1  चे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले या समारंभ प्रसंगी सहकार बोर्डाचे महाव्यवस्थापक संजय सुद्रिक बोलत होते यावेळी शेतीमालतारण व्यवस्थापन तज्ञ प्रशांत चास्कर, उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे , येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत, शेती निविष्ठा वितरण हेड पांडुरंग जाधव ,राज्य बाजार व्यवस्थापक कुशाग्र मुंगी ,ॲग्री बाजार व्यवस्थापक रवींद्र साखरे, आर्या  कोलेटरल क्षेत्रीय प्रमुख गणेश देशमुख, येस बँकेचे महाव्यवस्थापक हरतेज सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत म्हणाले   येस फ्रेश फार्मर प्रोडूसर कंपनीच्या माध्यमातून राहुरी कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने शेतकऱ्यांना वेगवेगळी पिके घेण्यास आम्ही प्रशिक्षण देऊन  प्रवृत्त करत असून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग च्या माध्यमातून मूळ भांडवल व त्यावर अधिकचा नफा मिळण्याची व्यवस्था आमच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पॅटर्न मध्ये आहे यामुळे शेतकऱ्यांना गॅरंटेड नफा मिळत असल्यामुळे आतापर्यंत 11  हजार शेतकरी आमच्याशी कनेक्ट झालेले आहेत आमच्या कंपनीच्या माध्यमातून कृषी विभागाच्या सहकार्याने  60 टक्के अनुदानावर सभासद शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देत आहे उपविभागीय कृषी अधिकारी गुरुदत्त काळे म्हणाले  येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून परिसरातील शेतकऱ्यांना जाखनगाव मध्ये गोडाऊन व्यवस्था तसेच जवळच सोयाबीन व सर्व शेतीमाल खरेदी केंद्र झाले आहे आणि शेतकरी सभासदांना वाढीव दर देण्याची संकल्पना व करार शेती असे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचे उपक्रम राबवून येस ग्रुप एक आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे. 
शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जादाचा आर्थिक फायदा व्हावा  हा मूळ उद्देश केंद्र सरकारचा असून तो उद्देश साध्य करत येस फ्रेश फार्मर प्रोड्युसर कंपनी वाटचाल करत आहे इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र  राज्यात फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना आर्थिक मदतीस बँका आजही मागे आहेत सर्व खाजगी सहकारी व नॅशनलाईज बँकांना आम्ही आवाहन करत आहोत की शेतकरी उत्पादक कंपन्यां आज तुमच्या दारात आहेत मात्र दोन ते तीन वर्षानंतर उत्पादक कंपन्यांच्या दारात बँका असतील कंपन्यांची  करोडो रुपयाची उलाढाल तुमच्या बँकेत होईल असेही श्री मुंगी म्हणाले कार्यक्रमास कंपनी सचिव अरविंद विधाते , संचालक बाळकृष्ण चव्हाण, बाळूताई जगताप, सारिकाताई शिंदे, सतीश मोरे , श्रीकांत लावंड ,  येस सेंद्रिय शेतकरी गटाचे अध्यक्ष राजेंद्र भगत ,सचिव संतोष शिंदे ,गो  गटाचे  सचिव रमेश जाधव, उपसरपंच वंदना खटावकर, सूर्यकांत भुजबळ, ओंकार भगत ,किशोर शिंदे, संताजी घोरपडे -पाटील, मनोज पाटील ,मधुकर साळुंखे, हनुमंत धुमाळ ,धनाजी जाधव, अभय जाधव, रंजीत शिंदे धनाजी देशमुख, गजानन शिंदे, किरण शिंदे  आदी शेतकरी सभासद मोठ्या संख्येने  उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन  मानाजी शिंदे सर यांनी केले उपस्थितांचे आभार कंपनी व्यवस्थापक रंजीत भोसले यांनी मानले. 
कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग चा लाभ घ्या मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन व येस ग्रुप यांचे संयुक्त विद्यमाने रब्बी हंगाम 2022 -23 साठी 'हेल्थ कप ' स्पर्धा आयोजित करण्यात  आली असून  कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग अंतर्गत गहू, सोयाबीन ,घेवडा पिकांना फिक्स दर दिला जाणार आहे याचा सर्व शेतकऱ्यांनी कंपनी कार्यालयाशी संपर्क करून लाभ घ्यावा असे आवाहन या कार्यक्रम प्रसंगी संजय भगत यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.