वरात श्रेयवाद थांबवा पुसेगाव ग्रामस्थांना पाणी मिळू द्या . मनसेतालुकाध्यक्ष निलेश जाधव.

पुसेगावात  पाणी पुरवठा योजनेवरून लग्ना आधी वरात  श्रेयवाद थांबवा पुसेगाव ग्रामस्थांना पाणी मिळू द्या . मनसे तालुकाध्यक्ष निलेश जाधव.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 पुसेगाव येथील   मंजूर झालेल्या पाणी पूरवठा योजने वरून  लग्ना  आधी वरात,, सुरू झाली आहे, असे मनसे तालुकाध्यक्ष निलेश जाधव यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले पाणी पुरवठा योजने साठी   11 कोटी 77 मंजूर झाले आहेत , ही योजना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न न करणारेही बॅनर , पत्रक , पोस्टर व बातम्यांच्या  माध्यमातून  स्वताची  जाहिरात बाजी करत आहेत तरी या योजनेचे राजकीय भांडवल न करता योजना पूर्णत्वास कशी जाईल यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करायला हवेत असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुका अध्यक्ष  निलेश जाधव उर्फ आन्नासाहेब यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. 
 मागील कित्येक वर्षे झाले पुसेगाव  गावामध्ये चार चार दिवस पाणी येत नाही येते ते शुद्ध येत नाही ,  पुसेगाव मध्ये स्वछता ग्रहा चा प्रलंबीत प्रश्न सोडवण्यासाठी कोणीही  प्रयत्नशील नाही  गावच्या विकासासाठी  सर्वांनी एकत्र यायची गरज असताना मागचे आठवडाभर  श्रेयवाद लाटण्याचा कार्यक्रम सुरू आहे . ग्रामपंचायत एकत्र लढायची देवस्थान एकमेकांच्या विरोधात लढायचे  परत एकत्र यायचे असा श्रेय वादाचा  उद्योग  राजकीय मंडळी करत आहेत  तुमच्या मागे फिरणाऱ्या कार्यकर्त्यांनी तुमच्या कडे पाहून कोणता आदर्श घ्यावा याचे उत्तर  जाहीर पणे द्या व आजच्या युवकांनी  कोणाचा झेंडा हाती घ्यावा व कोणाच्या मागे फिरावे  असा प्रश्न येथील ग्रामस्थांना पडला आहे या योजनेचे पाणी पुसेगाव ग्रामस्थांना 24 तास मिळू द्या अशी अपेक्षा मी व माझ्या पक्षात मनसे पक्षातर्फे करतो व हा श्रेयवाद कुठे तर थांबावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.