आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मायेची उब ' उपक्रम राबविणार:- रमेश उबाळे.

आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त 'मायेची उब ' उपक्रम राबविणार:- रमेश उबाळे. 


कोरेगाव/प्रतिनिधी आज्जू मुल्ला.


माजी जलसंपदा मंत्री आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग, मूकबधिर, अपंग तसेच गोरगरीब कुटुंबातील लोकांना लोकरचे ब्लॅंकेट देऊन 'मायेची ऊब ' हा सामाजिक उपक्रम राबविणार असल्याचे जिल्हा  राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष रमेश उबाळे यानी घोषित केले. 
 रमेश उबाळे म्हणाले, आ.शशिकांत शिंदे हे सर्वसामान्य, गोरगरीब जनता  तसेच कामगारांचे नेतृत्व आहे. दिन, दलित समाजावर  त्यांचे विशेष प्रेम आहे. सालाबादप्रमाणे या वर्षीही त्यांचा वाढदिवस धुमधडाक्यात सामाजिक न्याय विभागतर्फे साजरा करणार आहे. गेल्या वर्षी अनेक अपंगांना व्यवसाय सुरू करून  स्वतःच्या पायावर उभे राहाण्यासाठी मोफत पत्र्याचे शेड व टपऱ्या दिल्या होत्या. आ.शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन दिवसांपूर्वी सामाजिक न्याय  विभागाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दोन दिवसांपूर्वी झाली. यावर्षी  आशा भवन येथील दिव्यांग विद्यार्थी तसेच गोरगरीब कुटुंबातील लोकांना लोकरापासून बनविलेले ब्लँकेट वाढदिवसानिमित्त देऊन मायेची ऊब हा सामाजिक उपक्रम राबविण्याचे सर्वानुमते निर्णय  झाला आहे. दि.१९ ऑक्टोबर रोजी सातारा येथे असलेल्या आशा भवनमध्ये जाऊन दिव्यांग विद्यार्थ्यांना तसेच कोरेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पाठीमागे असलेल्या  कातकरी वस्तीमध्ये हे लोकराचे ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन रमेश उबाळे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.