विसापूर येथे स्पर्श क्लीनिक व लॅबोरेटरी तर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिर.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
विसापूर तालुका खटाव येथे स्पर्श क्लिनिक अॅण्ड लॅबोरेटरी यांच्यातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे रविवार दिनांक 2 ऑक्टोंबर 2022 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वा ता पर्यंत या शिबीराचे आयोजन असून डॉक्टरांकडून मोफत तपासणीमध्ये ब्लडप्रेशर, ऑक्सीजन, पल्स ,स्त्रीरोग, गर्भसंस्कार मार्गदर्शन, पोटाचे पचनाच्या समस्या ,त्वचारोग निदान, सर्दी, खोकला, बालरोग, अस्थिरोग, संधिवातासाठी मोफत औषधे व रक्त तपासणी मोफत एच. बी. होमोग्लोबिन, मधुमेही रुग्णांसाठी मोफत शुगर तपासणी ,थायरॉईड तपासणी सवलतीच्या दरात असून हे शिबीर जय भवानी कॉम्प्लेक्स भवानीनगर विसापूर येथे आयोजन केले असून डॉ. पराग रणदिवे यांच्या मार्गदर्शनाखाली सौ.सुषमा रणदिवे , तुषार रणदिवे यांच्या उपस्थितीत होणार असून विसापूर परिसरातील ग्रामस्थ , वाडी, वस्तीवरील सर्व लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉक्टर पराग रणदिवे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment