पत्रकारांना धमकावन आता पडेल महागात 50 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा होऊ शकतो तुरुंगवास.

पत्रकारांना धमकावन आता पडेल महागात 50 हजार रुपये दंड व तीन वर्षाचा होऊ शकतो  तुरुंगवास.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 हायकोर्टाच्या टिकेनंतर पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी ही जाहीर केले आहे की पत्रकारांची असभ्यवर्तन करणाऱ्यांना, 50 हजार रुपये दंड आणि पत्रकारांची गैरवर्तणूक करणाऱ्याला तीन वर्षाचा तुरुंगवास होऊ शकतो. पत्रकाराला धमकी देणाऱ्यास आता तुरुंगात पाठवण्यात येईल , पत्रकारांना धमकवण्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहजासहजी जामीन मिळणार नाही .मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी म्हणाले  पत्रकार अडचणीत आल्यास त्वरित त्यांच्याशी संपर्क साधा आणि मदत करा. आणि पत्रकारांची आदराने बोला नाहीतर तुम्हाला मोठी किंमत मोजावी लागेल. गैरवर्तवणूक करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एफआयआर, नोंदवला जाईल .अन्यथा  एसएसपी वर कारवाई केली जाईल,  असे मुख्यमंत्री योगी म्हणाले. तर हीच बाब लक्षात घेऊन प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया अध्यक्ष मार्केडेज काटजू यांनी राज्य सरकारांना ताकीद दिली असून पत्रकारांची गैरवर्तवणूक करू नये अशा सूचना दिली आहेत. कोणत्याही ठिकाणी हाणामारी किंवा गदारोळ झाल्यास  पोलीस पत्रकारांच्या कामात हस्तक्षेप करू शकत नाहीत. पोलिसांनी पत्रकारांना जशी गर्दी हटवतात तशी वागणूक देऊ शकत नाहीत. संबंधित पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर  फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल.काटजू पुढे म्हणाले जसा एखादा वकील आपल्य अशिलांच्या खुनाचा खटला न्यायालयात लढवतो तसा तो खुनी होत नाही तसेच पत्रकार त्यांचे काम सार्वजनिक ठिकाणी करतात पण ते गर्दीचा भाग नसतात त्यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामापासून रोखणे हे माध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारे आहे या संदर्भात प्रेस कौन्सिलने देशाचे कॅबिनेट सचिव , गृह सचिव, मुख्यमंत्री, मुख्य सचिव ,आणि सर्व राज्यांच्या गृहसचिवांना सूचना पाठवल्या असून पत्रकारांसोबत पोलीस किंवा निमलष्करी दलाकडून होणारा हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. असे स्पष्टपणे नमूद करण्यात आलेले आहे पत्रकारांवर असे कोणतेही कृत्य होणार नाही याची काळजी सरकारने घ्यावी पत्रकारांसोबत पोलिसांनी केलेला हिंसाचार हा प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्याच्या अधिकाराचे उल्लंघन मानला जाईल जो घटनेच्या कलम 19A मध्ये देण्यात आला आहे आणि घटनेच्या या कलमानुसार गैरवर्तन करणाऱ्या पोलीस किंवा अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल असे त्यांनी सांगितले तर सध्या पत्रकारांच्या सुरक्षेसाठी न्यायालयाने व पंतप्रधान कार्यालयांनी उचललेले पाऊल खूपच चांगला असून पत्रकारांना इथून पुढे न्याय मिळेलच व अन्याया विरोधात पत्रकारितेच्या माध्यमातून आवाज उठवता येईल असे पत्रकारांनी सांगितले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.