राज्यसरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोरेगाव राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मा. तहसीलदार यांना दिले निवेदन.
राज्यसरकारने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी कोरेगाव राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने मा. तहसीलदार यांना दिले निवेदन.
कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.
परतीच्या पावसाने राज्यातील शेती व शेतीपिकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.या नैसर्गिक आप्पतीमुळे शेतकरी वर्ग मोठा हवालदिल झाला आहे.त्यामुळे राज्यात मोठया प्रमाणात शेतकऱ्याच्या आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे.असे असताना सुद्धा राज्यतील सरकार साधे पंचनामे सुद्धा करायला तयार नाहीत, ही केवढी मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.खरेतर शेतकऱ्यांना तात्काळ मदतीची गरज आहे.परंतु राज्यसरकार फकत टीव्ही वर गप्पा मारण्यात व्यस्त्त आहे.या शेतकऱ्याच्या गंभीर जीवन मरणाच्या यातणेकडे लक्षवेधण्यासाठी व राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी किंवा राज्यशासनाने दयावी, या करिता जिल्हास्तरावर मा. जिल्हाधिकारी यांना तर तालुका स्तरावर मा. तहसीलदार यांना उपरोक्त विषयाणव्येय निवेदन देण्याच्या सूचना राष्ट्रीय काँग्रेस प्रांतध्यक्ष श्री नानाभाऊ पटोले यांनी दिल्या असून शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून, हेक्टरी 75हजार रुपये मदत दयावी.मजुरासाठी विशेष अनुदान जाहीर करावे, या मोदी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे जागतिक भूक निर्देशांकात भारताची घसरणं झाली असून जगात 121 देशामध्ये 107 क्रमांकावरआपला देश आला आहे.हे अतिशय खेदजनक आहे.भारताची ही प्रतिमा सुधारण्यासाठी शेतकरी हिताचे व्यापक धोरण केंद्रासरकार कडून आखण्यात यावेत अशी अग्रही मागणी कोरेगाव राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात आली आहे.या वेळी काँग्रेस कमिटी अध्यक्ष ऍड श्रीकांत चव्हाण, जिल्हा काँग्रेस कमिटी सरचिटणीस नाजीम इनामदार,मनोहर बर्गे,धनंजय बर्गे, अमरसिंह बर्गे, संजय शेलार, बबन खंडाईत, प्रकाश सावंत मधुकर सावंत, विशाल चव्हाण, संतोष ढाणे जिवन जगदाळे इ. कांग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment