नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन.शेतांत कुजलेली शेतीपिके बांधली तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर.
नुकसानग्रस्त शेतीपिकांच्या भरपाईसाठी वडूजमध्ये शिवसेनेचे आंदोलन.शेतांत कुजलेली शेतीपिके बांधली तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
खटाव माण तालुक्यांत अतिवृष्टीमुळे
झालेल्या शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी वडूज ता.खटाव येथेमाजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. जिल्हाप्रमुख प्रतापराव जाधव, तालुकाप्रमुख शहाजीराजे गोडसे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात माजी तालुकाप्रमुख युवराज पाटील, दिनेश देवकर,यशवंत जाधव, संतोष
दुबळे, अमित कुलकर्णी, अमिन आगा, अजित पाटेकर,अजित देवकर, सलमा शेख, सुशांत पार्लेकर, आबासाहेब भोसले, चंद्रकांत फाळके सचिन करमारे, आप्पासाहेब खुडे, अभिजीत साळुंखे, शुभम
गायकवाड, सोमनाथ खुडे, निखील राऊत, आदित्य राऊत, काका पवार आदी शिवसैनिक सहभागी झाले होते.प्रारंभी शिवसैनिकांनी निष्क्रीय राज्यकर्त्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. अतिवृष्टीमुळे सोयाबीन आदी शेतीपिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळालीच पाहिजे अशी मागणी केली. . यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख श्री. जाधव म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतीपिकांच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान धोक्यात आले
आहे. या तालुक्यांत अशी परिस्थिती असताना पालकमंत्री, मतदार संघाचे खासदार तसेच या तालुक्यांचे आमदार दुर्लक्षीतपणाची भूमिका घेत आहेत. पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींच्या निष्क्रीयतेविरोधात शिवसैनिक शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले आहेत. पन्नास खोके.. एकदम ओके करून हे लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत. माजी मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसैनिक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरले आहेत याबाबत तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अन्यथा आगामी काळात व्यापक स्वरूपात आंदोलन करू.यावेळी शिवसैनिकांनी शेतांत कुजलेली शेतीपिके तहसिलदार कार्यालयाच्या प्रवेशद्वाराला बांधली. व आंदोलकांच्यावतीने तहसिलदार किरण जमदाडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने हजर होते.
Comments
Post a Comment