खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या योगदानातून पुसेगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लागली चेअरमन बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन.
खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या योगदानातून पुसेगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लागली चेअरमन बाळासाहेब जाधव यांचे प्रतिपादन.
पुसेगांव प्रतीनिधी पंकज कदम.
पुसेगाव येथील सार्वजनिक पाणीपुरवठा जलजीवन योजना मार्गी लावण्यात खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे पुसेगाव ग्रामपंचायतीचे 14 सदस्यांचा मोलाचा वाटा आहे. विरोधक या योजनेचे श्रेय घेण्यासाठी लोकांची दिशाभूल करीत असून, योजनेसाठी त्यांनी काय परिश्रम केले ते स्पष्ट करावे, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून नुकतीच पुसेगाव साठी जीवन पाणीपुरवठा योजना साठी 11 कोटी 77 लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. या योजनेच्या श्रेयवादासाठी पुसेगाव मध्ये तीन गटामध्ये श्रेयवाद सुरू झाला असून, याबाबत श्री सेवागिरी रयत संघटनेच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी सरपंच विजय मसने, रयत संघटनेचे अध्यक्ष संदीप जाधव, सुरेश शेठ जाधव,विश्वस्त गौरव जाधव, विश्वस्त संतोष वाघ, विश्वस्त सचिन देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गणेश उर्फ अभिजीत जाधव,मधुकर टिळेकर, सत्यम जाधव,सोहराब शिकलगार, संतोष शेठ तारळकर, राजू गाडे, राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राम जाधव, विकास जाधव, शहाजी देवकर, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदरची योजना पूर्ण होणे गरजेचे आहे. लोकांना पाणी पुरवठा प्रश्न सोडवन्याचे आश्वासन जनतेला आम्ही निवडणुकीपूर्वी दिले खासदार श्रीनिवास पाटील व आमदार शशिकांत शिंदे यांच्या योगदानातून पुसेगाव येथील पाणीपुरवठा योजना मार्गी लागली चेअरमन बाळासाहेब जाधव म्हणाले व यांचे त्या आश्वासनाशी आम्ही कटिबद्ध आहोत, श्रेय वादाच्या राजकारणातून योजनेच्या पूर्णत्वासाठी कोणताही अडथळा येणार नाही याची आम्ही दक्षता घेत असून, कोणत्याही परिस्थितीमध्ये पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर पूर्ण केली जाईल. महाविकास आघाडी विरुद्ध जनशक्ती संघटनेचा ग्रामपंचायत निवडणुकीत दारुण पराभव झालेला होता, जनशक्ती संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य गेल्या दीड वर्षापासून ग्रामपंचायतच्या कारभारापासून पूर्णत अलिप्त होते. योजना मंजूर झाल्यावर मात्र योजना आपणच मार्गी लावल्याच्या वल्गना करीत आहेत. योजना पूर्ण करायची होती तर पाच वर्षे सत्ता असताना का नाही केला!असा सवाल बाळासाहेब जाधव यांनी उपस्थित केला. गावचे सरपंच विजय मसणे, ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव, रयत संघटनेचे ग्रामपंचायत सदस्य, आणि रयत संघटनेच्या पाठपुरावामुळेच ही योजना मार्गी लागली असून, या योजनेसाठी आम्ही केलेल्या कागदपत्राची पूर्तता याबाबत आमच्याकडे ,भक्कम पुरावे आहेत. विरोधकांनी जनता दरबार भरून समोरासमोर यावे, आणि आपली भूमिका स्पष्ट करावी आणि मग जनता ठरवेल, या कामासाठी खरे व प्रामाणिक योगदान कोणाचे आहे. असे बाळासाहेब जाधव यांनी ठणकावून सांगितले. पाणीपुरवठा योजना पुसेगाव चा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. त्यामुळे जनतेच्या प्रश्नासाठी कोणताही राजकीय भेदभाव न ठेवता सर्वांनी एकत्र येऊन ही योजना तात्काळ पूर्ण करण्यासाठी गरज असल्याचे ग्रामपंचायत सदस्य गणेश जाधव यांनी सांगितले.
सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव यांनी पुसेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व केले होते. परंतु सध्याच्या स्थितीत डॉक्टर जाधव हे भाजप कार्यकर्त्यांच्या फ्लेक्स बोर्डवर झळकत आहेत. याबद्दल आश्चर्य व्यक्त करून चेअरमन बाळासाहेब जाधव यांनी डॉक्टर जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आवाहन केले आहे.
Comments
Post a Comment