पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेनेने प्रथम प्रयत्न केलेग्रामस्थ हे विसरणार नाहीत:-प्रताप जाधव.

पाणीपुरवठा योजनेसाठी शिवसेनेने प्रथम प्रयत्न केले
ग्रामस्थ हे विसरणार नाहीत:-प्रताप जाधव.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात श्री सेवागिरी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने पुसेगाव व पुसेगाव मधील बाजारपेठेचे नाव प्रसिद्ध आहे दहा ते बारा हजार लोक वस्ती असलेले गाव प्रलंबित पाणीपुरवठा योजनेमुळे पिण्याच्या पाण्यासाठी बरेच दिवस झाले वंचित राहिले आहे पाणीसाठा मुबलक नसल्यामुळे गावचे पाणी योजना सुरळीत नाही हा प्रामुख्याने प्रश्न कायमच अनुत्तरीत राहिला आहे.
गेले एक दोन वर्षे झालं गावातील नेते आपापल्या परीने या योजना पूर्णत्वास जावी व  मंजुरी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहे त्याचबरोबर शिवसेनेनेही गेले एक वर्षांपूर्वी त्यावेळचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन सदर प्रस्ताव व त्याचे डिटेल्स मंत्री महोदयांना दिले होते त्यावेळी तात्काळ याविषयी योजनेस निधी प्राप्त व्हावा याचा गावातून सर्वे होऊन प्रस्ताव सादर करावा असे आदेश मंत्री महोदयांनी संबंधित विभागाला दिले होते. 

मंत्री  पाटील यांनी गावातील ग्रामपंचायत सदस्य व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठकी लावली होती  तेव्हा कोणी उपस्थिती मंत्रालयात लावली नाही ही खेदजनक बाब  असल्याचे प्रताप जाधव यांनी सांगितले या श्रेयवादाच्या लढाईत न पडता गावकऱ्यांची तहान भागवावी व गावातील लोकांना 24 तास पाणी मिळावे व  प्रलंबित प्रश्न मार्गी लागावे यासाठी शिवसेना कायमच प्रयत्नशील  राहिली आहे. 
मतदारसंघातील दोन लोकप्रतिनिधी दोन खासदार असताना सुद्धा पुसेगाव सारख्या महत्त्वाच्या ठिकाणी एकही मोठा निधी आजपर्यंत पडलेला नाही ही दुःखाची बाब आहे असे आवर्जून प्रताप जाधव यांनी सांगितले तर कोरेगाव मतदारसंघातील मोठी गावे त्यातीलच एक महत्त्वाचे व राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं व बाजारपेठ, तीर्थक्षेत्र ,बटाटा बाजारपेठ, आले बाजारपेठ अशा विविधतेने असलेले गाव पुसेगाव आहे आज पर्यंत एकही मोठा निधी या गावात लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून पडलेला नाही स्मशानभूमीचे  रस्त्याचे रखडलेले काम या यासाठी खासदार व आमदारांनी दोनदा निधी टाकला होता तरीसुद्धा स्मशानभूमीची दुरवस्था आहे . बाजारपेठेमधून जाणारा मुख्य मार्ग  रखडलेल काम स्वच्छालय नाही प्रवाशांची गैरसोय एसटी स्टँड नाही, तर
पुसेगाव मधील वार्ड नंबर सहा येथील नाले व मूलभूत सुविधा नसल्यामुळे पावसाचे पाणी जास्त प्रमाणात साठल्यामुळे सगळ्यात मोठे डेंगूचे रुग्ण या वार्डमध्ये सापडले आहेत हा ही विषय लाजिरवाणी बाब आहे याही विषयाकडे गांभीर्याने लक्ष घालावे
देवस्थानच्या रथ मार्गाचे काम गावातील काँक्रिटीकरण या सर्व विषयाला दोन्ही लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून मोठा निधी आणून गावच्या हितासाठी सर्व नेतेमंडळींनी एका व्यासपीठावर येऊन कोणतेही भेदभाव न करता गावचे विकासासाठी एकत्र यावे अशी भावना प्रताप जाधव यांनी व्यक्त केली. 
निधी मंजूर झाला असा गाजावाजा करून मोठमोठे  बॅनर ,बोर्ड लावून करण्यात आला आहे. परंतु नक्की याचा नारळ कधी फुटणार असा प्रश्न देखील त्यांनी केला आहे या आधी ही असे बॅनर गावात झळकले होते ही त्यांनी आठवण करून दिली.
देवस्थान ट्रस्टच्या माझ्या अपयशानंतर गावातीलनेतेमंडळी ना माझा विसर पडला आहे ही दुःखाची बाब आहे.परंतु दोन झालेल्या निवडणुकांमध्ये  माझा व माझ्या पक्षाच्या वापर करून या निवडणुकीमध्ये यश संपादन झाले हेही विसरता कामा नये असे ते म्हणाले. 
जनतेच्या रेट्यावर व आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला वाकवण्याची धमक आजही माझ्यात आहे
खचून न जाता मी व माझ्या पक्षाच्या माध्यमातून जनहितार्थ कामे  करीन व गावच्या विकासासाठी कटिबंध राहीन व पुसेगाव सुवर्णनगरी विकासासाठी एक पाऊल पुढे सदैव माझे व माझ्या पक्षाचे असेल असे यावेळी प्रताप जाधव यांनी सांगितले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.