विसापूर येथील महिलांनी आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा विजय डोके यांचे आवाहन.

विसापूर येथील महिलांनी  आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार  प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा    विजय डोके यांचे आवाहन.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
विसापूर ता. खटाव येथे आयडीबीआय ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था, सातारा आणि महिला आर्थिक विकास महामंडळ, अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज यांच्या माध्यमातून विसापूर येथे १० दिवसीय दुग्धव्यवसाय प्रशिक्षण सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रशिक्षण संस्थेचे संचालक प्रशांत पाटील, व्यवस्थापक निलेश सूर्यवंशी,  मआविम जिल्हा समन्वयक विजय डोके , सहाय्यक जिल्हा समन्वयक अशोक चव्हाण, तज्ञ प्रशिक्षक ऋषीकुमार फुले, अस्मिता लोकसंचालित साधन केंद्र वडूज व्यवस्थापक सीमा पुजारी, संयोगिनी कोमल फडतरे, CRP गीतांजली ढोले यांची प्रमुख उपस्थित होती. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात मआविम जिल्हा समन्वय विजय डोके  यांनी महिलांना बचत गटाच्या माध्यमातून हे प्रशिक्षण देण्यात आले असुन महिलांनी व्यवसायात उतरणे काळाची गरज आहे. त्यातून कुटुंबाचा  आणि गावाचा आर्थिक विकास होऊ शकतो असे सांगितले. आयडीबीआय आरसेटीचे संचालक प्रशांत पाटील यांनी संस्थेच्या कामकाजाची माहीती देऊन प्रशिक्षण संस्थेत घेण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षणाची माहीती दिली. तसेच प्रशिक्षण घेऊन नियमित बचत करून, कर्ज घेऊन अनेक महिला आपला व्यवसाय कसा करत आहेत. याची अनेक उदाहरणे देऊन महिलांना प्रशिक्षणासाठी प्रेरित केले. 
आयडीबीआय आरसेटीचे व्यवस्थापक निलेश सूर्यवंशी यांनी प्रशिक्षण कार्यक्रमाची माहीती देऊन नियम व अटी समजाऊन सांगितले. तसेच प्रशिक्षण यशस्वी पूर्ण केल्यानंतर नॅशनल ॲकॅडमी ऑफ रूडसेट यांच्याकडून मूल्यांकन आणि प्रमाणन नियंत्रक प्रिती पांडे यांची टीम उद्योजकीय विकास कार्यक्रम आणि  तांत्रिक ( दुग्धव्यवसाय ) प्रशिक्षण यांची मूल्यांकन प्रक्रिया घेऊन पात्र सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करतील असे म्हणाल्या.दुग्धव्यवसाय व शेळीपालन तज्ञ प्रशिक्षक ऋषीकुमार फुले यांनी महिलांना प्रशिक्षण दरम्यान शिकवल्या जाणार्‍या विविध विषयांची माहिती देऊन, महिला अक्षर साक्षर झाल्या असल्या तरी आर्थिक साक्षर होऊन व्यवसाय साक्षर होणे गरजेचे आहे. यावर मार्गदर्शन केले. 
सीमा पुजारी यांनी हे प्रशिक्षण एक संधी आहे आणि या संधीचा फायदा घेऊन घरगुती पद्धतीमध्ये केल्या जाणार्‍या व्यवसायाला व्यवसायिक स्वरूप देऊन महिला सबलीकरणाकडे लक्ष वेधले. कोमल फडतरे यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले तर गीतांजली  ढोले यांनी सर्वांचे आभार मानून हा प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वी करू असा विश्वास दिला.या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी विसापूर, जाखणगाव, कळंबी आणि खटाव या गावातील ३५ महिलांनी प्रशिक्षण घेण्यासाठी फाॅर्म भरून सहभाग दर्शवला आहे तर विसापूर, रेवरकरवाडी, बुधावलेवाडी, खातगुण ,पुसेगाव, वर्धनगड, जांब, बिटलेवाडी या परिसरातील सर्व महिलांनी  प्रशिक्षणाचा फायदा घ्यावा असे संस्थेच्या मार्फत आवाहन करण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.