गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम पुसेगांव परिसरातील महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा व किर्तन आयोजन.

गौरव जाधव मित्र समूहाचा उपक्रम  पुसेगांव परिसरातील महिलांसाठी मोफत तीर्थक्षेत्र यात्रा व किर्तन आयोजन.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

येथील श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

सोमवारी (ता. ७) पुसेगाव व पंचक्रोशीतील महिलांसाठी मोफत तुळजापूर, पंढरपूर, म्हसवड, गोंदवले तीर्थक्षेत्र व देवदर्शन यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी इच्छुक महिलांनी गुरूवार (ता. ३) अखेर मोबाईल नंबर ९७६६५६८२६८ या क्रमांकाशी संपर्क साधून नाव नोंदणी करण्याचे आवाहन गौरव जाधव मित्र समूहातर्फे करण्यात आले आहे. 

पुसेगाव पंचक्रोशीतील भाविक व नागरिकांसाठी मंगळवारी (ता. ८) वाढदिनी झी टॉकीज प्रस्तुत मन मंदिरा (गजर भक्तीचा) या किर्तनसोहळ्यातील नामवंत कीर्तनकार ह.भ.प. सागर (महाराज) बोराटे यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत आयोजित करण्यात आले आहे. 

गावातील १०० गरजू कष्टकरी कुटुंबाना किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार असून आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात येणार आहे. तसेच आपले सामाजिक दातृत्व जपत वाढदिवसाच्या निमित्ताने अन्य सामजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती गौरव जाधव मित्र समूहाने दिली आहे  या उपक्रमाचा महिलानी लाभ घ्यावा असे सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त गौरव जाधव आवाहन केले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.