नवरात्री उत्सवानिमित्त सोमंथळी तालुका फलटण येथे ह.भ.प.हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य किर्तन उत्साहात संपन्न.
नवरात्री उत्सवानिमित्त सोमंथळी तालुका फलटण येथे ह.भ.प.हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य किर्तन उत्साहात संपन्न.
फलटण सोमंथळी प्रतिनिधी.निशिकांत अहिवळे.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.मंडळाच्या वतीने युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण हनुमंत महाराज सोडमिसे यांचे सुश्राव्य असे किर्तन झाले त्यांनी किर्तन सेवेसाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा घेतलेला अभंग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी प्रीती तसेच कीर्तन सेवेत देवीची उत्पत्ती देवीचे चरित्र व 51 शक्तिपीठांची निर्मिती कशी झाली हे सविस्तर सांगितले पुढे त्यांनी आईचे महत्व सांगत असताना त्यांनी आईच्या गर्भात मुलावर आई कसे संस्कार करत असते याचेही महत्त्व त्यांनी लोकांना पटवून दिले या कार्यक्रमात प्रामुख्याने महिला मोठया भवसंख्येने उपस्थितीत होत्या या कीर्तन सेवेत किरण महाराज अहिवळे गोपीचंद खरात बाळासाहेब पवार व बापूराव सोडमिसे महाराज सो मंथळी यांनी त्यांना साथ दिली या कार्यक्रमात ह्यूमन राईट फाउंडेशन ऑफ इंडिया चे सातारा जिल्हा अध्यक्ष व सातारा24 तास न्यूज चे जिल्हा संपादक श्री बबनराव मदने उर्फ नाना यांच्या हस्ते देवीची आरती होऊन मंडळाच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments
Post a Comment