भौतिक ,आर्थिक आणि मानव विकास हे तीन ग्रामविकासाचे महत्त्वाचे घटक : माजी विभागीय आयुक्त पुणे. चंद्रकांत दळवी.
भौतिक ,आर्थिक आणि मानव विकास हे तीन ग्रामविकासाचे महत्त्वाचे घटक : माजी विभागीय आयुक्त पुणे. चंद्रकांत दळवी.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
जेव्हा देशात १० टक्के शहरीकरण होते तेव्हा महात्मा गांधींनी "खेड्याकडे चला" असे आवाहन केले होते. आता शहरीकरण ५० टक्क्यांवर गेले आहे. अशा काळात खेड्याकडे जाताना म्हणजेच ग्रामविकास करताना गावाचा भौतिक विकास, आर्थिक विकास आणि मानव विकास हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. या घटकांना वगळून ग्रामविकास अशक्य आहे, असे प्रतिपादन सत्त्व फाउंडेशनचे अध्यक्ष, पुणे विभागचे माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी केले. चंद्रकांत दळवी म्हणाले, ‘‘गावात सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा उपलब्ध करणे, प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न वाढवत राहणीमाण सुधारणे, तरुणवर्ग, विद्यार्थी, महिला, मागासवर्गीय, आदिवासी घटक, महिला यांच्या कल्याणाचे कार्यक्रम राबवणे, व्यसनमुक्त गाव आणि धार्मिक सदाचरण या बाबी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. श्री. दळवी यांनी स्वतःच्या निढळच्या विकासकामांचे सादरीकरण केले. गावाबाहेर गेलेल्या ग्रामस्थांची नोकरवर्ग आणि व्यावसायिक संघटनेची स्थापना करुन त्यानंतर ग्रामविकास आराखडा तयार केला. गावाच्या प्राधान्याच्या गरजा विचारात घेतल्या. भौतिक, आर्थिक आणि मानव विकास या तीन भागात निढळचा विकास आराखडा तयार केला. यातून मागील ४० वर्षात टप्प्याटप्प्याने गावाचा विकास होत गेला. गावांचा सर्वांगिण विकास होणे गरजेचे आहे. त्यासाठी गावाने एकत्र आले पाहिजे. हे काम सातत्याने करावे लागेल. त्यासाठी चांगले, ध्येयनिष्ठ नेतृत्व गरजेचे आहे. असे नेतृत्व त्याच गावातून आले पाहिजे. गावातील प्रत्येक घटकांत प्रचंड क्षमता आहे. ती विकासाला जोडली पाहिजे. ग्रामविकास समितीच्या माध्यमातून सर्वांनी एकत्र यावे. पक्षीय राजकारण असणे गैर नाही, निवडणुकांतील लोकांचा सहभागही आवश्यकच आहे. मात्र निवडणुका संपल्या की गावाच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यावे.
श्री. राधाकृष्ण गमे बोलताना म्हणाले की, शेती आणि ग्रामविकासात महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या सह्याद्री फार्म्स व सत्व फाऊंडेशन या संस्थांचा प्रभावी समन्वय मोहाडी क्लस्टरमधील १६ गावांना विकासाच्या वाटेवर पुढे नेईल. अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन मिळाले. गावात ध्येयनिष्ठ तरुणांचे नेतृत्व पुढे आले तर आणि लोक एकत्र आले तर गावात क्रांती घडते. त्यातूनच गावाचा सर्वांगिण विकास घडतो. शासनाकडून आता मोठ्या प्रमाणावर निधी हा थेट ग्रामपंचायतींकडे येतो. या अर्थाने ग्रामपंचायती सक्षम झाल्या आहेत. या परिस्थितीत गावाचा विकास आराखडा प्रत्यक्षात येणे शक्य आहे. राजकारण ठराविक काळापुरते मर्यादित ठेवावे. नंतर विकासाला प्राधान्य द्यावे.असिमा मित्तल म्हणाल्या, सह्याद्री फार्म्स व सत्व फाऊंडेशनच्या पुढाकारातून होत असलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद आहे. मोहाडी क्लस्टरमधील १६ गांवे ही विकासाचे आदर्श मॉडेल म्हणून समोर येतील. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून सर्वतोपरी साह्य केले जाईल.विलास शिंदे म्हणाले, राज्यातील एकूण गावांची संख्या पाहता आदर्श गावे म्हणून अगदीच मोजकी नावे डोळ्यासमोर येतात. याचे कारण तुलनेने शहरात संधी जास्त असतात. त्यातून ग्रामीण भागातील प्रत्येकाची ओढ ही शहराकडे जाण्याची असते. गावात संधी उपलब्ध झाल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. त्यासाठी फक्त एका गावाचा विकास हे ध्येय न ठेवता एकाच वेळी अनेक गावांचा विकास हा क्लस्टर दृष्टीकोन समोर ठेवणे गरजेचे आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी हीच संकल्पना मांडली आहे. मोहाडी क्लस्टर केंद्रस्थानी ठेवून आमचे प्रयत्न सुरु आहेत असे म्हणाले सुरेश नखाते यांनी सुत्रसंचालन केले. प्रमोद राजेभोसले यांनी आभार मानले.
Comments
Post a Comment