धार्मिक कार्यात सहभागी झाल्याच्या कारणावरून कोरेगावात एकावर जीवघेणा हल्ला ;

धार्मिक कार्यात सहभागी झाल्याच्या कारणावरून कोरेगावात एकावर जीवघेणा हल्ला ;

कोरेगाव प्रतिनिधी आज्जू मुल्ला.

ईद-ए-मिलाद कार्यक्रमांमध्ये तू का आलास व तुला या कार्यक्रमाची बातमी कोणी द्यावया सांगितली या कारणावरून येथील जामा मशिदीचे  नवनिर्वाचित अध्यक्ष हमीद नजीर मुल्ला वय पन्नास वर्ष यांनी चिडून जाऊन फिरोज काझी व त्यांचा मुलगा सलमान काझी यांच्यावर जीव घेणा हल्ला करून जखमी केले. याबाबतची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे.कोरेगाव येथील सलमान काजी आपल्या खाजगी नोकरी कामावर गेला असताना परत घरी माघारी जेवण करण्यासाठी येताना दुपारी दोनच्या दरम्यान साखळी पुलानजीक असलेल्या हमीद मुल्ला यांच्या फळांच्या गाड्या शेजारी लोकांची गर्दी झाली असल्याकारणाने काय झाले हे पाहण्यासाठी गेला असता,हमीद मुल्ला हे फिरोज काझी ( मुन्नाभाई ) यास तू ईद-ए-मिलाद कार्यक्रमात का आलास व त्या कार्यक्रमाची बातमी कोणाला विचारून दिलीस म्हणून शिवीगाळ व दमदाटी करीत होते व हाताने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून तेथे पडलेला दगड त्यांनी फिरोज काजीच्या छातीवर मारला हे पाहून फिरोजच्या मुलगा सलमान काझीने माझ्या वडिलाला मारू नका म्हणून तो मध्ये पडला हे पाहून हमीद मुल्ला हा तेथून त्याच्या दुकानात पळत गेला व लोखंडी कोयता आणला  व त्याने फिरोज काजीवर वार केला तो वार त्यांनी चुकविला वडिलाला मारत आहे म्हणून सलमान काझी मध्ये पडला म्हणून पुन्हा वार हमीद मुल्ला याने सलमान काजींवर केला तो उजव्या हाताच्या अंगठ्यावर व शेजारच्या बोटावर लागल्याने जखम होऊन रक्त येऊ लागले. सदरची भांडणे तिथे उभे असलेल्या शहाबाज हमीद मुलांनी  दिलावर काजी यांनी सोडवले, सदर हाताला मोठी जखम झाल्याने सलमान काजी यास त्याचे वडील फिरोज काझी यांनी येथील ग्रामीण रुग्णालयात नेले, तेथे उपचार घेऊन सदर गुन्ह्याची नोंद कोरेगाव पोलीस स्टेशनला करण्यात आली. अधिक तपास कोरेगाव पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.