सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती सहयोगी संस्था ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने रेशनिंग विषयी तहसीलदार सो फलटण यांना निवेदन.

सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती सहयोगी संस्था ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था यांच्या वतीने रेशनिंग विषयी तहसीलदार सो फलटण यांना निवेदन.

  प्रतिनिधी फलटण.प्रवीण अहिवळे. 

फलटण येथील अनेक गरजू गरीब पात्र कुटुंबांना रेशनिंग विषयी समस्या निर्माण होत आहेत. त्यामध्ये अनेक कुटुंबांना रेशनिंग मिळत नाही. ज्या पात्र रेशन कार्डधारकांनी आपल्या कार्यालयाकडे 44 हजार रुपये चा उत्पन्न दाखला ग्रामसभा ठराव कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड अर्ज व इतर कागदपत्रे आपल्या कार्यालयाकडे सादर केले असतील अशा कार्डधारकांना रेशन तातडीने मिळावे. रेशन कार्डधारकांना शासनाने जाहीर केलेल्या आनंदाचा शिधा या योजनेमध्ये अनेक कुटुंबांना साखर मिळालेली नाही. रेशन मिळण्यासाठी उत्पन्न मर्यादा ही 44 हजारांऐवजी एक लाख रुपये करावी हे मुद्दे सदर निवेदनात देण्यात आले. तसेच चालू महिन्यातील रेशनिंग वाटप ही चालू करण्यात यावी अशी मागणी तहसीलदार फलटण यांना केली असता तहसीलदार फलटण यांनी माहिती दिली की येत्या दोनच दिवसात आम्ही चालू महिन्यातील रेशनिंग वाटप करणार आहोत. सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती तसेच ह्यूमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया व साथी सामाजिक संस्था या शिष्टमंडळाला सात दिवसाच्या आत मध्ये वर नमूद केलेल्या विषयांवर योग्य तो निर्णय घेऊन चर्चेसाठी बोलवावे हे निवेदन देण्यात आले. निवेदन देतेवेळी सातारा जिल्हा रेशनिंग कृती समितीचे समन्वयक शकील सय्यद, हिंदुराव गायकवाड सातारा जिल्हा रेशनिंग कृती समिती, प्रवीण अहिवळे संपर्कप्रमुख ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया, विशाल घनवट ह्युमन राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया फलटण तालुका सल्लागार, राजेंद्र मदने सचिव हुमान राइट्स फाउंडेशन ऑफ इंडिया सातारा जिल्हा कमिटी इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.