शेतकऱ्यांनी आर्थिक नफ्यासाठी करार शेती करावी- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कसलाही फिक्स दराचा आधार नसल्यामुळे काढणीपश्चात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी करार शेतीतून आर्थिक नफा घ्यावा असे अवाहन येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी केले दहिगाव येथे केले. दहिगाव ता. कोरेगाव येथे करार शेती बाबत लोक गौरव विकास फाउंडेशन दहिगाव यांनी आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी चव्हाण (भाऊ) हे होते यावेळी किसन चव्हाण, विजय चव्हाण, दत्तात्रय खराडे ,मधुकर चव्हाण, तानाजी चव्हाण, भरत चव्हाण, एस आर एस चे ओंकार भगत यांची प्रमुख उपस्थिती होती.शेतकरी उत्पादन वाढवण्यात सक्षम झाला मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य व अपेक्षित दर मिळत नाही यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते याचा विचार करून करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुप व मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन यांनी रब्बी हंगाम 2022 -23 साठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पॅटर्न जाहीर केला असून सोयाबीनला प्रतिक्विंटल 8100 रुपये दर ,गहू पिकाला प्रति क्विंटल 3300 रुपये दर ,घेवडा बाजारभावापेक्षा
5 टक्के ज्यादा दर देण्यासाठी रब्बी हंगाम कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पॅटर्न आणला आहे असे संजय भगत म्हणाले कार्यक्रमास प्रकाश चव्हाण, अजित चव्हाण, भरत भोसले, संभाजी चव्हाण, सतीश चव्हाण, रणजीत चव्हाण, शरद चव्हाण, आदी बागायतदार शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय खराडे यांनी केले तर मान्यवरांचे आभार सुरेश चव्हाण यांनी मानले.
25 एकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असलेले केवळ 51 स्पर्धक गाव, वाडी ,वस्ती, गट ,समूह शेतकरी उत्पादक कंपनी यांचा मोफत मध्ये रब्बी हंगाम हेल्थ कप स्पर्धा 2022- 23 मध्ये समावेश होणार असून त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक 2 लाख 51 हजार रुपये व हेल्थ कप ,द्वितीय क्रमांक 1 लाख 51 हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ 25 हजार रुपये व प्रमाणपत्र या प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हावे असेही संजय भगत म्हणाले
Comments
Post a Comment