सत्ता होती तर पाणी योजना दीड वर्ष का रखडलीपुसेगाव ची पाणी योजना श्रेयवादात अडकवू नका:-उपसरपंच पृथ्वीराज जाधव
पुसेगाव ची पाणी योजना श्रेयवादात अडकवू नका:-
उपसरपंच पृथ्वीराज जाधव
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगावची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना गेल्या दीड वर्षांपासून रखडली होती,शासन तुमच्याच विचाराचे होते मग तुम्हांला का या योजनेला मंजुरी आणता आली नाही.?पुसेगावकरांच्या विनंतीला मान देऊन आ महेश शिंदे यांनी खटाव ,देगाव,बुध बरोबरच तातडीने या योजनेत पुसेगाव चा ही समावेश करून कॅबिनेट मध्ये तात्काळ मंजुरी मिळवली.त्यामुळेच विरोधकांना पोटशूळ उठला आहे. नागरिकांच्या हितासाठी द्वेषभावना बाजूला ठेवून ,श्रेयवादात न अडकता विरोधकांनी योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सहकार्य करावे.योजना पूर्ण होऊ द्या समोरासमोर खरेखोटे करण्यास आम्ही कधीही तयार आहोत असा इशारा पुसेगाव चे उपसरपंच पृथ्वीराज जाधव यांनी दिला आहे.दिलेल्या माहितीनुसार मागील पंचवार्षिकला पुसेगावचा राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतंर्गत प्रस्ताव सादर केला होता.त्यावेळी तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व सदस्य यांनी फ्ललोटिंग दाखले,कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे सर्व्हे दाखले,यात्रेत येणाऱ्या भाविकांचे फ्ललोटिंग दाखले आदी कागदपत्रांसह या योजनेचा प्रस्ताव जिल्हापरिषद कडे पाठवला होता. त्यानंतर ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले. जुन्याच सादर केलेल्या योजनेचा आधार घेऊन नूतन ग्रामपंचायत कार्यकारिणीने पुढील २५ वर्षांच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून नवीन प्रस्ताव तयार केला.
परंतु शासन दरबारी हा प्रस्ताव ग्रामपंचायत सत्ता आल्यापासून दीड वर्ष झालं तरी रखडला.त्यामुळे राजकारण बाजूला सारून गावच्या हितासाठी विश्वस्त रणधीर जाधव ,उपसरपंच पृथ्वीराज जाधव ,विशाल जाधव, ,सूरज जाधव व त्यांच्या विचारांच्या सदस्यांनी आ महेश शिंदे यांची भेट घेऊन ह्या योजनेला मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंती केली.आ शिंदे यांनी तात्काळ पुसेगावच्या योजनेचा महाराष्ट्र जलजीवन प्राधिकरण मध्ये खटाव,बुध देगाव या गावाबरोबरच समावेश केला .पाणीपुरवठा कॅबिनेटमंत्री ना गुलाबराव पाटील यांच्या कडून मंत्रालयात मंजुरी मिळवली.आणि ११ कोटी ७७ लाख रुपये मंजूर करून घेतले.
आमदार शिंदे यांनी केलेल्या या कामाचे कौतुक म्हणून पुसेगावात राजकारण बाजूला सारत आमदार महेश शिंदे यांचे फ्लेक्स लावल्याने विरोधकांना धडकी भरलीआहे.
' न ' केलेल्या कामाचे श्रेय घेण्यासाठी नको ते आरोप करून पत्रकबाजी करत आहेत.व वास्तविक श्रेयवाद बाजूला ठेवून सदर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वानी एकत्र येऊन सहकार्य करावे.योजना पूर्ण झाल्यावर एकाच व्यासपीठावर समोरासमोर येऊन खरेखोटे करण्यास आम्ही पुराव्यानिशी कधीही तयार आहोत असा इशारा पुसेगाव ग्रामपंचायतीचे उपसरपंच पृथ्वीराज जाधव व ग्रामपंचायत युवा सदस्य विशाल जाधव यांनी दिला आहे.
कोंबडा कुणाचा ओरडला यापेक्षा दिवस उगवण्याला विरोधकांनी महत्त्व दिले पाहिजे. पुसेगावासाठी ही योजना पूर्ण होणे आवश्यक आहे. मात्र विरोधक द्वेषभावना ठेऊन
या योजनेस आडकाठी आणत आहेत.गावातील राजकीय गट तट न पाहता आ महेश शिंदे पुसेगावसाठी निधी उपलब्द्ध करत आहेत,आगामी काळात श्री सेवागिरी देवस्थान च्या विकासासाठी भरघोस विकास निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्नात आहेत,मात्र विरोधकांनी नको त्या गोष्टीचे भांडवल करू नये.
--------- विश्वस्त व माजी उपसरपंच रणधीर जाधव
राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या डॉ सुरेश जाधव यांच्या विचारांची उंची कुणी मोजू नये.गावाच्या हितासाठी त्यांनी कितीतरी आंदोलने विरोधकांना सोबत घेऊन केली आहेत.गावच्या विकासासाठी कुणीही केलेल्या कामाचे ते नेहमीच कौतुक करतात, कुणाच्या फ्लेक्स वर त्यांचा फोटो छापला म्हणून विरोधकांनी तोच मुद्दा करण्याचे कारण नाही.
------- सूरज जाधव,
Comments
Post a Comment