ॲकॅडमी ऑफ मार्डन आर्ट्स संस्थेचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम सपंन्न.

ॲकॅडमी ऑफ मार्डन आर्ट्स संस्थेचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन कार्यक्रम सपंन्न. 

 फलटण प्रतिनिधी राजेंद्र मदने

 ॲकॅडमी ऑफ मॉर्डन आर्ट्स संस्थेचा भव्य फॅशन कार्यक्रमाचे सौ.सुनेत्रा ताई अजित दादा पवार यांच्या हस्ते उदघाटन करून फॅशन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी ॲकॅडमी ऑफ मॉर्डन आर्ट्स या संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा सिने स्टार अभिनेत्री सौ.नयन संतोष राजमाने यांनी आपले मनोगत व्यक्त करते वेळी त्या पुढे म्हणाल्या ही संस्था बारामती मध्ये व पुणे जिल्हा परिसरामध्ये 2010 सालापासून चांगल्या पद्धतीने चालवत आहे, तेव्हापासून ही संस्था महाराष्ट्र जागतिक पदावर कार्यरत आहे. सदर संस्थेमध्ये फॅशन डिझाईनिंग. हॉटेल मॅनेजमेंट. इंटेरियर डिझाईनिंग ही दोन वर्षाची प्रोफेशन कोर्स शिकवली जात असून संस्थेच्या माध्यमातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 100% गॅरंटी ने जॉब दिले जाते. आज पर्यंतच्या कार्यखंडामध्ये संस्थेकडून भारत व भारताबाहेर अनेक विद्यार्थी जॉब करीत आहेत अशी माहिती यावेळी दिली. या ॲकॅडमी ऑफ मॉर्डन फॅशन मध्ये अनेक महिला यांनी उपस्थितीत राहून चांगला प्रतिसाद दिल्याने या संस्थेच्या अध्यक्षा सौ. नयन राजेमाने यांनी सर्वांचे आभार मानले.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.