कोरेगाव आणि माण- खटाव विधानसभा मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार-जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव.

कोरेगाव आणि माण- खटाव विधानसभा  मतदारसंघातून बहुसंख्येने शिवसैनिक दसरा मेळव्याला शिवतीर्थावर उपस्थित राहणार-जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

शिवसेना आणि शिवतीर्थावरील दसरा मेळावा हे अतूट नाते असून यावर्षीही बहुसंख्येने निष्ठावान शिवसैनिक दसरा मेळाव्याला वाजत गाजत उपस्थित राहणार असून शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धवसाहेब ठाकरे यांच्या विचारांचे सोने लुटणार आहेत.हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेनेच्या १९६६ च्या स्थापनेपासून होत असलेला शिवतीर्थावरील दसरा मेळावा आजतागायत एक नेता, एक मैदान ,एक विचार असाच होत आहे.हिंदुत्व आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला असून त्याच विचारधारेवर आजही शिवसेना ठाम असून कितीही वादळे आली तरी शिवसेना डगमगली नसून आत्मसन्मान आणि निष्ठेचा वारसा आजही जपला असून सद्यस्थितीत चालू राजकीय घडामोडीत गद्दारांच्या बंडातूनही शिवसेना निष्ठावान शिवसैनिकांच्या जीवावर पक्षप्रमुख उद्धवसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.आगामी काळात शिवसेना एकमेव पक्ष आहे जो महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देऊ शकतो
दसरा मेळाव्याच्या अनुषंगाने कोरेगाव आणि माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही मतदारसंघात झालेल्या बैठकीत दसरा मेळावा जोशात साजरा करणार असल्याचे सांगण्यात आले.बैठकीत उपस्थित पदाधिकारी आणि शिवसैनिकांना जिल्हाप्रमुख मा.प्रताप जाधव यांनी पक्ष संघटना वाढी संदर्भात मार्गदर्शन केले.
यावेळी कोरेगाव विधानसभा क्षेत्रप्रमुख मा.भानुदास कोरडे,उपजिल्हाप्रमुख मा.दत्ताभाऊ नलावडे,कोरेगाव तालुकाप्रमुख मा.सचिन झांजुर्णे,खटाव तालुकाप्रमुख मा.दिनेश देवकर,सातारा तालुकाप्रमुख मा.रमेश बोराटे, कोरेगाव शहरप्रमुख मा.अक्षय बर्गे,महिला आघाडीप्रमुख उज्वला भोसले, खटाव विभागप्रमुख मुगटराव कदम, पदाधिकारी ,   शिवसैनिक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.