सातारा जिल्ह्याला नवीन पोलीस अधीक्षक समीर शेख यांची नियुक्ती.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांची गडचिरोली अप्पर पोलीस अधीक्षक पदावरून थेट सातारा येथील जिल्हा पोलीस अधीक्षक पदासाठी नियुक्ती झाली असून यापूर्वी सहाय्य पोलिस अधीक्षक म्हणून शेख यांनी धडक कामगिरी बजावली होती पुन्हा सातारा होम ग्राउंड वर शेख यांची बदली झाली असून त्यांच्या बदलीचे साताऱ्यात स्वागत होत आहे तत्कालीन एसपी अजय कुमार बंसल अजूनही बदलीच्या प्रतीक्षेत आहेत गृहमंत्रालयाचे सहसचिव वेंकटेश भट यांच्या आदेशानुसार राज्यातील 24 आयपीएस पोलिसांच्या अधीक्षकांची बदल्याचे आदेश निघाले होते यामध्ये अजय कुमार बंसल यांची बदली प्रस्ताविक ठेवण्यात आली असून गडचिरोलीचे अप्पर पोलीस अधीक्षक यांना साताऱ्याच्या पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी देण्यात आली आहे रात्री उशिरा पोलीस मुख्यालयामध्ये या बदलीचे आदेश प्राप्त झाले अजय कुमार बंसल यांनी 7 ऑक्टोंबर 2020 रोजी साताऱ्याचे एसपी म्हणून गडचिरोली येथूनच पदभार स्वीकारला होता त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी तब्बल 149 जणांच्या टोळीला जिल्ह्यातून तडीपार केली होती तसेच संघटित गुन्हेगारी त्यांनी मोडीत काढत 85 जणांना तुरुंगवास पाठवले कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी तब्बल 328 जणांवर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली त्यांच्या कार्यकाळामध्ये तब्बल 105 वाहनांसाठी पोलिसांना निधी मिळाला आणि ती वाहने तपास कामासाठी पोलिसांना उपलब्ध झाली तर बंदोबस्ताच्या नियोजन सोहळा असो अथवा जिल्ह्यातली कायदा व सुव्यवस्थेची नियोजन असो समीर शेख हे कायमच अग्रभागी राहिले सुरुची प्रकरणाचा धडक तपास समीर शेख यांनी केला शंभरहून अधिक जणांवर गुन्हे दाखल झाला होता गडचिरोली वरून अजय कुमार बंसल यांची साताऱ्यात बदली झाली होती त्याच पद्धतीने गडचिरोली वरून पुन्हा समीर शेख हे साताऱ्यात एस पी म्हणून आता लवकरच कार्यभार करणार आहेत ते कामावर हजर कधी होणार याची जिल्हा पोलिसांना प्रचंड उत्सुकता लागली आहे.
Comments
Post a Comment