जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे.

रमेश उबाळे यांना नियुक्तीपत्र प्रदान करताना आ.बाळासाहेब पाटील.रामराजे नाईक निंबाळकर. खा.श्रीनिवास पाटील.आ.शशिकांत शिंदे. 

जिल्हा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे.

कोरेगाव/प्रतिनिधी. अज्जू मुल्ला. 

माजी जलसंपदामंत्री आ.शशिकांत शिंदे यांचे विश्वासु सहकारी रमेश उबाळे यांची  जि राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग सातारा जिल्ह्याच्या अध्यक्षपदी रमेश उबाळे यांची एकमताने निवड झाली. कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा  मेळाव्यात त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
       रमेश उबाळे हे ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील मूळ रहिवासी असून त्यांचा सातारा येथे बालाजी कन्स्ट्रक्शन हा बांधकाम व्यवसाय आहे. व्यवसायाबरोबरच त्यांना सामाजिक व राजकिय क्षेत्रात काम करण्याची विशेष आवड आहे . तीन वर्षांपूर्वी  त्यांनी आ. शशिकांत शिंदे यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय  घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश  करून आपले काम सुरू केले. प्रारंभी त्यांना आ.शशिकांत शिंदे यांनी सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेशवर काम करण्याची संधी दिल्यानंतर 
त्यांनी समाजाचे विविध प्रश्न, समस्या शासनदरबारी मांडुन त्यानी अनेक समस्यांचाआतापर्यंत निपटारा करून घेतला आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये झालेल्या निकृष्ट रस्त्याविरोधात जिल्ह्याधिकारी कार्यालयासमोर  उपोषण करून जनआंदोलन उभारल्यानंतर बांधकाम विभागाला अनेक रस्त्यांची पुनर्रबांधणी करणे भाग पडले. कोरोनाच्या काळात अनेक कुटूंबाना शासनाकडून रेशन मिळवून दिले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी कोरेगाव-सातारा रस्त्यावर रास्तारोको आंदोलन केले. गोरगरीब कुटूंबाचतील अनेक विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांना शिक्षणासाठी मदत केली.  अनेक मागासवर्गीय कुटूंबातील कुटूंबियांना रमाई घरकुल योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. वंचीत, दलित, शोषित लोकांचे प्रश्न हाती घेऊन बेधडकपणे मांडण्याचा प्रश्न न सुटल्यास प्रसंगी आंदोलन करून आक्रमकपणे मांडण्याचा त्यांचा स्वभाव असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने  त्यांच्यावर सामाजीक न्याय विभाग जिल्ह्याध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्याचा निर्णय घेऊन या पदांवर त्यांची नियुक्ती केली आहे.
  सोमवार दि.३ रोजी, कोरेगाव  विधानसभा मतदारसंघांमध्ये ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी व कार्यकर्ते मेळावा आयोजित केला होता .याप्रसंगी  श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर  , खा. श्रीनिवास पाटील साहेब , माजी पालकमंत्री आ. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते,  जिल्हाध्यक्षपदाचे   नियुक्तीपत्र देण्यात आले. याप्रसंगी आ. शशिकांत शिंदे, आ.  दीपक चव्हाण, जिल्हाध्यक्ष माननीय सुनील माने ,आयटी सेल महाराष्ट्र प्रदेश  सारंग पाटील, जिल्ह्या युवक जिल्हाध्यक्ष  तेजस शिंदे, कोरगाव विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. पक्ष बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी ,तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यपर्यंत पोहोचवण्यासाठी व सर्वसामान्य तळागाळातील जनतेच्या अडचणी, प्रश्न ,समजून घेऊन, प्रश्न मार्गी लावण्याकरता, माझी जिल्हाध्यक्ष या पदी निवड झाली. मला  दिलेल्या संधीबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा, पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मनस्वी आभारी आहे. मी नक्कीच या संधीचं सोनं करून, सर्वसामान्य जनतेसाठी मी काम करून राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार तळागाळात पोहचवण्यासाठी प्रयत्न करू. अशी  ग्वाही रमेश उबाळे यांनी याप्रसंगी दिली. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.