पत्रकार अनिल गायकवाड यांचे निधन.

          पत्रकार अनिल गायकवाड यांचे निधन.

पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 

पुसेगाव ता खटाव येथील जेष्ठ पत्रकार व सेवानिवृत्त शिक्षक अनिल गायकवाड यांचे वयाच्या ५९ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी,अविवाहित मुलगा व मुलगी,भाऊ  असा परिवार आहे.गेले ३२ वर्षे त्यांनी दै ऐक्य, केसरी,तरुण भारत,,लोकमत,मुक्तगिरी ,पुण्यनगरी,ग्रामोद्धार
अशा विविध दैनिकात पत्रकार म्हणून लेखन केले. त्यांनी पुसेगाव येथे जिज्ञासा क्लासेस च्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात प्रवेश केला व येथील  श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या पुसेगाव, जांब,जाखणगाव रणसिंगवाडी येथील शाखेत गणिताचे शिक्षक म्हणून सेवा केली.नुकतेच ते सेवानिवृत्त झाले होते.ते उत्कृष्ट क्रिकेट बॉलर म्हणूनही ओळखले जात होते.
काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृती मध्ये बिघाड झाल्याने त्यांना पुणे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र रविवारी रात्री ८ च्या सुमारास त्यांचे निधन झाले.अत्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी खटाव तालुक्यातील विविध दैनिकाचे पत्रकार,सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील मंडळी,, नातेवाईक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.