चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहेे डॉ. सुरेशराव जाधव.

चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी संस्था सदैव प्रयत्नशील आहेे डॉ.  सुरेशराव जाधव.                           

पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बाहय परीक्षांना यशस्वीपणे सामोरे जाण्याकरता श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने फाउंडेशन कोर्सेस लवकरच सुरु होणार आहेत . सदर कोर्सेस मधून उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाईल . ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा बुद्धांक चांगला असून त्यास योग्य दिशा व मार्गदर्शन दिल्यास अनेक चांगले अधिकारी  घडतील .याकरता संस्था प्रयत्नशील आहे तसेच विद्यार्थ्यांनी प्रयत्न सोडू नयेत तसेच ध्येय पूर्ण होईपर्यत हार मानू नये " असे विचार राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व संस्था सचिव डॉ श्री सुरेशराव जाधव यांनी श्री हनुमानगिरी    हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज पुसेगाव येथील पालक शिक्षक सभेत व्यक्त केले.प्रमुख पाहुणे प्रा . गणेश कुमठेकर पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना  म्हणाले " विद्यार्थ्यांनी परीक्षांचा आनंद घ्यावा . क्रमीक पुस्तकांचा अभ्यास करावा . परदेशी भाषांचा अभ्यास करावा . पालकांनी आपल्या पाल्यास ध्येय पूर्तीकरता प्रेरणा द्यावी . वेळेचा सदुपयोग करावा . प्रयत्नात सातत्य ठेवावे . विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी शालेय जीवनापासूनच करावी .    प्रा . जे . बी . जाधव यांनी प्रास्तावीक व स्वागतकेले . प्राचार्य श्री सुधाकर माने यांनी संस्थेच्या वतीने शाळेत सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली . कार्यक्रमास संस्था सचिव  श्री मोहनराव जाधव ,  श्री . नवनाथ फडतरे ,  श्री . महेशराव नलवडे , पालक शिक्षक  शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वाती बर्गे यांनी सुत्रसंचालन मानले . पर्यवेक्षक श्री मोहनराव गुरव यांनी आभार मानले .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.