येस ग्रुप करार शेतीच्या माध्यमातून सोयाबीनला देणार 8100 रुपये दर :- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

येस ग्रुप करार शेतीच्या माध्यमातून सोयाबीनला देणार  8100 रुपये दर :- येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

शेतीमालाला  काय दर मिळेल याची होमी नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येऊन कर्जबाजारी होत आहे म्हणूनच येस ग्रुपच्या करार शेतीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी रास्ता नव्हे जास्त दर मिळवून घ्यावा असे  अवाहन  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत यांनी बोंबाळे ता. खटाव  येथे केले.बोंबाळे ता खटाव  येथे करार शेती बाबत  आयोजित केलेल्या शेतकरी कार्यशाळे मध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून  येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती नाना पुजारी हे होते यावेळी राजेंद्र निंबाळकर, धनाजी निंबाळकर, अमृत निंबाळकर, मारुती फडतरे ,अविनाश निंबाळकर, गजानन घोरपडे ,अतुल देशमुख, तानाजी कुदळे प्रमुख उपस्थिती होती
      शेतकरी उत्पादन वाढवण्यात सक्षम झाला मात्र त्याच्या शेतीमालाला योग्य व अपेक्षित दर  मिळत नाही यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत आहे याचा विचार करून करार शेतीच्या माध्यमातून येस ग्रुप व मदरअर्थ हेल्थ फाउंडेशन यांनी  रब्बी हंगाम 2022 -23 साठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पॅटर्न जाहीर केला असून लेट रब्बी सोयाबीनला प्रतिक्विंटल 8100 रुपये दर ,गहू  पिकाला प्रति क्विंटल 3300  रुपये दर ,घेवडा पिकाला 7350  रुपये दर देण्यासाठी रब्बी हंगाम कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग पॅटर्न आणला आहे असे संजय भगत म्हणाले. कार्यक्रमास तानाजी निंबाळकर, प्रकाश निंबाळकर ,महेश निंबाळकर, कुलदीप निंबाळकर, नितीन इंगवले ,शौकत मुलानी, अनिकेत निंबाळकर ,श्रीपती सुतार, विजयकुमार निंबाळकर, शिवाजी निंबाळकर ,चंद्रहार निंबाळकर ,मारुती निंबाळकर ,नितीन नलावडे ,गौरव नलावडे ,ज्ञानेश्वर देवकर ,रोहन निंबाळकर , सिद्धार्थ देशमुख, विराज नलावडे ,सुनील खाडे  किसन थोरात  बागायतदार शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र निंबाळकर यांनी केले.
      🤏चौकट 
25 एकर कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग असलेले केवळ 51 स्पर्धक गाव, वाडी ,वस्ती, गट ,समूह शेतकरी उत्पादक कंपनी यांचा मोफत मध्ये रब्बी हंगाम हेल्थ कप स्पर्धा 2022- 23 मध्ये समावेश होणार असून त्याचे बक्षीस प्रथम क्रमांक 2 लाख 51 हजार रुपये व हेल्थ कप ,द्वितीय क्रमांक 1 लाख 51 हजार रुपये व प्रमाणपत्र तृतीय क्रमांक 51 हजार रुपये व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ 25 हजार रुपये व प्रमाणपत्र या प्रोत्साहन देणाऱ्या स्पर्धेत सहभागी व्हावे असेही संजय भगत म्हणाले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.