किल्ले वर्धनगड गावात आठवडा बाजार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते सुरू.

किल्ले वर्धनगड गावात आठवडा बाजार माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्या हस्ते सुरू.

 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

आज शनिवार वर्धनगड येथील आठवडा बाजारात प्रारंभ झाला असून विधान परिषदेचे माजी आमदार प्रभाकर घार्गे वर्धनगड चे सरपंच अर्जुन मोहिते यांच्या हस्ते विविध मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये श्रीफळ फोडून या बाजाराचे उद्घाटन करण्यात आले.  स्वातंत्र्याच्या काळापासून 75 वर्षानंतर वर्धनगड या ठिकाणी आज शनिवार आठवडा बाजार भरत असून या बाजारामध्ये व्यापारी व व्यावसायिकानी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती तर भाजीपाला खरेदी करण्यासाठी वर्धनगड परिसरातील पवारवाडी पाचंगणी अळी, जाधव वस्ती शिंपी मळा चव्हाणवाडी, रामोशी वाडी,भाटमवाडी, तसेच भंडारमाची परिसरातील काही भागातील बाजार करून नागरिक मोठ्या संख्येने भाजीपाला खरेदी करण्यासाठी उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रमानंतर मानुबाई माता मंदिरामध्ये घेतलेल्या कार्यक्रमात  बोलताना प्रभाकर घार्गे म्हणाले" या गावोगावच्या बाजाराबरोबरच खटाव तालुक्यासाठी एमआयडीसीचा प्रकल्प तसेच वर्धनगड या ठिकाणी  तरुणांना रोजगार उपलब्धतेचे साठी या गोष्टीची गरज फार असल्याचे सांगितले त्याचप्रमाणे नेर तलावामध्ये जिहे कटापूर योजनेचे पडणारे पाणी हे नियमित व्हावे यासाठी आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले, तसेच यावेळी सरपंच अर्जुन मोहिते यांनीही आपले विचार व्यक्त केले रमेश जाधव म्हणाले "आज बाजाराला या ठिकाणी सुरुवात झाली असून, जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा मिळण्यासाठीही ग्रामपंचायतीचे ठराव जिल्हा बँकेकडे दिले असून या ठिकाणी या बँकेची लवकरच शाखा मिळावी अशी मागणी पवारवाडी चे माजी सरपंच रमेश जाधव यांनी केले यावेळी पत्रकार नितीन घोरपडे सर यांनी आपले विचार व्यक्त केले. या ठिकाणी हा बाजार व बाजाराच्या जागेचा उपलब्धतेसाठी  गावातील अनेक तरुणांनी पूर्णपणे सहकार्य केले या बाजार उद्घाटन प्रसंगी सोसायटीचे चेअरमन निलेश जाधव, सोसायटीचे सर्व संचालक  उपसरपंच शंकर घोरपडे आरपीआय खटाव तालुका अध्यक्ष प्रशांत शिवशरण, ग्रामपंचायत चे सर्व सदस्य वर्धनगड पंचक्रोशीतील सर्व मान्यवर  ग्रामस्थ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.