मैत्रीचे स्नेहसंमेलन म्हणजे मैत्रीचा आनंदोत्सव. मा. विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब .
मा. विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी साहेब .
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
आपल्या आयुष्यात अनेक माणसे भेटतात पण शाळे मध्ये जे आपले मित्र असतात त्यांची जागा कुणीही घेऊ शकत नाही. या मैत्रीचे संमेलन म्हणजे एक आनंदोत्सव. असे दळवी साहेब म्हणाले ते निढळ तालुका खटाव येथील माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन वेळेत बोलत होते.
मी निढळ च्या शाळेत शिकलो आणि विभागीय आयुक्त पदा पर्यंत पोचलो .त्यामुळे ग्रामीण भागातील शाळे मध्ये शिक्षण घेणारा तीव्र इच्छा असेल तर मोठ्या पदावर पोहचू शकतो. असे निढळ येथे सन 1995/96 च्या दहावी च्या बॅच च्या स्नेह संमेलन कार्यक्रमात माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी सांगितले .पुढे ते म्हणाले मी वयाच्या 24 वर्षा पासून निढळ च्या विकासासाठी काम करत आहे .सध्या सत्व फाउंडेशन च्या माध्यमातून इतर गाव सुध्दा विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे.आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेचे आपल्या वर ऋण असते त्यामुळे माजी विद्यार्थी यांनी आपल्या शाळे च्या विकासासाठी योगदान द्यावे असे आवाहन त्यानीं केले.लवकरच मी माझ्या वर्गातील मित्रांचे स्नेह संमेलन घेणार आहे.
सन 1995/96 च्या माजी विद्यार्थी (बेस्टीज ग्रुप) चे स्नेह संमेलन हनुमान विद्यालय निढळ येथे पार पडले.शाळेच्या सुंदरते साठी व विकासासाठी जेवढी शक्य आहे तेवढी मदत करण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक जगदीश निर्मळ यांनी विद्यार्थी वर्गाचे कोतुक केले . ग्रुप चे सदस्य व लय भारी मीडिया चे संपादक तुषार खरात यांनी शुभेच्छा दिल्या .कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रसिद्ध विमा सल्लागार विलास कुलकर्णी यांनी केले .प्रास्तविक ज्ञानेश्वर चिंचकर यांनी केले .आभार धनाजी खुस्पे यांनी मानले या वेळी संतोष गोरे,डॉ प्रशांत शिंदे,डॉ आशा वसव, मुबई स्थित उद्योजक अविनाश काळणगे .उधोजक काका पवार , उद्योजकशशिकांत पवार, उधोजक चंद्रकांत जाधव, ग्रामपंचायत लिपिक संतोष शिंदे ,रणजित दळवी, संदीप निर्मळ,व्यंकटेश इंजे , विकास इंजे ,राघू जाधव, आनंद खुस्पे,चांगुणा मोरे, सुलभा कुलकर्णी, मनीषा खुस्पे, गौकुळा जाधव, चांगुणा खुस्पे, नीलम खुस्पे, साधना जाधव ,नानीबाई मोरे,मंगल भारती उपस्थित होते.रजणी शेवाळे, पुनम देसाई, आश्लेषा पवार,जयश्री इंजे यांनी स्नेहसंमेलनास ऑनलाईन हजेरी लावली.
Comments
Post a Comment