रेवलकरवाडी येथे आमदार महेश शिंदे गटाच्या ताकतीत वाढ युवानेते रामदास जगदाळे यांचा जाहीर प्रवेश.

रेवलकरवाडी येथे आमदार महेश शिंदे गटाच्या  ताकतीत वाढ युवानेते रामदास जगदाळे यांचा जाहीर प्रवेश.

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

 रेवलकरवाडी .ता .खटाव येथील ,युवा नेते व शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख रामदास जगदाळे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेश शिंदे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश केला.यावेळी विसापूर गावचे युवा नेते हरिश्चंद्र सावंत, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर काटकर ,पुसेगावचे युवा नेते सुसेन जाधव, रेवलकरवाडी ग्रामपंचायतचे सदस्य अधिक कदम ,प्रकाश कदम ,हणमंत कदम, मोहन कदम आदी ग्रामस्थ पदाधिकारी विविध मंडळाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. या प्रवेशामुळे रेवलकरवाडी गावामध्ये ,आमदार महेश शिंदे यांची ताकत वाढली असून येत्या काळात पंचायत समिती, जिल्हा परिषद यांच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्वात जास्त मताधिक्य मिळवून देऊ व आमदारांचा विश्वास सार्थ करूनच दाखवू असे युवा नेते रामदास जगदाळे यांनी सातारा न्यूज ची बोलताना सांगितले.
विसापूर परिसरामध्ये आमदार महेश शिंदे यांची लोकप्रियता वाढत असून गावागावातील वाडी वस्तीवरील युवक बाळासाहेबांची शिवसेना या पक्षात जाहीर प्रवेश करून आमदार महेश शिंदे यांचे हात बळकट करत आहेत. युवा नेते हरिश्चंद्र सावंत

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.