खातगुण येथील लोकवस्ती मधील मोबाईल टॉवर बंद करा:- वंचित बहुजन आघाडीचं तहसीलदार साहेब यांना निवेदन.

खातगुण येथील लोकवस्ती मधील मोबाईल टॉवर बंद करा:- वंचित बहुजन आघाडीचं तहसीलदार साहेब यांना  निवेदन.

पुसेगांव प्रतिनिधी पंकज कदम.

खटाव तालुक्यातील खातगुण येथील गट नं ५९ मध्ये भरवस्ती मध्ये मोबाईल टॉवर उभारण्यात आला आहे.संबंधित लोकवस्ती पासून सुमारे ३०फुटांवर हा टॉवर आहे.येथील रहिवासी प्रवीण यादव व ग्रामस्थांनी सण २०१९-२० पासून हा टॉवर लोकवस्ती पासून दूर लावावा,असं निवेदन ही तत्कालीन जिल्हाधिकारी यांना दिलं होतं. मात्र त्या निवेदनाची दखल न घेता,उलट तो टॉवर नियमानुसार असल्याचं महसूल विभागाने सांगितले आहे. भरवस्ती मध्ये असणाऱ्या या टॉवर मुळे सभोवताली असलेल्या मनुष्य, पाळीव पशु पक्षी यांना रेडिएशनचा धोका निर्माण होणार आहे. तरी हा टॉवर इतर ठिकाणी हलवावा,अन्यथा वंचित बहुजन आघाडी च्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा तालुका अध्यक्ष साजिद मुल्ला,दादासाहेब कांबळे आदी पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार किरण जमदाडे यांना निवेदनाद्वारे दिला आहे. यावेळी वंचित बहुजन चे जिल्हा अध्यक्ष भीमराव घोरपडे,अरविंद आढाव,आनंदराव निकाळजे,विश्वास जगताप, सचिन यादव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.