भूमाता युथ फाऊंडेशन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी (वर्धनगड) पवारवाडी ग्रामपंचाय तसरपंच श्री महेश पवार यांची निवड.
भूमाता युथ फाऊंडेशन सातारा जिल्हा उपाध्यक्षपदी (वर्धनगड) पवारवाडी ग्रामपंचाय तसरपंच श्री महेश पवार यांची निवड.
पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम
आज जलमंदिर पॅलेस सातारा येथे भूमाता युथ फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याच्या सातारा जिल्हा पद नियुक्तीचा कार्यक्रम भूमाताचे आधारस्तंभ छत्रपती उदयनराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आला. या ठिकाणी भूमाता फाउंडेशनचे मार्गदर्शक कृषीभूषण, कृषिरत्न पुरस्कारित डॉ. बुधाजीराव मुळीक सर उपस्थित होते तसेच शेकडो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीचे अध्यक्ष अभिजीत फाळके, उपाध्यक्ष रामदास बेडकुते, कार्याध्यक्ष कालिदास माने, सचिव निनाद पाटील, खजिनदार निलेश पवार, चिटणीस ॲड. गौरव भोसले उपस्थित होते. यावेळी सातारा जिल्हा व साताऱ्यातील तालुक्यांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष आदी पदांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्हा उपाध्यक्ष पदी पवारवाडीचे सरपंच श्री महेश पवार यांची नेमणूक झाली. तसेच खटाव तालुका उपाध्यक्ष पदी वर्धनी स्टोन क्रशरचे मालक श्री अनिकेत फाळके यांची नियुक्ती झाली.मानतालुका अध्यक्ष पदी श्री वैभव शेलार, कार्याध्यक्ष पदी शिव नेटवर्कचे मालक श्री मकरंद जाधव व सरचिटणीस पदी सुपर इलेक्ट्रिकलचे मालक श्री तुषार पवार यांची नियुक्ती झाली आहे. त्यानंतर भूमाता युथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना डॉक्टर बुधाजीराव मुळीक सर यांनी संघटना वाढीसाठी व संघटनेची तत्वे याबाबतीत मार्गदर्शन केले. आगामी काळात भूमाता युथ फाउंडेशन शेतीविषयक,जलसिंचन, पर्यावरण, गडसंवर्धन, महिला सबलीकरण, शैक्षणिक, वैद्यकीय, कला व क्रीडा इत्यादी क्षेत्रांमध्ये जोमाने काम करेल अशी ग्वाही भूमाता युथ फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच कार्यक्रमाचे आयोजन भूमाता युथ फाऊंडेशनचे सचिव निनाद पाटील, खजिनदार निलेश पवार, कार्याध्यक्ष कालिदास माने यांनी केले.
Comments
Post a Comment