‘स्वराज्य’ शिक्षक संघाचा सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा.

पुसेगाव सभासद परिवर्तन पॅनलला जाहीर पाठिंबा देताना चंद्रकांत जाधव व सभासद.
‘स्वराज्य’ शिक्षक संघाचा सभासद परिवर्तन पॅनेलला जाहीर पाठिंबा.

सातारा 24 तास न्यूज. 
अकबर भालदार. 

पुसेगाव, ता. ११ : सभासदांना कायमच गृहीत धरणं आणि प्रत्येक वेळी सभासदांच्या मागण्यांना केराची टोपली दाखवणं, असा निष्क्रीय कारभार करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या या निवडणुकीत ‘सभासद परिवर्तन पॅनेल’ स्थापन होऊन सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न झाला आहे. आत्तपर्यंत सभासदांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी ‘परिवर्तन’ पॅनेलच्या या प्रयत्नांना स्वराज्य शिक्षक संघाचा (आश्रमशाळा विभाग) जाहीर पाठिंबा असल्याची महिती जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांनी दिली.पुसेगाव येथे आयोजित शिक्षक समिती आणि स्वराज्य संघाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी समितीचे राज्याचे अध्यक्ष उदय शिंदे, जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, स्वराज्य शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार व पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान, शिवरायांची प्रेरणा घेत सभासद परिवर्तन पॅनेल बँकेचा कारभार सर्वसमावेशक करेल. यात खुलेपणाने सर्व सभासदांचे स्वागत असेल. लोकशाही मार्गाने मार्गक्रमण करत शिक्षक बँकेत या नव्या संचालक मंडळाचे ‘स्वराज्य’ स्थापन होईल, अशी भावना उदय शिंदे यांनी बोलून दाखविली.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.