सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा:-युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी.

सोयाबीन पेटवणाऱ्या आज्ञात व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा:-युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांची मागणी.

सातारा 24 तास न्यूज. 
नितीन घोरपडे. 
विसापूर तालुका खटाव येथील शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांनी विसापूर व खातगुण हद्दीवर महारकी शिवारातील किमान दोन एकरातील काढलेले सोयाबीन गंज लावून मळणीसाठी ठेवले होते ते सोयाबीन अज्ञात व्यक्तीने पेटवून दिले त्याचा शोध पोलिसांनी घेऊन अशा प्रवृत्तीला आळा घालावा असे विसापूर येथील युवा नेते हरिश्चंद्र सावंत यांनी मागणी केली आहे.
 यावेळी हरिश्चंद्र सावंत (चाचा), व श्रीरंग (आबा)साळुंखे यांनी  महारकी शिवारात जाऊन शेतीमधील जळीत पिकाची पाहणी केली व आमदार महेश शिंदे यांना फोन करून ही घटना सांगितली यानंतर आमदार महेश शिंदे यांनी फोनवरून शेतकरी व पत्रकार पंकज कदम यांचे सात्वन केले व आम्ही या दुःखात सामील असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सूचना  केल्या आहेत असे सांगितले यावेळी हरिश्चंद्र सावंत यांनी मी व माझ्या पक्षाच्या वतीने या घटनेचा निषेध करतो असे सांगितले व या घटनेचा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करून पंचनामा त्वरित करावा असे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगितले आहे. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.