निढळ येथील शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू करण्याची मागणी.

निढळ येथील शेतीपंपाचा वीजपुरवठा नियमित सुरू करण्याची मागणी. 

पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.

निढळ. ता .खटाव येथील ग्रामस्थांचे  महावितरण अधिकारी यांना निवेदन
 निढळ व निढळ परिसरात शेती मध्ये पिकांना पाणी देण्याचे काम बळीराजा करत आहे .काही शेतकऱ्यांनी पिकांना पाणी देण्यासाठी कामगार लावले आहेत .विहरित पाणी असूनही केवळ वीज पुरवठा नियमित नसलेमुळे   विविध पिके पाण्या वाचून करपू लागली आहेत तर कामगारांना काम न करता सुद्धा शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत आहे. शेतात पाणी सोडले की शेतीपंपाची  वीज जात आहे .एकतर बळीराजा पुढे अनेक प्रश्न आहेत .पण पाणी असूनही केवळ वीज पुरवठा नसलेमुळे शेतकरी त्रस्त झाला आहे .त्यामुळे शुक्रवारी निढळ ग्रामपंचायत समोर शेतकरी ग्रामस्थ जमा होऊन . पुसेगाव येथील महावितरणाच्या ऑफिसमध्ये आपल्या मागण्याचे   निवेदन दिले .तसेच थंडी चे दिवस असलेमुळे दिवसा वीजपुरवठा करण्याची मागणी केली . पीक पाण्याला आले आहे त्याला पाण्याची गरज आहे अशा वेळी केवळ वीज बिल भरले नाही म्हणून सध्या तरी कोणत्याही शेतकऱ्यांची वीजपुरवठा तोडू नये अशी विनंती केली आहे . या  निवेदनाचा विचार केला नाही तर  पुढे मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी व ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.