हजारो ग्रामस्थांच्या उपस्थितीत पुसेगाव येथे रास्ता रोकोला उत्स्फूर्त प्रतिसाद.
पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम.
पुसेगाव तालुका खटाव येथे छत्रपती शिवाजी चौकामध्ये विविध पक्ष -संघटना, विविध गणेश मंडळ ,दुर्गा उत्सव मंडळाचे अध्यक्ष सभासद यांचेवतीने एकत्रित रस्ता रोको जनआंदोलन करण्यात आले सातारा -टेबुर्णी-लातुर (NH-548-E ) या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेली 2/3वर्षे अर्धवट अवस्थेत बंद पडले आहे यामुळे प्रत्येक गावच्या गावठाण हद्दीत नागरिकांना कच्च्या रोडच्या धुळीचा त्रास होवुन रस्त्याकडील दुकानदारांच्या दुकानांमध्ये धूळ वस्तूंवर बसल्यामुळे त्या वस्तू खराब होत असून या धुळीमुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे तसेच वारंवार वाहतुक कोंडी होवुन ग्रामस्थाना नाहक त्रास होत आहे तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा RCC गटरचा प्रश्न प्रलंबित असुन पाऊसाचे पाणी रोडलगत नागरिकांच्या घरात कॉम्प्लेक्स- (मार्केट)मध्ये घुसुन व्यापारी व ग्रामस्थ यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे तसेच दुतर्फा गटर अस्तित्वात नसलेने नागरीवस्तीतील सांडपाणी रोडनेच वाहत असलेने मोठ्या प्रमाणात पुसेगांव येथे दुर्गंधी पसरली आहे तसेच सांडपाण्यात वेगवेगळे डास निर्माण होवुन चिकनगुनिया,डेंगु मलेरिया,वगैरे साथीच्या रोगांचा प्रसार होत आहे तसेच विद्युत पुरवठा करणारे लाईटचे डांब स्थलांतरीत करणेचे काम ठप्प आहे तसेच ग्रामपंचायत पाणी पुरवठा पाईपलाईन्स स्थलांतरित करण्याचे काम बाकी आहे अशा विविध प्रश्नासाठी ग्रामस्थांच्या लोकभावना तीव्र असलेने ग्रामस्थ रोडचे ठप्प काम चालू होणेसाठी 11ते 1 दोन तास सातारा पंढरपुर रोडवरती सर्व पुसेगाव येथील ग्रामस्थ बसुन होते छत्रपति श्री शिवाजी महाराज चौकातील सर्व रोडवरती वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या तर ग्रामस्थाच्या वतीने महसुल प्रशासन-रस्त्ये विकास महामंडळ पुणे -मेगा हायवे प्रा लि कंपनी ,भारत सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभागा विरुद्ध निषेधाच्या मोठ मोठ्याने घोषणा देण्यात आल्या पुसेगांव येथील तीर्थक्षेत्र श्री सेवागिरी महाराज यांचा रथोत्सव यात्रा एक महिन्यावर येवुन थांबली असून पुसेगांव गावठाण हद्दीतील रस्त्याचे काम ठप्प आहे त्यामुळे ग्रामस्थानच्या लोकभावना तीव्र आहेत या प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नाबाबत दरम्यान
खटाव तालुक्याचे धडाकेबाज मा. तहसीलदार किरण जमदाडे साहेब यांनी आंदोलन स्थळी भेट देवुन नागरिकांच्या भावना संमजुन घेतल्या आणि संबधित काॕन्ट्रक्टरला तत्काल रोडचे काम चालु करण्याची सुचना केली आणि काम चालु होई पर्यत माझे पूर्ण लक्ष राहील अशी भुमिका स्वतः स्पष्ट केली या रस्त्ता रोकोसाठी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शितोळे साहेब यांनी पोलिसांचा चोक बंदोबस्त ठेवला होता तसेच बाहेरील पोलिसांची पिंजरागाडी अतिरिक्त कर्मचारीसह रस्ता रोको आंदोलन स्थळी उपस्थित होती संबधित काॕन्ट्रक्टरने आजच रस्त्याचे बंद पडलेले काम चालु करत असलेचे घोषित केले नंतर रस्त्ता रोको आंदोलन माघे घेण्यात आला.
Comments
Post a Comment