वर्णे गावातील येस ग्रुपचा करारशेती प्रयोग शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग ठरेल - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.

वर्णे गावातील येस ग्रुपचा करारशेती प्रयोग शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग ठरेल - येस ग्रुप संस्थापक संजय भगत.
 पुसेगाव प्रतिनिधी पंकज कदम. 

 शेतकऱ्यांना रास्तभावा पेक्षा जास्तभाव देण्याची करार शेती योजना येस ग्रुप ने तयार केली असून याच्यातून शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मिळाला आहे असे प्रतिपादन संजय भगत यांनी वर्णे ता. सातारा येथे शेतकरी बैठकीत केले. वर्णे ता. सातारा येथे फुले राजमा, फुले वरून, सोयाबीन च्या करार शेतीच्या बियाणे  व औषधे वाटप प्रसंगी येस ग्रुपचे संस्थापक संजय भगत बोलत होते यावेळी 'आमची माती आमची माणसं ' फेम मानसिंग पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.शेतकऱ्यांना उत्पादन वाढीचे तंत्र अवगत झाले असून निघणाऱ्या शेतीमालाला योग्य दर मिळत नसल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागते किंबहुना कमी दराने माल खरेदी करून दलालांच्याकडून शेतकऱ्याची लूट होते याच्यातून मार्ग काढण्यासाठी येस ग्रुपने जो करार शेतीचा पॅटर्न तयार केला आहे यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उन्नतीचा मार्ग मोकळा झाला आहे असेही संजय भगत म्हणाले ते पुढे म्हणाले शेतीमाल खरेदी विक्री च्या आर्थिक कोंडीमुळे शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यात वाढ होत आहे येस ग्रुपच्या करार शेतीमुळे शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी होऊन शेतकऱ्यांच्या आत्महत्यात घट होईल असे प्रतिपादन संजय भगत यांनी केले.वर्णे गाव हे कायम प्रयोगाशील म्हणून ओळखले जाते शेतीच्या बाबतीत वर्णे गावात वेगवेगळे प्रयोग केले जातात मात्र रास्त दरापेक्षा जास्त दर देण्याची येस ग्रुप ची संकल्पना ही शेतकऱ्यांना आर्थिक मजबुती व बळ देणारी ठरेल असे प्रतिपादन मानसिंग पवार यांनी केले.यावेळी या बैठकीत शेती व्यवस्थापनाबाबत कार्यशाळा संपन्न झाली व यामध्ये वरून ,राजमा घेवडा या पिकांच्या लागवडी बाबत शेतकऱ्यांना संजय भगत यांनी प्रशिक्षण दिले 
यावेळी करार शेतीच्या माध्यमातून लागवड करणारे शेतकरी भगवान पवार, राजेंद्र पवार, अजित पवार, राजकुमार काळंगे ,महादेव काळंगे ,अशोक पवार ,एकनाथ मालुसरे आदी बागायतदार शेतकरी उपस्थित होते.सूत्रसंचालन कंपनी व्यवस्थापक रणजीत भोसले यांनी केले व आभार मानण्याचे काम अजित पवार यांनी केले. 

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.