खेळाच्या माध्यमातूनही करियर घडवता येते-रमेश उबाळे.
कोरेगाव/प्रतिनिधी. अज्जू मुल्ला.
शिक्षणाबरोबर खेळाच्या माध्यमातून आपले करियर घडवून देशाचे नाव मोठे करा असा संदेश जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी विद्यार्थ्यांना दिला बालाजी कन्स्ट्रक्शनच्या वतीने सातारा येथील मेरी इंग्लिश स्कुल मधील विद्यार्थ्यांना बालदिनानिमित्त शालेय साहित्य वाटप करण्यात आले त्यावेळी रमेश उबाळे बोलत होते.रमेश उबाळे पुढे म्हणाले, केवळ शिक्षण घेऊन करियर घडत नाही शिक्षणाच्या जोडीला विद्यार्थ्यांनी खेळाला महत्व देऊन आपले करियर घडविले पाहिजे खेळाच्या माध्यमातून आपण आपल्याबरोबर देशाचाही नावलौकिक वाढवू शकतो.
आपल्या मातीतील खेळाला प्राधान्य दिले पाहिजे असे सांगून रमेश उबाळे पुढे म्हणाले, कुस्ती,कबड्डी, खो-खो आदी आपले मैदानी खेळ आहेत हे खेळ आपण नेहमी खेळले पाहिजेत. कुस्ती सारख्या खेळात आपणास यश मिळाल्यास आपले व आपल्या देशाचे नाव संपूर्ण विश्वास चमकू शकते. असेही ते म्हणाले.यावेळी पाटण तालुका राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष हेमंत पवार, अनिल उबाळे, महेश कांबळे, साहिल सुतार आदी विद्यार्थी, शिक्षक, शालेय कर्मचारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment