सोमनाथ कोरेंना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार.
सातारा 24 तास न्यूज.
नितिन घोरपडे.
साप्ताहिक पिंपरी चिंचवड पवनेचा प्रवाह व पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, पुणे यांच्या रौप्य महोत्सवी दिनानिमित्त राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्काराने सोमनाथ कोरे यांना पिंपरी चिंचवडमधील प्रसिद्ध उद्योगपती रामदास माने, कामगार नेते नगरसेवक यशवंत भोसले, ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांच्या हस्ते गौरविण्यात आले. पिंपरी येथील आचार्य अत्रे सभागृहात पुरस्काराचे वितरण करण्यात आले.सोमनाथ कोरे हे खटाव तालुक्यातील पुसेगावचे रहिवाशी असून सध्या पिंपरी पुणे येथील टाटा मोटर्स कंपनीत काम करत आहेत. तसेच सांगवीतील सातारा मित्र मंडळाचे ते विद्यमान खजिनदार आहेत. त्यांचे सामाजिक काम हे उलेखनिय असून सातारा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. याबाबत अनेक संस्थांनी त्याना पुरस्कृत केले असून त्याना यापूर्वी सन 2014 साली महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून प्रसिद्ध निवेदक श्रीकांत चौगुले, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव शिर्के, पुणे जिल्हा गुणवंत कामगार समिती अध्यक्ष प्रकाश घोरपडे, सातारा मित्र मंडळाचे उपाध्यक्ष संजय चव्हाण, सदस्य विश्वास शिंदे, सविता माने आणि सुरेश कंक उपस्थित होते. याबद्दल त्यांचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन बाळासाहेब जाधव, सुनिताराजे पवार यांनी अभिनंदन केले.
Comments
Post a Comment