ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या वतीने मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती .

ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या वतीने मानवी तस्करी व लैंगिक शोषण जनजागृती .

पुसेगाव प्रतिनिधी. पंकज कदम. 

श्री नागनाथ विद्यामंदिर व ज्युनि. कॉलेज बुधमध्ये ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण यांच्या मार्फत मानवी तस्करी आणि लैंगिक शोषण बाबतीत सुरक्षित राहण्यासाठी आपल्या अधिकाराबाबत माहिती, कौटुबिंक हिसांचार यासंदर्भात माहिती ग्रामपरिवर्तन संस्थेचे  सदस्य श्री प्रताप गोरे यानी जन जागृती केली . विद्यालयाचे प्राचार्य श्री टी .आर . फकीर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले . या कार्यक्रमासाठी पत्रकार प्रकाश राजेघाटगे  उपस्थित होते. प्रताप गोरे व प्रकाश राजेघाटगे यांचे स्वागत केले . तसेच प्राचार्य फकीर सर यानी मनोगता मध्ये सांगितले की समाजातील घटकामधून लैंगिक शोषण , कौटुबिंक हिंसाचार यापासून जागृत होण्यासाठी शाषन  व सामाजिक संस्था यांच्या मार्फत विद्यार्थी प्रबोधन केले जाते. ग्रामपरिवर्तन संस्था कटगुण हे सामाजिक बांधिलकी ठेऊन असे उपक्रम राबवित आहे त्याबद्दल कौतुक केले.अशा घटना घडू नये यासाठी जागृत राहणे गरजेचे आहे तसेच अडचणीच्या वेळी रेड अलर्ट हेल्पलाईन 18004198588 यावर संपर्क साधावा किंवा पोलीस यांच्याशी संपर्क करावा असे आव्हान केले तसेच प्रसारमाध्यमाचा विद्यार्थी चांगल्या कामासाठी वापर करावा . तसेच प्रसारमाध्यमाचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होत आहे यापासुन सावध रहावे असे मत प्रताप गोरे यानी सांगितले . तसेच प्रकाश राजेघाटगे सामाजिक कार्यात सहभागी असतात त्याबद्दल त्यांचेही कौतुक करण्यात आले . या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भगवान सरवदे यानी केले  तर  आभार संजय कांबळे यानी मानले यावेळी हेमंत येवले, नाना दडस शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .

Comments

Popular posts from this blog

k M कंपनीचा मोहरक्या करण मदने सह त्याच्या साथीदारांना पुसेगाव पोलिसांनी केले गजाआड.

गिरवी गावचे सुपुत्र सिध्दांत राजेंद्रप्रसाद निकाळजे यांचे एम. बी.बी.एस परीक्षेत उज्वल यश.

श्री.अतुल कबीर भोसले यांचे हृदयविकाराने निधन.